चीनची ”पांडा डिप्लोमसी” फुटबॉल वर्ल्डकप दरम्यानही चर्चेत असणार आहे

विश्वचषकापूर्वी भेटवस्तू म्हणून  पांडाची जोडी बुधवारी कतारमध्ये दाखल झाली. फक्त चीनमध्येच पांडा सापडत असल्याने हे पार्सल चीनमधूनच आलं असे हे वेगळं सांगायला नको. या पांडाच्या माध्यमातून  चीनने प्रथमच मध्य पूर्वेमध्ये आपली पांडा डिप्लोमसी वाढवली आहे.

दोन पांडा ज्यांचं नाव  सी है आणि जिंग जिंग असं आहे ते पुढील 15 वर्षे अल खोर पार्कमधील एका इनडोअर एन्क्लोजरमध्ये घालवतील जेथे परिस्थिती चिनी जंगलांसारखीच आहे जिथं पांडा ओरिजनली सापडतात.

कतारमध्ये आल्यानंतर मात्र या पांडाची नावं बदलली जातील . सुमारे सी है या 3 वर्षीय मादीला थुराया हे अरबी नाव दिले जाईल, तर जिंग जिंग, 265 पौंड वजनाचा 4 वर्षीय पुरुष अरबीमध्ये सुहेल म्हणून ओळखला जाईल. सुमारे 1,800 किलो ताजे बांबू दर आठवड्याला चीनवरून आणले जातील.

वर्ल्डकपमध्ये भारतासारखंच चीन देखील सहभागी नाहीये मात्र पांडा डिप्लोमसीच्या माद्यमातून चीननं वर्ल्डकपमध्ये त्यांचं नाव चर्चेत येण्याची तजवीज करून ठेवली आहे.

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली होती. येथे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष अर्थात चीनचे तत्कालीन अध्यक्ष माओ यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधली मैत्री वाढावी असा यामागचा हेतू होता.

आता चीनचं आपल्याला माहितेय, ‘ऐसा कोई सगा नही, जिसे चीनने ठगा नही’ हा हिंदी डायलॉग चीनला बरोबर सूट होतो. कारण चीन प्रत्येक गोष्टीत व्यवसाय, प्रॉफिट आणि आपला फायदा बघतोचं बघतो. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे पांडा. चीन जगातील अनेक देशांना त्यांच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्यासाठी ‘पांडा कर्जावर’ देतो आणि त्याला मैत्रीचं नाव देतो.

असाच काहीसा गेम अमेरिकेसोबत सुद्धा झाला.

५० वर्षांपूर्वीच्या त्या भेटीवेळी माओने निक्सनला वचन दिले होते की ते दोन पांडा अमेरिकेत पाठवतील. माओच्या म्हणण्यानुसार, हा सुंदर आणि गोंडस छोटा प्राणी अमेरिका आणि चीन यांच्यातील मैत्रीचे प्रतीक असेल, म्हणजेच ‘सिम्बॉल ऑफ फ्रेंडशिप’. आता अमेरिकेला असं वाटलं सुद्धा असेल. बरं अमेरिका या पांडांसाठी दरवर्षी ५ ते १० लाख डॉलर सुद्धा देते. पण चीनची यामागे बिजनेस  मेन्टॅलिटी होती आणि तेव्हापासून ही पांड्याची डिप्लोमसी सुरू आहे.

१९७२ मध्ये निक्सन आणि माओ यांच्या भेटीनंतर पांडा डिप्लोमसी सुरू झाली, त्यावेळी याला ‘polite warfare’ असं नाव देण्यात आलं.  पण पांडा डिप्लोमसीमध्ये चीन दरवर्षी पांडा अमेरिका आणि इतर देशांना भाड्याने देतो. प्राणीसंग्रहालयात पांडा काही वर्षे ठेवण्याच्या बदल्यात तो संबंधित देश चीनला दरवर्षी लाखो डॉलर्स देतो.

यामुळेच अनेकदा चीनची ही पांडा डिप्लोमसी वादात असते. अमेरिकेतुनचा चीनच्या या डिप्लोमसीला विरोध झाला आहे.

आता अमेरिकेबद्दल बोलायच झालं तर, अमेरिकेतील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाव्यतिरिक्त अटलांटा आणि मेम्फिस प्राणीसंग्रहालयात पांडा आहेत. त्यांची नेमकी संख्या स्पष्ट नाही.  पण १९८४ पासून चीन या पांडांना १० वर्षांपर्यंतच्या कर्जावर देत आहे. आणि नंतर परत मागवून घेतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकन प्राणीसंग्रहालयात पांडा जन्माला आला तरी चीन त्यासाठी ४ लाख डॉलर्स घेतो आणि यानंतरही त्यांना चीनमध्ये पाठवावं लागतचं, कारण चीनच्या मनमानी अटी

आता प्रश्न पडतो की अमेरिकेला किंवा त्यांच्या प्राणिसंग्रहालयाचा या पांडाचा नक्की काय फायदा होतो? कि ते एवढं लाखो डॉलर्स खर्च करत. तर उत्तर अगदी सोपं आहे. अमेरिका हा खूप श्रीमंत देश आहे. दरवर्षी लाखो लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देतात आणि या माध्यमातून भरपूर पैसे कमावतात. त्यामुळे प्राणिसंग्रहालय प्रशासनासाठी हा अजिबात तोट्याचा सौदा नाही.

सध्या कतारमध्ये वर्ल्ड कपसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहे त्यामुळे देखील कतार या डिप्लोमसीसाठी तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.