म्हणून संघामध्ये ख्रिश्चन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती…

भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे दिल्लीत २० नोव्हेंबर १९४९ ला झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते,

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मुस्लिमविरोधी आणि हिंसक असल्याची लावली जाणारी दूषणे सर्वथा चुकीची आहेत. परस्पर धर्मांचा आदर आणि सर्वसमभाव याचीच शिकवण संघ देतो !”

त्यांच्या या विधानाशी कित्येक लोक सहमत नसतील मात्र, संघाने वर्षानुवर्षे सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला देश मूठभर ब्रिटिशांनी जिंकून घेतला ह्याचं एकच सरळसोट उत्तर हेडगेवारांकडे होतं ते म्हणजे त्यांची युद्धाची तयारी, शिस्त आणि बाहुसामर्थ्य.

हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही आपल्या लेखनात ह्याचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे कि”बाहुबल हेच त्यांचे बायबल” होते आणि त्याच जोरावर त्यांनी भारतीयांना गुलाम बनवले. युरोपीयनांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे !

ह्या तात्यासाहेबांच्या विधानावर समग्र हिंदुप्रेमींची श्रद्धा होती. ब्रिटिश सेनेसारखी एक उत्कृष्ट, शस्त्रांस्त्रांनी सुसज्ज हिंदूसेनाच हिंदुस्थानाला स्थैर्य आणि शांतता प्राप्त  देऊ शकेल अशी हेडगेवारांची धारणा होती.

भारतातील ३ टक्के शहरी जनता आणि फक्त १ टक्के ग्रामीण जनता एकत्र येऊन लढली तरी आपण शत्रूंचा नायनाट करू शकू आणि देशात सुदृढ शासन देऊ शकू असे ते म्हणत.

अशी शिस्तबद्ध संघटना देशभरात लोकांना योग्य नेतृत्व देईल. देशाच्या राष्ट्रीयत्वाशी कोणतीही तडजोड न करणारी सेनाच हे करू शकेल ह्या विश्वासाने त्यांनी ब्रिटिश फौजांमधील पोशाख, शिस्त, त्यांची युद्धगीते आणि एकूण संघटन बघून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न केला.

१९४१ साली जबलपूरमध्ये झालेल्या संघाच्या प्रशिक्षण आणि अधिवेशनात गोळवलकर यांनी हेडगेवारांच्या या विधानाचा अर्थ उलगडत त्यांनी आपले विचार प्रकटही केले होते,

कि तीन टक्के म्हणजे कोणताही माणूस आणला, त्याला संघाचे कपडे घातले म्हणजे आपले ध्येय पूर्ण झाले असा नसून डॉक्टरांच्या म्हणण्याचा उद्देश आहे की शंभरातील एक खेडूत पण तो असा असावा कि त्याने उरलेल्या ९९ जणांचे नेतृत्व करावे. हीच बाब शहरातही लागू होते.

म्हणून ब्रिटिश गेल्यानंतर देशात आपले शासन कायम करण्यासाठी व विचार रुजवण्यासाठी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली. मूठभर ब्रिटिश जर भारताचे शासन फक्त फौज, पोलीस आणि शिक्षक बनवून चालवू शकत असतील तर या सर्वाना एक स्थानिक सशक्त माणूस देऊन आपली संघटना सहजी चालवू शकेल असा त्यांचा कयास होता.

भारताची १९३१ ची लोकसंख्या जवळपास ३१ कोटी इतकीच होती. त्यातील लोक घेऊन संघटन बनवण्याचा संघाचे ध्येय अजून तसूभरही विचलित झालेले नाही. आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यातल्या शाखेत हा किस्साही सांगितला होता की,

५० स्वयंसेवकांना ५००, आणि पाचशेचे ५००० करून त्यांना नक्की कशाकरता वापरायचे ह्यावर डॉक्टर काहीही बोललेले नाहीत. केवळ ह्या सदस्यांना तुकडीबद्ध करून हिंदू समाजाच्या सुव्यवस्थेसाठी तयार करणे हाच संघाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब देवरस हे हेडगेवारांच्या हाताखालून तयार झालेल्या पहिल्या शाखेचे सदस्य होते. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांना डॉक्टरांचा सहवास लाभला, तेही ब्रिटिशांच्या इतिहासाची उदाहरणे देऊन शाखेत चैतन्य पसरवत असत. वॉटरलूच्या लढाईतील जय हा त्या सैन्याने इटनच्या मैदानावरच्या सरावातच जिंकला होता असं ते म्हणत असत. म्हणून यासाठी सुसज्ज संघटन बनवणे हि संघाची जबादारी राहिली आहे.

त्यासाठी योग्य माणूस जो असेल त्याचे संघात स्वागतच होते असे इतिहास सांगतो.

ब्रिटिश सैन्याकडून अनेक गोष्टी संघाने आत्मसात केल्या आहेत. हेडगेवारांनी अनेक ख्रिश्चन शिक्षकांच्याही नियुक्त्या केल्या होत्या. इतकेच नाही तर संघाच्या बॅण्डमध्येही कित्येक गाण्यांच्या व मिरवणुकीच्या संगीताचा वापर त्यांनी ब्रिटिशांकडूनच घेतला होता. पॅन्टवरील चामडी बेल्ट आणि विजार ह्यालाही तत्कालीन ख्रिस्ती सैन्याचा संदर्भ आहे.

या आरएसएसच्या बँडची त्याकाळी नागपूरमध्ये प्रचंड चर्चा होती. या स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचालन सुरु झाले की ते पाहण्यासाठी अख्खा गाव लोटत असे. इंग्लिश वाद्यांचा वापर करत संचालन मशिदीच्या जवळ पोहचले की काही तरुण स्वयंसेवक वादन करण्यास घाबरत असत तेव्हा डॉ. हेडगेवार स्वतः ड्रम घेऊन वाजवायला सुरु करत.

संघामध्ये राष्ट्रनिष्ठा, निर्भीडपणा आणि स्वयंशिस्त याचे संस्कार डॉक्टरांनी सुरवातीपासून निर्माण केले होते. 

केरळमधील सी. आय. आयझॅक हे गेली ५० वर्षे शाखेत जात असून त्यांना ह्याचा सार्थ अभिमान आहे. “मला कुणी अल्पसंख्यांक म्हणलेले आवडत नाही, मी प्रथमतः भारतीय आहे” असे ते म्हणतात.

गुलरेझ शेख हे लहानपनापासून वनवासी संघाच्या शाखेत जाणारे अयोध्येतील डॉक्टर आहेत जे आजही दरवर्षी आपला रोजा सोडण्यासाठी रमजानच्या महिन्यात शाखेवर जातात.

संघाशी गोडलेल्या सेवा भारती संस्थेने जम्मू कश्मीरमधील ५७ अनाथ अनाथ मुलांना दत्तक घेतले होते ज्यातील ३८ मुस्लिम होते.

संघाची एक संस्था तर मुसलमान नागरिकांच्या हितासाठी काम करते. मुस्लिम राष्ट्रीय मंच (एमआरएम) च्या वेबसाईटवरही आपल्या स्थापनेला संघाच्या धुरिणांची प्रेरणा असल्याचे म्हटले गेले आहे.

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मीडिया प्रभारी डॉक्टर गुलरेज शेख “काही लोक इंग्रजांची फोड आणि राज्य करा नीती अजून वापरत आहेत, त्याविरोधात आम्ही देशात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पाय मजबूत करत आहोत.

शेवटी काय तर, एखाद्या चळवळीची यशस्विता कशात आहे, हे लक्षात घेताना, “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे,’ इतकेच काय ते खरे आहे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे,’ असे म्हणण्याची काहीही गरज नाही.

कारण ऐहिक आणि भौतिक साधनांनी विपक्षावर ‘सामर्थ्यात’ मात केली की चळवळ यशस्वी होतेच.” हे स्वातंत्र्यवीरांचे उद्गार ध्यानात असले म्हणजे पुरे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.