अजित डोवल आता ‘मिशन तालिबान’ साठी सक्रिय झालेत..

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता आली आणि सगळ्या देशांना आता त्यांच्या त्यांच्या सुरक्षेची काळजी लागली आहे. जे ते आपल्यावर तालिबान्यांच संकट येऊ नये म्हणून तशा हालचाली करत आहे. याबाबत  भारतानेही सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी नुकताच दोन महत्वाच्या बैठका केल्या आहेत. भारतीय आणि अमेरिकन या भेटीबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती मात्र पण काही सूत्रांच्यानुसार  त्यांच्या भेटी आणि अजेंड्याची पुष्टी केली आहे. 

एक म्हणजे अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांच्यासोबत बैठक झाली आहे, आणि दुसरी रशियाच्या राष्ट्रीय सल्लागार यांच्यासोबत देखील बैठक झाली आहे.

रशियाचे राष्ट्रीय सल्लागार निकोले पेत्रूशेव दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहेत. हा दौरा खास अफगाणिस्तानातील परिस्थितीवर आणि पाकिस्तानच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा होण्यासाठी होता हे उया बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. एका बाजूला रशियासोबत भारतीय सुरक्षा सल्लागार चर्चा करत असताना काल अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विल्यम बर्न्स देखील भारतातच होते. त्यांची आणि  अजित डोवाल यांच्यासोबत याच विषयावर बैठक झाली.

बर्न्स गेल्या महिन्यात मुल्ला अब्दुल गनी बरदारसह तालिबान नेतृत्वाला भेटण्यासाठी अफगाणिस्तानला गेले होते. हि भेट अनिश्चित सुरक्षा परिस्थितीच्या संदर्भात होते, जे अमेरिकन लोकांसाठी अमेरिकन, अफगाण आणि इतरांना इतर देशांमधून बाहेर काढणे आव्हानात्मक होते.

या आधी देखील २४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यात फोनवर देखील चर्चा झाली होती. या फोनवरच्या संभाषणानंतर पत्रुशेव भारत दौऱ्यावर आले आहेत.

ह्या दोन्ही बैठका बघता हे स्पष्ट झालंय की, तालिबानच्या मिशनवर अजित डोवल हे सक्रीय झाले आहेत.

भारताने रशिया आणि अमेरिका सोबत केलेल्या गुप्तबैठकांमध्ये दहशतवादी संघटना लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद च्या मुद्द्यावर चर्चा केलीये अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अफगाणिस्तान चालवण्यासाठी तालिबान सरकारने त्यांच्या नेत्यांच्या नावांची घोषणा केली. यात एक नाव असंही आहे ज्यावर अमेरिकेने बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या नेत्याला पंतप्रधान करण्यात आलं आहे हे सुरक्षेच्या दृष्टीने धक्कादायक बाब आहे. दहशतवादी संघटनेच्या नेत्याला म्हणजे सिराजुद्दीन हक्कानी हा नवा गृहमंत्री झाला आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा अमेरिकन सुरक्षा यंत्रणा एफबीआय च्या हिटलिस्टवर आहे.

भारत आणि रशियाची बैठक महत्वाची आहे कारण अफगाणिस्तानात रशियाचे भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे.

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवला त्यावेळीच भारताने आपल्या दुतावासातील कर्मचाऱ्यांना मायदेशी आणले. पण रशिया आणि पाकिस्तानचे कर्मचारी तिथेच आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यामुळे पाकिस्तानकडून भारताविरोधात या दहशतवादी कारवाया वाढतील अशी शंका भारताने उपस्थित केली होती. अफगाणिस्तानातील संसाधनांचा आणि तेथील भूमीचा भारताविरोधात दहशतवादी संघटनांकडून वापर केला जाणार नाहीं याची काळजी घेतली जाऊ शकते.

तसंच आजच बातमी आली आहे कि, ब्रिक्स व्हर्च्युअल शिखर कॉन्फरन्समध्ये अफगाणिस्तान मुद्द्यांवर मोदी आणि चिनी राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे.  या कॉन्फरन्समध्ये अफगाणिस्तानचाच मुद्दा केंद्रस्थानी असणार अशी शक्यता आहे.

या दोन्ही बैठकामध्ये तालिबान्यांच्या विरोधात मोठी रणनीती आखली जाणारं असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतातविरोधात कुठल्याही दहशतावादी कारवाया करू देऊ नये, असं भारताने तालिबानसमोर स्पष्ट केलं आहे.

कतारची राजधानी दोहामध्ये भारताचे राजदूत आणि तालिबानच्या नेत्यामध्ये काही दिवसांपूर्वी औपचारीक बैठक झाली. या बैठकीत भारताने तालिबानसमोर आपले विचार मांडले. तसंच अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली होती. तालिबानने भारताला या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

संदर्भ – The Indian Express

 हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.