कर्ज घेतांना सिबिल स्कोर पाहिला जातो? तो नेमका कसा ठरविला जातो? वाढविण्यासाठी काय करायला हवं

व्यक्ती कितीही श्रीमंत असुद्या किंवा गरीब असुद्या त्याला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी बँकेतून कर्ज घ्यावेच लागते. बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर एक गोष्टी सगळ्याच बँका तपासात असतात. ती म्हणजे तुमचा सिबिल, क्रेडिट स्कोर. यामुळे त्या व्यक्तीची संपूर्ण आर्थिक कुंडली समजते.

तुम्ही कधी-कधी कर्ज घेतले होते,  ते भरले की नाही, तुमच्या अशा सगळ्या गोष्टी सिबिल स्कोरमुळे समजतात. त्यामुळे बँकेतून कर्ज घ्यायचे असल्यास चांगला क्रेडिट स्कोर असायला हवा. मात्र अनेकांना बँकेत जाई पर्यंत सिबिल, क्रेडिट स्कोर माहितीच नसतात. त्या संदर्भात माहिती असली तरीही तो कसा वाढवायचा हे माहित नसते. 

कर्ज घेण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तो वाढविण्याचा कसा? त्यासाठी काय करायला हवा हे. हे जाऊन घेऊयात.  

सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉरमेन्शन ब्युरो (इंडिया) लिमिटेड. 

ही कंपनी भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आणि कंपनीचा आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक स्थितीची माहिती सिबिलकडे असते. क्रेडिट कार्ड, किती कर्ज घेतले, ते किती वर्षात भरले, हप्ता किती होते, कितीचा होता, कुठले हप्ते उशिरा भरले, कुठले कर्ज थकविले, किती थकबाकी आहे ही सगळी माहिती सिबिलकडे असते.

प्रत्येकाची आर्थिक माहिती सिबिलकडे कशी असते असं विचारण्यात येत. तर प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहाराची नोंदणीकृत बँका आणि आर्थिक संस्था देत नियमितपणे सिबिला देत असतात. यानंतर  सिबिल ही माहिती घेऊन प्रत्येकाचा रिपोर्ट तयार करत असते. 

या रिपोर्टच्या आधारे तुम्ही नियमित कर्ज भरू शकता की नाही याचा अंदाज लावला जातो. याच आधारे बँका व्यक्तीला, संस्थेला कर्ज देत असतात.     

एखादी व्यक्ती घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेच्या वेळी भरत असेल तर त्याचा सिबिल स्कोर चांगला असतो. जर एखादी व्यक्ती नियमितपणे कर्ज भरत नसेल किंवा उशिरा हप्ते फेडत असेल आणि नंतर दंडाची रक्कम भरून तो हप्ता भरत असेल तर त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर कमी असतो. 

क्रेडिट स्कोर हा तीन अंकान मध्ये मोजला जातो. ३०० ते ९०० पॉईंट्स मध्ये मोजला जातो. कुठल्याही  बँककडून सहजपणे कर्ज पाहिजे असेल तर तुमचा सिबिल स्कोर ९०० च्या आसपास पाहिजे. महत्वाचं म्हणजे परतफेड करण्याची जेवढी क्षमता आहे तेवढंच कर्ज बँक देत असते.  तसेच ७५० पेक्षा जास्त सिबिल स्कोर असला तर तो चांगला समजला जातो. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिबिल स्कोर कमी असेल तर कर्ज घेतांना अडचण येते. ७५० सिबिल स्कोर असेल तर क्रेडिट कार्ड लगेच मिळते. 

पर्सनल लोन घ्यायचे असेल तर ५५० सिबिल स्कोर असायला हवा.    

५५० सिबिल स्कोर असेल तर पर्सनल स्कोर सहजपणे मिळत ५५० च्या पुढे सिबिल स्कोर ठेवणे महत्वाचे असते. घर, गाडी, मालमत्ता घ्यायची असेल तर त्यासाठी कर्ज घ्यावे लागते त्यामुळे सिबिल स्कोर चांगला असायला हवा. 

सिबिल स्कोरला एका दिवसात सुधारत नाही. त्यासाठी आर्थिक व्यवहारात थोडे फार बदल करावे लागतात. त्यामुळे सिबिल स्कोर मध्ये फरक पडू शकतो. 

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी या १० गोष्टी करण्याची गरज असते. 

१) क्रेडिट कार्डचे डिव्यू टाईमवर भरायला हवा. आणि ईएमआय हे वेळेत भरायला हवेत. 

२)  नियमित जास्तीत जास्त रकमेचं कर्ज घेतलं पाहिजे. तसेच क्रेडिट लिमिट जास्तीत जास्त असायला हवे. क्रेडिट लिमिटच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च नाही केली पाहिजे. क्रेडिट लिमिट १ लाख असेल तर फक्त ३० हजारांच्या जवळपासच रक्कम वापरली पाहिजे. 

३) कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे चेक करायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे जी बँक मंजूर करण्याची जास्त शक्यता आहे. त्याच बँकेकडे कर्जसाठी अर्ज करायला हवा. क्रेडिट कार्डसाठी एकामागून एक करत  वेगवेगळ्या बँकेत अर्ज करू नये. अर्ज करतांना जास्त दिवसांचे अंतर असायला हवे.        

४) नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट चेक करायला हवा. मागचा कारणं म्हणेज अनेकवेळा आर्थिक व्यवहार करतांना बँकेकडून, कर्ज घेणाऱ्यांकडून काही चुका होतात. या रिपोर्टच्या माध्यमातून चुका लक्षात येतात. त्यानंतर  रिपोर्ट पाहिल्याने संबंधित बँकेशी संपर्क करून लक्षात आणून देता येते.

५) बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीचे कर्ज घेणं गरजेचे असते. दोन प्रकारचे कर्ज असेल तर ते भरण्याचा कालावधी वेगळा असायला हवा. मागचे कर्ज फेडता येत नसेल तर तर नव्याने कर्ज घेऊ नये. 

 ६) पहिल्या कर्जापासूनचे कर्ज फेडीचे रेकॉर्ड जवळ असायला हवे. 

७) पुढच्या काळात खर्च वाढणार आहे माहिती असल्यास  त्यापूर्वीच क्रेडिट लिमिट वाढवून घ्या. क्रेडिट लिमिट पेक्षा जास्त खर्च करू नये. 

८) कर्जा संदर्भाततील सगळे डीयूज भरायला हवे. गरज असेल तेव्हाच क्रेडिट कार्ड घ्यायला हवे. 

९) ज्या कर्जाचा सर्वाधिक व्याज असेल ते कर्ज फेडायला प्राधान्य द्यायला हवे. क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन, होम लोन सारखे  एकाच वेळी अनेक कर्ज घेतल जात. यासाठी वेगवेगळे हप्ते भरावे लागतात. अशावेळी एकच मोठ लोन घेऊन लहान लोन फेडून टाका. आणि त्या एकाच कर्जाचे हफ्ते भरायला हवं.

१०) टोटल ईआयएम किती असणार आहे हे जाणून घेतलं पाहिजे. हा ईआयएम पगाराच्या ३० टक्क्यांच्या जवळपास असायला हवा. पगारा ४० टक्के ईआयएम मध्ये जात असेल तर त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडते. १ लाख पगार असेल तर ईआयएम ३० हजारांच्या आत असायला हवे. 

या गोष्टी केल्या तर सिबिल स्कोर चांगला होऊ शकतो. तसेच सिबिल स्कोर वाढायला मदत होईल. याचा फायदा असा होईल की हवं तेव्हा हवं तेवढं कर्ज मिळण्यास मदत होईल. 

हे ही वाच भिडू  

         

    

Leave A Reply

Your email address will not be published.