अब तुम्हारे हवाले वतन साथियो… 

CID संपली. ही बातमी आहे. ज्यांना बातमी हवी होती, ते बातमी समजली म्हणून बाहेर पडू शकतात. पण ज्यांना एसीपीच्या बोटांवर, दयाच्या बुक्यांवर आणि डॉ. साळुंखेच्या टेस्ट ट्युबवर आजन्म विश्वास असेल यांनी वाचायला चालू करा. 

हे अशा खतरनाक एक्सप्रेशन वाचा, जस तुम्ही CID बघायचा.

आणि हो संपल ना कि तेच एक्सप्रेशन द्या, जे ACP च्या समोर शेवटची मुस्काड पडली की भल्ला मोठ्ठा शातीर खोपडीचा गुन्हेगार द्यायचा. 

तर आत्ता CID संपल्या हा धक्का तुम्ही परमनंट डोक्यात घेतला असेलच. CID चा पहिला शो आलेला २१ जानेवारी १९९८ साली. शेवटचा शो आला तो २७ ऑक्टोंबर २०१८ साली. तब्बल २१ वर्ष. होय २१ वर्ष हि सिरीयल चालू होती. कोणतर अमेरिकेतल्या फ्रेन्डचा दाखला देईल. मंद डोक्याच्यांनो हितला फ्रेड्रिक्सचा ह्यूमर तुमच्या चॅडलरपेक्षा जड होता. असो आमच्यासाठी हिच मालिका सगळ्यात जास्त चाललेली मालिका आहे. 

२१ वर्षाच्या काळात ACP प्रद्युम्न यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५४६ केसेस सॉल्व करण्यात आल्या. बायकोचा खून करुन कपाटात ठेवणारे, एस्टीच्या टपावर बसून पळून जाणारे, कुठलतरी इंटरनॅशनल लिक्वीड आणून पाहूण्यांच्या माणसाला आर्टिफिशल अटॅक आणणारे, सुईच्या टोकानं खून करणारे असे कित्येक गुन्हेगार ACP आणि त्यांच्या टिमने यशस्वीपणे गजाआड घालवले. 

या टिमचा बाप माणूस म्हणजे ACP प्रद्युम्न. ACP साहेब गेली २० वर्ष ACP होते. त्यांच्या मागून येणारे अधिकारी CBI चे मोठ्ठे अधिकारी होवून कांड करुन चर्चेत देखील आले असतील पण आपले साटम साहेब म्हणजे कुटूंबवत्सल माणूस. तीच टिम तिच ज्युनियर लोकं आणि तेच पद. प्रामाणिकपणे कुछ तो गडबड हैं दया करत या माणसानं आपलं काम केलं. 

टिमचा दोन नंबरचा माणूस अभिजीत आणि दया. दया बाहेर कुठ दिसला ते आठवत नाही. त्यामुळे तो पक्का CID वालाच वाटत होता. अभिजीत लिजेंड ऑफ भगतसिंग आणि सत्या मध्ये होता. खरतर सत्या मध्ये त्याला पाहिल्यानंतरच CID ची ऑफर आलेली. 

प्रोड्यूसर म्हणले फक्त २६ एपिसोड करावे लागतील. M.A.BEd झालेल्या प्राध्यापकाला आत्ता तू CHB वर चालू कर म्हणल्यासारखी ऑफर होती. पण अभिजीत शातीर खोपडी निघाला. कुछं समज मैं आया अभिजीत म्हणलं की अभिजीतला आधीच माहित असायचं पण म्हणतात न गाढवाच्या माग शहाणपणा करायचा नसतोय. अभिजीत पण दबुन दबुन केस कळल्याचं पॉइन्ट हाणाय लागला. 

झालं कालच्या CHB वाल्याची परमनंट ऑर्डर निघाली आणि अभिजीत पुढं २१ वर्षासाठी इन्स्पेक्टर म्हणून फिक्स झाला. परमनंट ऑर्डर निघाली की माणूस लाईन मारायला सुरवात करतो. अभिजीत देखील डॉ.साळुंखेच्या असिस्टंट  तारिकावर खतरनाक लाईन मारायचा. तब्बल २१ वर्ष हे प्रकरण धुळ खात पडलं. तुमचं दुखं त्यापुढं कुठच नाय. 

Screen Shot 2018 10 28 at 8.25.41 PM
Sony tv

आत्ता दयाला घेवूया. दया म्हणजे दार तोडायला आलेला माणूस. एका भेटीत हा माणूस पाहिजेच म्हणून प्रोड्यूसरने त्याला परमनंट केला. कुछ तो गडबड हैं दया आणि दया तोड दो ये दरवाजा या दोन आज्ञापलिकडं या माणसानं काही ऐकलं असावं अस वाटत नाही. याच खरं नाव पण दयानंद शेट्टी. 

त्यानंतर डॉ. साळुंखे. या माणसाला सात आठ नोबेल एकाच दिवशी जाहिर करुन टाकावं अस अध्येमध्ये वाटायचं असा माणूस. शातिर खोपडी पण प्रामाणिक माणूस. बोटाचे ठस्से म्हणून नका, डोक्याचा केस म्हणून नका या माणसानं नाकातला शेंबूड सोडून प्रत्येक गोष्टीवरुन माणूस शोधला. रक्त लघवी तपासल्यासारखा दोन मिनटात DNA तपासला. ते पण कशाचा जीवावर तर फक्त टेस्ट ट्यूब आणि चार पाच रंग. 

खरतर डॉ. साळुंखे हे आपल्या बुडलेल्या अर्थव्यवस्थेत असणाऱ्या हूशार माणसांच प्रतिकच. तिकडे कधीतरी थुंबाला असाच डॉ. कलामांच्या टिमने सायकलवरुन रॉकेट नेलेल. आपल्याकडं असच असतय. 

आत्ता शेवटचा माणूस फॅड्रिक्स. आहा काय त्यांची रिएक्शन. भोळ असावं पण येड असू नये. फेड्रिक्स येडा होता. त्याच्या डोळ्याच्या भूवया पाहून चार पाच गुन्हेगार त्यात लपून बसले असतील अश वाटायचं पण माणूस दिलदार.

असली हि आपली CID टिम. शक्तीमान आला गेला, सनी देओलचा हिरोलव्हस्टोरीऑफस्पाय आला, क्राईम पेट्रोल आलं… 

अरे आले किती गेले किती संपले भरारा..  

काय झालं त्याचं एकटी CID ची टिम टिकून राहिली. 

आत्ता CID वाले काय करणार आहेत. ACP प्रद्युम्न सर पुण्यात UPSC चा क्लास चालू करणारायत. डॉ.साळुंखे आत्ता डॉ. जग्गनाथ दिक्षीत यांच्याबरोबर डायट प्लॅन पण सांगतील. दयाचा उपयोग 19 चा अंदाज घेवून निवडणुकीत करून घेतील, अभिजीत बहूतेक सल्लागार मंडळात जाईल. कोणाच्या ते तुम्हाला अंदाज आलाच असेल. बाकी आपला फॅड्रिक्स. असाच असेल भूवया ताठवून कुणाच्यातरी बरोबर ! 

असो, १५४६ गुन्हेगार पकडलेल्या CID च मनापासून आभार. तुम्हाला कोणी THNX म्हणणार नाही हे आम्हाला माहित आहे. पण २० वर्ष मनमुराद डोकं चालवण्याचा आनंद दिल्याबद्दल खरचं LOVE U. 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.