ईडी आता अडसूळ यांच्यामागे लागलीये, नेमका काय आहे हा सिटी बँक घोटाळा?

शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकलेत. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली आहे.

आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे ईडीने बुधवारी अडसूळ यांचे चिरंजीव माजी आमदार आणि बँकेचे संचालक अभिजित अडसूळ तसंच अडसूळ यांचे जावई यांच्या घराची, कार्यालयाची ईडीने झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

ईडीकडे केकेली ही तक्रार रवी राणा यांनी केली होती.

“मुंबई येथील सिटी बँकेत माजी खासदार यांनी ९०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीकडे आपण स्वतः तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ईडीने कारवाईचा बडगा उचलला आहे”. असं रवी राणा म्हणाले होते.

“तर खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख जवळ आली कि, की दरवेळी त्यांचे असे काही ना काही उपद्व्याप सुरू असतात. ते न्यायालयातून लवकरच स्पष्ट होईल. बँकेत गैरव्यवहार बाबतीत अगोदर आम्हीच तक्रार केली आहे. लक्ष विचलीत करण्यासाठी वेडीईडी चौकशीचा हा फार्स आहे” अशी प्रतिक्रिया माजी अस्मदार अभिजित अडसूळ यांनी दिली आहे. थोडक्यात नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ ययांच्या भांडणाच्या नादात ईडीच्या या कारवाईमध्ये आता अडसूळ कुटुंब अडकते कि काय हे पाहणं महत्वाचं झालं आहे.

आनंदराव अडसूळ यांच्यावर कोणते आरोप आहेत ?

आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ५ जानेवारी रोजी केला होता.

सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये  १३-१४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहेत. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे. असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

या चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

आरोपपत्राप्रमाणे, आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार गोरगरीब नागरिक ज्येष्ठ पेन्शन धारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटण्याचे आरोप त्यात केला आहे. त्यानंतर ईडीने माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ जावाई यांची घरे आणि ऑफिसची झाडाझडती घेतली.

आनंदराव अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठं प्रस्थ आहे.

अडसूळ हे सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अध्यक्ष होते व त्यांचे नातेवाईक संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होता. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. आनंदराव अडसूळ हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करत आले आहेत.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून हि बँक तोट्यात गेली आहे.

कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली व अखेर बुडीत निघाली. अनेक पेन्शनर ग्राहक हे बँकेचे खातेदार होते, त्यांचेही पैसे बुडाले होते. गेल्या दीड वर्षात खातेदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत.

ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून मार्ग काढण्याची विनंती केली. पण आनंदराव अडसूळ यांनी मनावर घेतलं नाही. शेवटी सर्व खातेदारांनी मिळून सीबीआय, आरबीआय, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, याची दखल ईडीने घेतली.

यामुळेच अडसूळ यांना याआधी फेब्रुवारी महिन्यात चौकशीसाठी बोलावले होते.

याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सिटी को. ऑपरेटिव बँकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देणार का? असे प्रश्न विचारणारे बॅनर मुंबईत शिवसेना भवन, मंत्रालय, मातोश्री, शिवसेनेच्या शाखेसमोर बॅनर लावण्यात आले होते.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.