मोनिका डार्लिंग, बिल क्लिंटन….आणि ते सेक्स स्कँडल ज्यामुळे अमेरिकेचा बाजार उठला होता

सेक्स, सीडी आणि पॉलिटिक्स…जेंव्हा जेंव्हा हे कॉकटेल समोर आलं तेंव्हा तेंव्हा देशाचं राजकारण ढवळून निघालं. म्हणूनच राजकीय नेत्यांना ‘सेक्स स्कॅन्डल’ च्या नावानं कापरं भरत असतंय. जगभरातील पॉलिटिकल नेतेच नाही तर बॉलिवूड, हॉलिवूड, क्रिकेटर्स असे सगळेच सेक्स स्कँडलच्या कचाट्यात सापडले आहेत.

यातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील सुटले नव्हते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविन्स्की यांच्या प्रेम प्रकरणाने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

आज याची आठवण काढण्याचं निमित्त म्हणजे, या प्रकरणामुळे फेमस झालेले वकील केनेथ स्टार यांचं नुकतंच निधन झालं आहे. केनेथ स्टार यांचा अमेरिकेच्या दोन- दोन राष्ट्राध्यक्षांशी वकील या नात्याने संबंध आला होता. 

तर १९९५-९७ च्या दरम्यान हे प्रकरण घडलेलं…याला मोनिका ल्युइन्स्की प्रकरण असंही नाव आहे…काही जागी तर या प्रकरणाचा उल्लेख ‘सेक्स स्कँडल’ म्हणून केला जातो.

२१ जून १९९५ चा दिवस होता. या दिवशी मोनिका व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून रुजू झाली. बिल क्लिंटन अध्यक्ष होते. मोनिका तेंव्हा अवघ्या २२ वर्षांची होती. व्हाईट हाऊसमध्ये चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करत असलेले लिओन पॅनेटा यांच्या ऑफिसमध्ये काम करत असायची. 

व्हाईट हाऊसचा चीफ ऑफ स्टाफ हा राष्ट्राध्यक्षांच्या सर्वात जवळचा अधिकारी असतो. थोडक्यात चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्राध्यक्षांचा पर्सनल स्टाफ एकमेकांच्या बरोबरीने काम करावं लागतं. त्यामुळे मोनिका अनेकदा क्लिंटनच्या ऑफिसमध्ये जात असे. 

याचदरम्यान लवकरच दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. इतकी कि त्यांच्यात शारीरिक संबंध तयार झाले. 

प्रकरण १९९५ ते १९९७ च्या दरम्यान घडलेलं मात्र १९९८ मध्ये उघडकीस आलं आणि अमेरिकेच्या राजकारणात वादळ निर्माण झालं. उघडकीस आल्यावर सुरुवातीला क्लिंटन यांनी हे नाते नाकारले होते, पण मोनिकाने जाहीरपणे खुलासा केला होता की तिने आणि क्लिंटनने १९९५ ते १९९७ या दरम्यान परस्पर संमतीने नऊ वेळा शारीरिक संबंध ठेवला होता, असं सांगत तिने त्यांच्यातल्या संबंधांची कबुली दिली. 

इकडे बिल क्लिंटन यांनी मोनिकासोबत असलेल्या संबंधाचा इन्कार केला. मात्र त्यानंतर ‘लैंगिक संबंध’ याची व्याख्या नीट समजून घेतल्यानंतर त्यांनी ते मान्य केले देखील पण यावरून राजकारण थांबत नव्हतं.

आणि केनेथ स्टार यांची या प्रकरणात एंट्री झाली. 

रिपब्लिकन पक्षाने बिल क्लिंटन यांच्यावर मोनिका लेविन्स्कीसोबतच्या अफेअरबाबत फेडरल इन्व्हेस्टिगेटर्सना खोटे बोलल्याचा आरोप केला. आणि नेमकं स्टार हे रिपब्लिकन पक्षाच्या विचारांचे होते तर क्लिंटन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. 

रिपब्लिकन पक्षाने केलेल्या आरोपांच्या आधारे स्टार यांनी क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालवला. त्यांची ही कृती कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन होती असा आरोप त्यांच्यावर झाला.

त्याच्याही आधी जेंव्हा क्लिंटन अर्कान्सास राज्याचे गव्हर्नर होते त्याकाळात १९९२ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेला आर्थिक अफरातफरी केल्याच्या प्रकरणात बिल क्लिंटन यांची चौकशी सुरु झालेली.  यादरम्यान बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. या चौकशीसाठी त्रिसदस्यीय खंडपीठाने केनेथ स्टार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. 

या प्रकरणाची चौकशी करत असतानाच स्टार यांनी क्लिंटन यांच्याशि संबंधित सेक्स स्कँडल बाहेर आणले. मुळात एक वेगळी केस सुरु असताना मध्येच दुसरं प्रकरण राजकीय आकसातून उकरून क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून खाली खेचण्यासाठी केलं अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. 

या प्रकरणाला स्कँडलचं स्वरूप देऊन बाहेर काढण्यासाठी स्टार यांना व्हाईट हाऊसच्या संरक्षण खात्यातील लिंडा ट्रिपची मदत घेतली होती. जेंव्हा मोनिका पॅन्टगॉन च्या ऑफिसमध्ये काम करत असत तेंव्हा तिच्यात आणि लिंडामध्ये छान मैत्री झालेली, मोनिका सगळ्या खाजगी गोष्टी लिंडा सोबत शेअर करत असत. यातच तिने क्लिंटन यांच्यासोबत असणाऱ्या संबंधाच्या गोष्टी देखील लिंडा ला सांगू नेमक्या याच सगळ्या गोष्टी लिंडाने टेप रेकॉर्ड केले होते. लिंडाने हे रेकॉर्डस् सरकारी वकील म्हणून केनेथ स्टार यांना सादर केल्या. त्यानंतर तिला क्लिंटन प्रशासनाने जॉबवरून काढून टाकले.

इकडे स्टार यांनी आपण हे प्रकरण कसे उजेडात आणले हे सांगणारं ‘द स्टार रिपोर्ट’ नावाचं पुस्तकच त्यांनी पब्लिश केलं. स्टार यांनी उजेडात आणलेल्या या प्रकरणामुळे क्लिंटन यांच्यावर पुढे महाभियोग चालवण्यात आला. पण तो अयशस्वी ठरला. क्लिंटन यांनी त्यांचा राष्ट्रध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. २००० पर्यंत ते अध्यक्ष होते.

मग मोनिकाचं पुढं काय झालं ?

जे काही घडून गेलं त्याला ‘सेक्स स्कँडल’ म्हणून समोर आणल्यावर मोनिकाच्या बरीच बदनामी झाली.  तिने त्यानंतर व्हाईट हाऊस सोडलं. तिने काही दिवस हँडबॅग डिझायनर म्हणून काम केले. एका रिऍलिटी डेटिंग शोची होस्ट देखील बनली. तिच्या भूतकाळामुळे तिला अमेरिकेत नोकरी मिळणे कठीण होऊन बसलं त्यामुळे तीने अमेरिका सोडली आणि लंडनला निघून गेली. 

२०१४ मध्ये मोनिकाने सायबर बुलिंग च्या विरोधात मोहीम सुरु केली. स्वतःच्या आयुष्यातले अनुभव त्यांनी या मोहिमेदरम्यान मांडले.

मोनिकाने एका मॅगझीन मध्ये लिहिले की, ‘माझ्या बॉसने माझा गैरफायदा घेतला. दोघांमधील संबंध परस्पर सहमतीने होते या वस्तुस्थितीवर मी नेहमीच ठाम राहीन. माझ्या शांत राहण्याचा असा अर्थ काढला जातो की, क्लिंटन यांनी मला गप्प राहण्यासाठी पैसे दिले असावेत वैगेरे पण हे सगळं खोटं असून आमच्या दोघांमध्ये सहसमंतीने संबंध होते. बाकी राष्ट्राध्यक्षांना वाचवण्यासाठी नंतर माझ्यावर सेक्स स्कॅण्डल चे आरोपही लावले गेले. २०१८ मध्ये मोनिकाने ‘द क्लिंटन अफेअर’ नावाची डॉक्युमेंट्री प्रॉड्यूस केलेली.  

 ‘द क्लिंटन अफेअर’ असं नाव देण्यामागे मोनिकाचा हा प्रयत्न आहे कि, हे सेक्स स्कॅन्डल नसून दोघांमध्ये झालेले प्रेम प्रकरण होते.

जरी मोनिका लेविन्स्की आणि क्लिंटन यांचे प्रेम टिकले नाही, परंतु मोनिकाच्या म्हणण्यानुसार यात बदनाम होत असलेल्या क्लिंटन यांना वाचवण्यासाठी त्याला सेक्स स्कॅन्डल नाव देण्यात आलं. 

अमेरिकेतल्या राजकारणात हे प्रकरण इतके वादग्रस्त बनले की कित्येक वर्षांनंतर लोकं आजही त्याबाबत चर्चा करतात. कुणी म्हणतं हे सेक्स स्कॅन्डल होतं कुणी म्हणतं हे प्रेम प्रकरण होतं. पण काहीही असो या प्रेमप्रकरणामुळे अमेरिकेच्या राजकारणात क्लिंटन यांची प्रतिमा डागाळली ते कायमचीच आणि मोनिकाचं आयुष्य देखील आव्हानात्मक बनलं/

ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं ते केनेथ स्टार मृत्यू पावले आणि अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक प्रकरण संपलंय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.