महाराष्ट्रात देखील ममता दीदींनी काँग्रेसला फाट्यावर मारत सेना राष्ट्रवादीला महत्व दिलंय

देशाच्या राजकारणात काय खलबतं चाललीत हे आपण पाहतोच आहोत पण राज्याच्या राजकारणात जेंव्हा राष्ट्रीय राजकीय नेते एंट्री करतात तेंव्हा काहीतरी विशेष ‘घडतंय’ असं वाटतं…फक्त वाटतच नाही तर तसं चित्र देखील स्पष्ट होतंय…आम्ही बोलतोय ते म्हणजे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा आणि त्यांची आदित्य ठाकरे यांना दिलेली भेट..

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा चालूये कि, ममता दिदींनी काँग्रेसला डिवचून  शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेतायेत आणि त्यामागे चर्चा अशी आहे कि ममता दीदींच्या मनात काहीतरी नवीनच राजकीय समीकरण चालू आहे..

भाजपला देशाच्या राजकारणातून समूळ काढायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांची आघाडी महत्वाची आहे असं आता काही मोठ्या विरोधी नेत्यांनी मनावर घेतलं तर काही प्रादेशिक पक्ष अजून या प्रक्रियेमध्ये एकएक करत सामील होतायेत. आता या तिसऱ्या आघाडीत महत्वाचा रोल बजावू शकणारा मोठा पक्ष होता तो म्हणजे कॉंग्रेस.

अगदी आत्तापर्यंत ममता यांचे आणि कॉंग्रेस चे सबंध चांगलेच होते. पण एक-एक करत कॉंग्रेसचे बडे-बडे नेते तृणमूलमध्ये जायला लागले त्यामुळे कॉंग्रेसचं नुकसान झालं. त्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तृणमूलला थेट पाठींबा न देता बाहेरून पाठींबा दिला होता…

मागे दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान जेंव्हा माध्यमांनी ममता दीदींना प्रश्न केलेला कि, तुम्ही सोनिया गांधींना भेटणार का ? तेंव्हा त्यांनी संतापून उत्तर दिलेलं कि, बार बार मै सोनिया गांधीको क्युं मिलू ???

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १२ राज्यसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले.त्यात तृणमूलच्या खासदारांचा देखील समावेश आहे. याच संबंधी राहुल गांधीनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती  मात्र ममता दिदींनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला.

त्यामुळे …… गेल्या राजकीय घडामोडी पाहता ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षांचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झालेय.  

मग हे दोन पक्ष सोडले तरीही ममता दिदींनी हार न मानता प्रादेशिक पक्षांना आपल्या सोबत घ्यायला सुरुवात देखील केली आहे. त्यांनी अलीकडेच दिल्ली दौरा केला त्यातही त्यांनी विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. याचाच भाग म्हणजे त्यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी भेट.

सद्या त्या मुंबईच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरतोय कारण महाराष्ट्रात, महाविकास आघाडीचे सरकार आहे. याच आघाडीतल्या कॉंग्रेस पक्षासोबत मात्र ममता दीदींसोबत बिघाडी झाल्यामुळे ममता दीदींनी देखील कॉंग्रेस ला सरळ फाट्यावर मारत शिवसेना, राष्ट्रवादीला स्पष्ट महत्त्व दिले आहे. यामागे नक्कीच ममता दीदींचा फायदा आहे हे तर नक्की …

या दौऱ्यादरम्यान त्यांनी, जय मराठा जय बंगाल’ नारा दिला.  तसेच आणखी एक म्हणजे त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भेट दिली. आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या भेटीसर्म्यान त्यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी सुभेच्छा दिल्या. 

त्याचा भाग म्हणजे उद्या ममता बॅनर्जी यांची शरद पवारांची भेट.

ममता बॅनर्जीं सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान सेनेचे नेते देखील उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जातोय. राजकीय वर्तुळात  तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. याच पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  

२०२४ ला मोदींना टक्कर देण्यासाठीच्या तिसऱ्या आघाडीत कोण पुढ येणार हे महत्वाचं तर आहेच शिवाय, महाराष्ट्रात तृणमूल सेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करणार का ? त्यात शरद पवारांना काय स्थान असणार आहे ? महाराष्ट्रात नवीन राजकीय घडामोडी आणि राजकीय समीकरणे काय असतील या अनुषंगाने हि भेट अत्यंत महत्वाची ठरणार आहे हे मात्र नक्की. 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.