मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळं एका रात्रीत गावातला प्रत्येकजण करोडपती झाला होता

भारत हा मूळ खेड्यांचा देश आहे. गावं ही आपली ओळख असून त्यांचं सक्षमीकरण केलं तरंच देशाचा विकास होईल, असं महात्मा गांधी देखील म्हणायचे. ‘खेड्याकडे चला’ असं त्यांचं म्हणणं होतं. देशाचं खरं अर्थकारण गावांशी जोडलं गेलेलं असतं. 

प्रत्येक राज्याचं राजकारणही गावापासून सुरु होत असतं. निवडणूक आल्यावर तर हे जास्त बघायला भेटतं. कधीही गावांकडे वळून न बघणारे नेते यावेळी वोट मागण्यासाठी गावोगाव फिरताना आपण बघतो. भारताचा विचार केला तर खेडे, आणि गावं असलेली राज्य ईशान्य भागात जास्त आहेत.

या भागातील गावाचं नाव घेतलं तर अरुणाचल प्रदेशचे एक गाव चटकन लक्षात येतं, ते या गावाच्या इतिहासामुळे. अरुणाचल प्रदेशमध्ये असं एक गाव आहे जे रात्रीतून श्रीमंत झालं आणि आशियातील सगळ्यात श्रीमंत गावाचा मान त्याने मिळवला. असं करण्यामागे एका मुख्यमंत्र्यांचा वाटा होता.

हे गाव म्हणजे ‘बोमजा’ आणि ज्या मुख्यमंत्र्यांमुळे हे शक्य झालं ते म्हणजे ‘पेमा खांडू’.

२०१८ ची ही गोष्ट आहे. झोपेतून जेव्हा सगळा देश जागा झाला आणि एक बातमी कानी पडली तेव्हा एकच आश्चर्य देशभरातील लोकांच्या चेहऱ्यावर दिसलं. प्रत्येक न्युज चॅनेल आणि बातम्यांच्या स्रोतांवर एकाच गावाचं नाव होतं – बोमजा.

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील बोमजा गावातील प्रत्येक व्यक्ती करोडपती झाला होता याचं कारण होतं ‘भरपाई’.

सरकारने भूसंपदानाच्या बदल्यात तवांग जिल्ह्याच्या या गावातील २०० एकर जमीन घेतली होती. तसं तर पाच वर्षांपूर्वी ही जमीन घेतली होती मात्र त्यांची भरपाई रक्कम या गावातील लोकांना २०१८ मध्ये देण्यात आली. हा पुढाकार घेतला तो तत्कालीन मुख्यमंत्री ‘पेमा खांडू’ यांनी. पेमा यांनी गावातील लोकांचा हक्क जाणत प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्काचे पैसे दिले.

गावात तेव्हा एकूण ३१ कुटुंब राहत होते. पेमा खांडू यांनी भरपाई दिल्याची बातमी त्यांच्या ट्विटरवरून निश्चित केली होती. त्यात त्यांनी भरपाई रक्कमेचा आकडा लिहिला होता, जो ४० करोड ८० लाख ३८ हजार ४०० रुपये इतका होता. प्रत्येक कुटुंबाला चेकच्या रुपात हे पैसे देण्यात आले. भरपाई रकमेनुसार प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी १ करोड रुपये तर भेटलेच होते. यात फक्त एक कुटुंब होतं ज्याला जवळपास ६ करोड ७३ हजार रुपये भेटले होते.

पेमा खांडू यांनी बोमजाच्या रहिवाशांना रात्रीतून श्रीमंत केलं होतं. बोमजा गाव भारताचंच नाही तर आशियातील पाहिलं गाव बनलं जिथे राहणारं प्रत्येक कुटुंब करोडपती होतं. 

१९६२ च्या भारत-चीन युद्धापासून तवांग जिल्हा राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. तवांगपासून बोमजा गाव ५० किमी अंतरावर असून भूतानच्या सीमेपासून त्याचे अंतर फक्त पाच किलोमीटर आहे. शिवाय हा तोच भाग आहे जिथे १९६२ च्या युद्धात ४ गढवाल रायफल्सचे रायफलमन जसवंत सिंह रावत यांनी शाहिद होण्यापूर्वी एकट्याने शत्रूच्या ३०० सैनिकांना मारलं होतं. म्हणून संरक्षण मंत्रालय या जमिनीवर लोकेशन प्लॅन युनिट बनवणार होतं. त्याचसाठी गावातील लोकांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या.

मात्र सरकारने जमीन घेऊन गावाला दुर्लक्षित केलं होतं. जेव्हा खांडू यांच्या प्रकार कानी पडला तेव्हा त्यांनी तात्काळ ऍक्शन घेतली होती, परिणामी आशिया खंडाला आणि भारताला त्यांचं पाहिलं श्रीमंत गाव भेटलं होतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.