HIV, पोलिओ अन् कोरोना, गेली १२१ वर्षे भारतात पहिलं निदान या हॉस्पिटलमध्येचं होतं.
सध्याच्या महामारीच्या साथीने अनेक हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टर लोकांना कुठे कौतुक तर कुठे शिव्या आणि काही ठिकाणी तर मारही खावा लागला होता. हॉस्पिटलच्या कमतरता आणि कोरोना महामारीवर निदान काय अशा पेचात लोक सापडले आहेत मात्र एक हॉस्पिटल यशस्वीरीत्या अशा गोष्टींना मागील १२१ वर्षांपासून तोंड देत आलंय.
हे हॉस्पिटल म्हणजे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल. सीएमसी [ CMC ]वेल्लोर या नावाने हे कॉलेज आणि हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. वेल्लोरमध्ये या हॉस्पिटलच्या विविध टप्प्यात शाखा आहेत. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये एका महिलेमुळे या हॉस्पिटलची निर्मिती झाली.
१९०० सालामध्ये अमेरिकेच्या ‘ इडा एस स्कुडर ‘ या महिलेने CMC वेल्लोर हॉस्पिटलची स्थापना केली.
१८७८ मध्ये इडा आणि तिचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं. तिथे इडा शिकत होती. नंतर इडाचे आईवडील भारतात आले इडा मात्र तिथेच राहिली. भारतात तिची आई आजारी असताना आईने तिला गोरगरिबांची मदत करायला सांगितलं आणि तेही विना पैसे आकारता. आईसाठी ती भारतात आली तेव्हा एकदा एक माणूस निम्म्या रात्री तिच्याघरी मदत मागायला आला कि प्रसूतीसाठी डॉक्टरची गरज आहे वेदनेने त्या बायका कळवळत आहेत. पण तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जाऊ दिलं नाही.
इडाला सकाळी समजलं कि उपचाराअभावी त्या तीन महिलांचा मृत्यू झाला. त्या घटनेतून प्रेरणा घेत इडा एस स्कुडरने डॉक्टर बनण्याचा निश्चय केला आणि भारतात राहून रुग्णांची सेवा करण्याचं ठरवलं. १८९५ मध्ये ती पुन्हा अमेरिकेत गेली आणि जिद्दीने शिकू लागली. १८९९ पर्यंत ती डॉक्टरी मध्ये निष्णात झाली होती. भारतात येऊन १९०० मध्ये तिने एक सिंगल बेड क्लिनिक सुरु केलं.
१९०२ मध्ये ४० बेडचं क्लिनिक तयार झालं. १९०३ मध्ये महिलांना सोबत घेऊन आणि महिलांना हॉस्पिटलमध्ये काम देण्यास सुरवात केली. १९१८ मध्ये महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी एक शाळा सुरु काण्यात आली. सरकारने १९३८ मध्ये घोषणा केली कि हे विश्व विद्यालय आहे मग इडाने या शाळेत MBBS कोर्स सुरु केला. पुढे १९४६ मध्ये भारतातील पहिलं नर्सिंग सेन्टर सुरु करण्यात आलं.
हळूहळू पदवी पर्यंत शिक्षण सुद्धा सुरु करण्यात आलं. कमी पैशात इलाज करून मिळत असल्याने लोकांची गर्दी वाढू लागली. CMC ने फक्त देशातील पहिलं नर्सिंग सेंटर सुरु केलं नाही तर प्रशिक्षण आणि अभ्यासही सुरु केला. जगभरातील दुर्मिळ रोगांवर निदान करून CMC ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतात कोड या त्वचारोगावर इलाज नव्हता पण CMC ने यशस्वीरीत्या तिच्यावरही इलाज काढला.
एचआयव्ही, पोलिओ आणि किडनी ट्रान्सप्लांट अशा अनेक अशक्य गोष्टींवर CMC ने इलाज काढला.
पहिली ओपन हार्ट सर्जरी, एचआयव्ही तपासणी, कुष्ठरोगावर पहिल्यांदा आधुनिक शस्रक्रिया वेल्लोरच्या या हॉस्पिटलने करून दाखवल्या आणि यशस्वीही झाल्या.
भारतात पसरले जाणारे साथीचे रोग हे कायम मोठी जीवितहानी करत असते त्यावर सुद्धा CMC कॉलेजने इलाज सुरु केले.
कोरोना महामारीच्या काळातही हे हॉस्पिटल नेटाने लढत होते. इतक्या वर्षाचा अनुभव आणि साथीच्या रोगांमुळे उदभवणारे परिणाम याची कल्पना असताना CMC ने ३ हजार बेड असलेलं वॉर्ड सुरु केलं होतं. उत्तम आणि तज्ञ् डॉक्टर, रुग्णांना सगळ्या सुविधा अशा सगळ्या आधुनिक गोष्टींनी सुसज्ज असलेलं हे भारतातील सगळ्यात उत्तम हॉस्पिटलपैकी एक आहे.
मेडिकल कॉलेज असल्याने इथे विद्यार्थ्यांना माफक फी आणि उच्चशिक्षण दिलं जातं. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये अत्यंत खेळकर आणि मैत्रीपूर्ण वातावरन असतं. टी.जेकब जॉन यांच्या पोलिओ प्रोग्रॅममुळे वेल्लोर हे भारतातील पहिले पोलिओ-मुक्त शहर बनले होते.
१२१ वर्षांपासून हे हॉस्पिटल रुग्णांची सेवा करत आहे आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण देत आहे. कोविड काळातसुद्धा CMC हॉस्पिटल रुग्ण बरे होण्याच्या लिस्टमध्ये वरच्या रांगेत होतं. भारताच्या महत्वाच्या आणि मोठ्या हॉस्पिटलांच्या क्रमवारीत CMC हॉस्पिटलचा फार वरचा नंबर लागतो.
हे हि वाच भिडू :
- सरकारकडे कोटा नाही म्हणून लसीकरण थांबले पण खासगी हॉस्पिटलला लस उपलब्ध कशी?
- इंग्रज पोलिसांशी प्राणपणाने लढली, अखेर तिच्याच नावाने दिल्लीत पोलीस हॉस्पिटल उभं राहिलं..
- भारताच्या दुसऱ्या महिला डॉक्टर कृष्णाबाईंकडे कोल्हापूरचं अख्खं हॉस्पिटल सोपवलं…
- केंद्र सरकार निधी देत नव्हतं, लाईट बिलात १ पैसा वाढवून त्यांनी हे हॉस्पिटल उभं केलं..