सरकारनं एक आयडिया केलीय, कोळशाचा वापर करून पेट्रोलच्या किमती कमी करणार आहेत

गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आपण सगळेच वैतागलो आहोत. त्यात कच्च्या तेलाच्याचं किमती वाढल्याने सरकारचेच हात बांधल्यासारखे झालेत. हो.. पण काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं आपल्या स्तरावर पेट्रोलमध्ये ५ तर डिझेलमध्ये ११० रुपयांच्या कपातीची घोषणा केली. ही कपात काही राज्यांनी आपल्या इथे लागू केली, खास करून आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांनी.

पण ,महाराष्ट्र सारख्या इतरही राज्यांनी खर्च झेपणारा नाही म्ह्णून ही कपात लागू केली नाही. असं बोललं जातंय. पण यावरून एवढं तरी समजतंय निवडणुकीच्या तोंडावर का असेना, पण सरकारसुद्धा पेट्रोलियम पदार्थांच्या किमती खाली याव्यात म्ह्णून प्रयत्न करतंय. तेही स्वतःच्या तिजोरीवर भार टाकून.

यातल्याच एक प्रयत्न म्हणजे पेट्रोलमध्ये १५ ते २० टक्के  इथेनॉल आणि मिथेनॉल मिक्स करणं, ज्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. या प्रयत्नानं थोड्या प्रमाणात का होईना पेट्रोलच्या किमती खाली येऊ शकतात, असं म्हंटल जातंय. पण आता इथं मुद्दा आहे कि, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल आणि मिथेनॉल आणायचं तरी कुठून ?

आता थोडी आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात २०१९ – २० या वर्षात इथेनॉलचं उत्पादन ७४ कोटीच्या आसपास होत. तेच आता वाढवून ३३० कोटीपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहे. तर मिथेनॉलच्या बाबतीत भारतात दरवर्षी २ मिलियन टन उत्पादन होत. आणि देशात दररोज ४,२८१ हजार बॅरल पेट्रोल लागत. आता पेट्रोलमध्ये  १५ ते २० टक्के जरी इथेनॉल- मिथेनॉल मिसळायचं म्हणतात तरी तुटवडा जाणवणार. अश्यात या इथेनॉल आणि मिथेनॉलच्या उत्पादनावर आणखी भर देणं भाग आहे.

यावर तोडगा म्ह्णून केंद्र सरकारनं अलीकडेच कोळशाच्या गॅसिफिकेशनवर बोललं आहे. असं म्हंटल जातंय  कि, कोळशाच्या या गॅसिफिकेशन प्रोसेसमुळे येत्या १० वर्षात  इथेनॉल, मिथेनॉल आणि सिंथेटिक वायूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येईल.

आता कोळशाचा गॅसिफिकेशन हा नेमका काय प्रकार आहे ते आधी जाणून घेऊ, तर गॅसिफिकेशन ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या मदतीने जास्तीत- जास्त इथेनॉल आणि मिथेनॉल बनवता येईल.  तर कोळशाचे गॅसिफिकेशन म्हणजे अशी एक प्रोसेस ज्यामध्ये कोळशाली ऑक्सिजन, वाफ किंवा कार्बन डायऑक्साइडद्वारे ऑक्सीडाइज केलं जातं. म्हणजे कोळशाला पूर्णपणे न जाळता अर्धवट जाळून, त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा वापरली जाते.

जेणेकरून इंधन-गॅस बनवता येईल.  हा गरम इंधन वायू वाफ तयार करण्यासाठी वापरला जातो.  या इंधनापासून अनेक प्रकारची इंधने आणि रसायने देखील तयार केली जातात.

तशी तर ही गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी फार जूनी आहे. म्हणजे पार १८०० च्या काळात याची सुरुवात झाली. १८८७ साली जर्मनीतल्या LURGI GmbH कंपनीला याचं पहिलं पेटंट मिळालं. तसचं १९४० च्या दरम्यान  यूरोप आणि अमेरिकेत रस्त्यावरचे दिवे लावण्यासाठी कोळशाच्या गॅसिफिकेशन टेक्निकचा  वापर करण्यात आला होता.

तेव्हापासून आतापर्यंत यात अनेक डेव्हलपमेंट झाली. आज कोळशाचे गॅसिफिकेशन मिथेनॉल, अमोनिया, इथेनॉल आणि वीज निर्मितीसाठी वापरलं जातयं.

आता भारतात कोळशाच्या उत्पादनाविषयी बोलायचं झालं तर असं म्हंटलं जात की, भारतात सुमारे ३४४ अब्ज टन कोळशाचा साठा आहे. पण आपन आतापर्यंत फक्त १६३ अब्ज टन कोळसा शोधू शकलोय.

तरी एका रिपोर्टनुसार,  ज्या प्रकारे आपण कोळशाचा वापर आहोत, म्हणजे माहितीनुसार भारतातील ८० टक्के कोळसा औष्णिक ऊर्जा केंद्रांमध्ये वीज निर्मितीसाठी वापरला जातो. त्यानुसार हा कोळसा पुढच्या ५ दशकांहून अधिक काळ टिकेल. त्यामुळेच या कोळशाचा  बाकीच्या ठिकाणी वापर करायला काही हरकत नाही. एकूणच काय तर गॅसिफिकेशन. जो सर्वात सोपा, परवडणारा आणि चांगला मार्ग आहे. 

या कोळशाच्या गॅसिफिकेशनपासून विविध प्रकारची रसायने तयार केली जातात, जी सामान्यतः भारतात कच्च्या तेलापासून बनविली जातात. त्यामुळे गॅसिफिकेशन हा कच्च्या तेलाचा पर्याय बनू शकतो.

महत्त्वाचं म्हणजे भारतात मिथेनॉल तयार करण्यासाठी  नॅचरल गॅसचा वापर केला जातो.  पण चीन आणि जगातील इतर अनेक देश कोळसा गॅसिफिकेशनपासून मिथेनॉल बनवतायेत.

आता मेन मुद्द्यावर येऊ,  भारत सरकारची एक एजन्सीने अर्थात भारतीय मानक ब्युरो (BIS) ने सांगितले की, पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल वापरले जाऊ शकते. त्यामुळे आपण आधी जी आकडेवारी पाहिली त्यावरून मिथेनॉलची गरज जास्त आहे.  आणि हे मिथेनॉल आपल्याला कोळशाच्या गॅसिफिकेशनद्वारे उपलब्ध होईल.  याशिवाय औषध बनवण्यासाठीही मिथेनॉलचा वापर केला जातो.

आणि तसही २००३ पासून भारतात पेट्रोलमध्ये ५% इथेनॉल मिक्स केलं जाते. त्यात आता सरकारने वाढ करून २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  सिंथेटिक गॅसपासून इथेनॉल सहज बनवता येते.  कोळशाच्या गॅसिफिकेशनद्वारे सिंथेटिक वायू तयार होतो.  सध्या भारतात इथेनॉल ऊस, तेलबिया इत्यादी पिकांपासून बनवले जाते.

बरेच अहवाल असही सांगतात की, इथेनॉल फारसं मिळत नाही कारण ते तयार करण्यासाठी पिकांचा वापर केला जातो.  उत्पादन प्रक्रियेदरम्यान, पिकांची नासाडी वाढते आणि नंतर या पिकांचा वापर होत नाही.  याशिवाय हायड्रोजन, युरिया, डीएपी या शेतीत वापरल्या जाणार्‍या वस्तूही कोळशाच्या गॅसिफिकेशनपासून बनवल्या जातात.  स्टील उद्योगातही त्याचे मोठे योगदान आहे.

आज जगभरात या टेक्निकचा वापर केला जातोय. ज्यात चीन आघाडीवर आहे. चीनने आपल्या अनेक व्यवसायात टेक्निकचा वापर केलाय. म्हणजे असं म्हटलं जातं की,  मिथेनॉलच्या जगभरातील उत्पादनापैकी ५४% उत्पादन एकटा चीन करतो.

जपाननेही यावर बराच रिसर्च केला गेलाय. म्हणजे २०११ मध्ये फुकुशिमा येथे झालेल्या अपघातानंतर.  या तंत्रज्ञानाचा वापर करून जपानमध्ये सध्या ८०० मेगावॅट वीज निर्मिती केली जातेय.

भारतात याचा वापर तसा १९५७० च्या दशकातला. , झारखंडच्या सिंद्रीयेथे कोळसा गॅसिफिकेशन युनिट उघडले.  जे नंतर बंद करण्यात आले.  जिंदाल यांनी अंगुल, ओडिशात एक प्लांट बांधला होता, पण तोही बंद होता.  पण सध्या या दिशेने बरीच प्रगती झाली आहे.  भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने तमिळनाडूच्या त्रिची येथे एक पायलट प्रकल्प चालवला आहे, ज्यामध्ये ६.२ मेगावॅट वीज निर्मीती केली जाते.

सोबतचं, थर्मॅक्स नावाची कंपनी नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २०१५ पासून मिथेनॉल तयार करण्यासाठी गॅसिफिकेशन टेक्निक वापरतेय. तर ओडिशातील तालचर आणि पश्चिम बंगालमधील डांगकुनी येथील काही कंपन्या सुद्धा हे तंत्रज्ञान वापरत आहेत.

त्यात आता सरकार सुद्धा त्याच्याबाबत विचार करतंय म्हंटल्यावर आपणही पॉझिटिव्ह घ्यायला काही हरकत नाही. पण सरकारचा हा विचार प्रत्यक्षात कधी उतरेल हे अद्याप तरी समजलेलं नाही. त्यामुळे आपल्याला अजूनतरी पेट्रोलच्या किमतीला जास्त पैसे मोजावे लागतीलचं. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.