पुण्या- मुंबईत प्रेमाची स्वप्न पाहणाऱ्या खास भ

जनता बस म्हणून हात दाखवला आणि शिवनेरी निघाली. ड्रायव्हर म्हणला दर जनता बसचेच पण गाडी शिवनेरी आहे. बसताय नव्हं. काय करणार बसणार का नाय ?

बसायलाच पाहीजे. तसच हा लेख वाचताना तुमचं होणाराय. कसय प्रेमात एवढं डिटेल कोण सांगत नसत. आणि त्यातही अवघा मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र मनात ठेवून पुण्या मुंबईच्या चकचकीत कॉफी शॉपमध्ये प्रेमाची झुळूक अनुभवायची स्वप्न बघणाऱ्यांना तर असल्या गोष्टी कोणीच सांगत नसतं ?

मग ऐन टायमाला आपला बल्या होता. याच फसगतीमुळे ABP वाले पण विवाहसंस्था काढून बसलेत. असो, मुद्दा असाय की

गेले ते दिवस आत्ता ABP आणि झी वालेपण तुमचा नाकर्तेपणा बघून विवाहसंस्था काढून बसलेत. प्रेमाची भाषा टिंडरमय होवून चार पाच वर्ष झाली पण तुम्ही अजून तिथच. जेवण झाले का विचारून जास्तीत जास्त स्क्रीनशॉट पडतात. प्रेमात नाही पडत. 

आत्ता आर्ची पण १२ वीत गेली आणि तुम्ही तिथच. उठा, जागे व्हा प्रेमाची नवी भाषा समजून घ्या !!! 

क्र १. कुशनिगं आणि बेंचिंग.   

तुम्ही एखाद्या पोरीला घेवून डेटिंगवर गेलात तर ती तुमचा अंदाज घेते. तुमचं मन जेव्हा हिंदोळ्यावर झोके घेत असत तेव्हा तिचं मन देखील हिकडं का तिकडं अस झोकं घेत असत. अशा काळात तुमच्या दाव्यात अजून एक दावेदार असतो. 

कदाचित बेस्ट फ्रेन्डच्या नावाने तिच्या जवळ असणारा हुकमाचा एक्का. तुम्ही फेल झाला तर तो. किंवा असाच एक्का तुमच्याकडे देखील असू शकतो. म्हणजे हि फेल झाली तर ती. तर अशा तिसऱ्या तो आणि ती ला कुशनिंग म्हणल जातं. हक्काचा डाव म्हणजे कुशनिंग. त्याला कुशनसारखं वापरलं जात म्हणून कुशनिंग. आणि बेंचिंग म्हणजे तिसऱ्या माणसाची जी वाट बघण्याची अवस्था असते ती बेंचिंग. म्हणजे तो एखाद्या बाकड्यावर बसला आहे लाईन लावून. नंबर कधी येतोय. तर त्या अवस्थेला बेंचिग आणि त्याला कुशनिंग.

चला पुढे चला गर्दी करु नका !!!!

क्र २. गॅसलायटिंग. 

म्हणजे काय ? म्हणजे तुमचा पोपट होतोय. सारखं सारखं सॉरी म्हणत असाल तर पुढच्या व्यक्तीला गॅसलायटिंग म्हणतात. म्हणजे कस दोघांची जोडी आहे. त्यामध्ये एक अती हूशार आणि चलाख आहे. दूसरा पण बऱ्यापैकी आहे. तर एकजण आपल्या कितीही चूका झाल्या तरी त्या तुझ्या असल्या वागण्यामुळेच झाल्याचं सांगत राहते. आपण तिसऱ्याबरोबर किंवा तिसरीबरोबर पकडलो गेलो तर ते मान्य न करता. तू चुकलास किंवा चुकलीस करुन पुढच्याचा आत्मविश्वास आख्खा खावून टाकण्याच्या प्रकाराला गॅसलायटिंग म्हणायचं.

आलं लक्षात चला चला आत्ता अजून पुढे भारी भारी सांगतो.

क्र ३. ब्रेड क्रंबिंग. 

ब्रेड म्हणजे हा जे तुमच्या मनात आलं तेच. ब्रेड क्रंबिंग म्हणजे. पावाचे तुकडे. चुरा वो चुरा. एकदम चुराच. तर हा चुरा जसा राहतो तस नातं झालं की त्याला ब्रेड क्रंबिंग म्हणायचं म्हणजे कस नुसत नावालाच राहिलय. काहीच नाही. ती बोलली कि आपण बोलतो. तो बोलला की आपण बोलतो असा प्रकार चालू असेल तर ते नातं झालं ब्रेड क्रबिंग.

क्र ४. डिप लायकिंग.

नाव वाचून वाटलं न डिप लायकिंग म्हणजे लय लय प्रेम करणं. दाखवली आपली लायकिंग. तर आत्ता डिप लायकिंग म्हणजे काय ते सांगतो. डिप लायकिंग म्हणजे फेसबुक नायतर इन्स्टावर जावून पुढच्या व्यक्तीचे जुने जुने फोटो लाईक करणे. त्यातून फक्त मी तूला फॉलो करतोय किंवा करतेय हे समोरच्याला सुचवायचं असत या प्रकाराला म्हणायचं डिप लायकिंग.

क्र ५ . ब्रिजिंग आणि DTR.

ब्रिजिंग म्हणजे अशी लोकं जी नात्यातं विश्वास ठेवतात. काहीही झालं तरी ते समोरच्याला सांगत असतात. पण त्याचवेळी ते नात्यांबद्दल तितके सिरीयस नसतात. आपल्याच धुंदीत जगणारी लोकं या कॅटेगरीत मोडतात तर दूसऱ्या बाजूला DTR म्हणजे डिफायन द रिलेशनशीपवाले लोकं असतात. त्यांना नेमकं काय चाललय तेच समजत नाही. म्हणजे पुढच्यासोबत आपण लग्न करणार आहोत का. प्रेम आहे की मैत्री अशा बारा भानगडीत याचं नात असत. अशा वेळी सोबत बसून sort out करायची वेळ आली की त्याला DTR म्हणलं जातं.

क्र ६. कॅच एन्ड रिलीज.

कॅच एन्ड रिलीज म्हणजे धरसोडपणा. आपण या गोष्टीला वापरून घेणं म्हणतो. म्हणजे अशी लोकं एका लिमिट नंतर समोरच्या व्यक्तीबद्दल बोअर होतात आणि त्याला सोडून देतात. त्यांना कंटाळा येतो. म्हणून या प्रकाराला कॅच एन्ड रिलीज म्हणायचं. साधारणं रिलेशनशीपची वेळ आली की अशी माणसं पळ काढतात तोपर्यन्त सगळं गुडी गुडी चाललेलं असतं.

क्र ७ घोस्टिंग हॉन्टिंग आणि जॉम्बीईंग. 

बोअर झाल्यानंतर अचानक गायब होण्याच्या प्रकाराला घोस्टिंग म्हणलं जात. म्हणजे अशा काळात समोरची व्यक्ती अचानक गायब होते. फेसबुकवर ब्लॉक करते. कोणत्याच प्रकारचे संबध ठेवत नाही आणि थेटपणे रिलेशन संपल्याच सांगत देखील नाही. फक्त संबध तोडून देते त्याला घोस्टिंग म्हणतात. हॉन्टिंग म्हणजे पुन्हा अशा लोकांच प्रेम उफाळुन येत आणि ती व्यक्ती तुम्हाला सोशल मिडीयावर अनब्लॉक करते. तुमचे जुने पुराने फोटो पुन्हा लाईक करु लागते त्या प्रकाराला हॉन्टिंग म्हणतात. आत्ता त्याचा पुढचा प्रकार म्हणजे जॉम्बीईंग म्हणजे सोशल मिडीयातून प्रत्यक्षात पुन्हा रिलेशनशीपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणे या प्रकाराला म्हणायचं जॉम्बीईंग.

क्र. ८ किटन फिशिंग.

सोशल मिडींग, टिंडर यासारख्या ठिकाणी बढाया मारून आपण पुढच्यासाठी एकदम परफेक्ट असल्याची वातावरण निर्मीती करणं म्हणजे किटींग फिशिंग. या प्रकाराला थोडक्यात सांगायच तर जाळ्यात ओढणं म्हणायचं.

क्र. ९ मंकीइंग आणि पिकॉंकिंग.

मंकिइंग म्हणजे एका झाडावरुन दूसऱ्या झाडावर जाणं. जस माकडं एका झाडावरुन थेट दूसऱ्या झाडावर उड्या मारतं अगदी तसच. या प्रकारात व्यक्ती दोन रिलेशनशिपमध्ये अंतर ठेवत नाहीत एक झालं की दूसरं. लगेच तिसरं ब्रेक वगैरे काही नसतच म्हणून मंकीइंग आणि तसच पिकॉंकिंग म्हणजे मोर कसा नटतो. पावसाळ्याच्या सुरवातीला पिसारा फुलवून नाचू लागतो. तसे सुरवातीला सजणाऱ्याला, नाचणाऱ्याला पिकॉंकिंग म्हणतात. साधारण या दोन्ही गोष्टी एकाच माणसात येतात. म्हणजे प्रत्येक झाडावर उड्या मारताना तितकच सजून मारण्याकडे यांचा कल असतो.

 क्र. १० स्लो फेड. 

नावावरुन लक्षात आलच असेल. अशी लोकं हळूहळू वॉटसअपचा ब्लू डॉट घालवतात. पहिल्यांदा आलेला इंटरेस्ट हळुहळु ओसरतो. अशा लोकांना कमिटमेंट नको असते. ते फक्त काही वेळेच्या बोलण्यामुळे प्रभावित होतात. नंतर वातावरण ओसरलं की शांत होतात या प्रकाराला म्हणायचं स्लो फेड.

क्र ११ थर्स्ट ट्रप. 

म्हणजे वातावरण निर्मीती. अशा व्यक्ती महाराणी अथवा महाराजासारखं आपल्या आजूबाजूला वातावरण असल्याची वातावरण निर्मीती करतात. आपण टॉम क्रुझ आहोत किंवा मीच महाराणी एलिझाबेत असल्याच वातावरण निर्माण करतात. समोरचा बोलत असेल तर इंटरेस्ट दाखवत नाहीत पण डाव साधतात अशा लोकांच्या वागण्याला थर्स्ट ट्रॅप म्हणायचं असत.

क्र. १२ कफिंग आणि अनकफिंग. 

काही जणांच सिझनेबल असत. आपल्याकडे जस श्रावणात मटण पाळतात तस मौसम बघुन प्रेमात पडणारे लोक असतात. ते या कॅटेगरीत येतात. पावसाळा आला की प्रेमात पडणारे आणि उन्हाऴा येईपर्यन्त सिंगलतेचे गोडवे गाणारे लोक कफिंग आणि अनकफिंग म्हणून ओळखले जातात.

तर हे झाले प्रेमाचे रंग. ते पण इंग्लीश. जग सारखच आहे. प्रेम पण सारखच आहे. फक्त आपणाला रंग उधळता आले पाहीजेत. ते कधी मोरासारखे तर कधी माकडासारखे पण या सगळ्यांमध्ये प्रेम कस करायचं ते सांगणार कोणतर पाहीजे. आम्ही आमच्या परीने तुमच्यासाठी लढत राहू. तुमच्या ज्ञानात भर पाडत जावू. तुम्ही तुमच्या पातळ्यांवर काम करत रहा.

Leave A Reply

Your email address will not be published.