सचिन आणि विराट राहिले बाजूला, पोरानं घरच्यांना पण सोडलं नाही.

कॉफी विथ करण. भारतातलं सर्वात मोठं गॉसिपचं केंद्र.

या सिरीयलच्या एकेका एपिसोडवर न्यूज चॅनलचा एकएक आठवडा निघतो. आत्ता पर्यंत या सिरियलमध्ये फिल्म सेलिब्रिटी येऊन एकमेकाबद्दल कुचाळक्या करायचे, कॉफी हॅम्परसाठी भांडायचे आणि नंतर इथ का आलो याचा पश्चाताप करत निघून जायचे. आपण पण चवीनं हे सगळ बघायचो खोटं कशाला बोला.

यावर्षीचा सिझन तसा करण जोहरच्या मानानं सपकच होता. त्याची एकेकाळची बेस्ट फ्रेंड नंबर १ आणि त्याची काही दिवसापूर्वीची शत्रू नंबर १ असलेली काजोल आपल्या नवऱ्याला म्हणजेच करण जोहरचा पर्मनंट शत्रू अजय देवगणला घेऊन आली. पण काही नाही.

रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका आणि सध्याची करंट गर्लफ्रेंड आलिया हे कॉफी काउचवर एकत्र आले. तेव्हा सुद्धा काही नाही. करण जोहरच्या हाती काही लागलेच नाही.

कॉफी विथ करण चा टीआरपी कमी झाल्यामुळे करण जोहरपेक्षा आम्ही मिडीयावाले जास्त नाराज होतो. आमीर, अक्षय, रणवीर अशा फिल्मस्टारनासुद्धा काही जमलं नाही. आम्हाला वाटलं आता करण जोहर चिडून तैमुरला शो मध्ये आणतय. पण त्या आधीच कॉफीच्या या शोला सावरलं क्रिकेटच्या नवीन स्टार्सनी.

एक काळ होता क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून फेमस होता. आता तो विराट आणि रवी शास्त्रीचा गेम म्हणून फेमस आहे. आता कोणी आपल्या खेळाडूंना “अरे” म्हटले तर ते फक्त “का रे “म्हणत नाहीत तर त्याची मारत्यात. या गेम मध्ये एकेकाळी एक्स्पर्ट असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच होमपिचवर कोहली आणि कंपनीने  सपशेल मारली. 

कधी नव्हे ते ऑस्ट्रेलियात कसोटी सिरीज जिंकल्याचा आनंद साजरा करत होतो तर शास्त्री म्हणाले, “८३च्या वर्ल्डकप पेक्षा मोठा विजय.” सगळा मुडच गेला,

मग कॉफी विथ करण बघायला घेतलं. इथं आले होते फेक वेस्ट इंडियन हार्दिक पांड्या आणि फेक राहुल द्रविड के.एल.राहुल. दोघांनी पण करणच्या पीचवर फुल्ल बॅटिंग केली.

तसही ऑस्ट्रेलियासिरीज मध्ये दोघांना विशेष काम नव्हते. हार्दिक साहेब तर आधीच दुखापतीमुळे बाहेर होते. तसंही गेले वर्ष भर टीमसाठी हे भारवाहकच होते. के.एल राहुलसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये पहिली मॅच सोडली तर दुहेरी आकडा सुद्धा गाठू शकला नाही. मग कॉफी पे महाचर्चा तो बनता है.(सिरीयलचं शुटिंग या सिरीजच्या आधी झाले आहे लगेच तापू नका)

तर विषय असा की कॉफीच्या कोचवर बसल्यावर अनेक जण रिलॅक्स होतात. हार्दिक जरा जास्तच रिलॅक्स झाला होता.  तिथं रॅपिड फायर गप्पा त्याने मारल्या. याची उदाहरणं

आपल्याला बार मध्ये भेटलेल्या पोरींची नावं लक्षात राहत नाही.

आपण चीअरलीडरकडे खेळताना बघत पण नाही कारण मॅच संपल्यावर त्यांना घेऊनच जायचं असत.

आपण शाळेत दुसरीपासून नापास होत होतो पण शाळेला १००% रिझल्टच्या नियमामुळ आपल्याला पुढ ढकलाव लागलं.

मी फक्त नववी पास असल्यामुळे मला हिंदी, गुजराती सुद्धा वाचता येत नाही.फक्त थोडीफार इंग्लिश वाचता येत.

पहिल्यांदा सेक्स केल्यावर आपण घरच्यांना ओरडून सांगितलेलं “मै कर के आया है.” घरच्यांना माझ कौतुक वाटलं.

मी मनापासून वेस्टइंडियन आहे. घरच्यांना मी नेहमी विचारतो मी तुमचाच मुलगा आहे ना?

पबमध्ये मी पोरींच्या हालचाली बघतो कारण नंतर त्यांच्या हालचाली कशा असतील याचा मला अंदाज येतो.

पार्टी मध्ये माझे पालक माझ्या आयटमबद्दल विचारतात. मी त्यांना दाखवतो मग त्यांना माझा अभिमान वाटतो.

पब मध्ये मी फ्लर्ट करताना पोरीना एक गोष्ट नक्की सांगतो,”हार्डडिक आल्वेज”

मी ड्रेसिंगरुममध्ये येता जाता सगळ्यांना धपाटा घालतो.

सचिन तेंडुलकर पेक्षा विराट कोहली चांगला फलंदाज आहे.

 

आता तुम्हीच ठरवा यातल्या कोणत्या वाक्यावर तुमच्या भावना दुखावतात ते. पोरानं स्वतःच्या घरच्यांना सोडलं नाही मग विराट सचिन मागाहून आले.

पण काहीही म्हणा गडी आहे खरा प्रामाणिक. मनात काही ठेवत नाही. काहीजण म्हणत आहेत भावी कपिल देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हार्दिकच्या हातात बॅटबॉलपेक्षा कॉफीचा मगच जास्त शोभतो. करण जोहरला हार्दिक प्रार्थना करू की तुझा थोडा रंगेबेरंगी कपडे चेन बूटचा खर्च वाढेल पण हे वेस्टइंडियन बेणं तुझ्याजवळ ठेवून घे.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.