जगभरात १८० लाख लोकांचा बळी घेणाऱ्या रोगाचं निदान करणं भारतामुळे शक्य झालं

तुम्हाला सांगून पटणार नाही पण कॉलरा हा सर्वात घातक रोगांपैकी एक होता.

आज या रोगामुळे माणूस दगावल्याची उदाहरणे देखील कमी आहेत.

पण एक काळ होता तेव्हा कोरोनाच्या कित्येक पट अधिक असे या रोगाने थैमान घातले होते. आकडेवारीत सांगायचं झालं तर १८१७ च्या सुमारास १८० लाख लोकांचा मृत्यू कॉलरामुळे झाला होता. इतिहासाच्या पानांवर ब्लॅक डेथ म्हणून ज्या पद्धतीने प्लेगचा उल्लेख केला जातो त्याचप्रमाणे ब्लू ़डेथ म्हणून कॉलराचा उल्लेख केला जातो.

कॉलरा हा व्हीब्रीओ कॉलरा नावाच्या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा संसर्ग आत़ड्याला झाल्यामुळे जुलाब सुरू होतात. मानवी मैला पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्या पाण्याद्वारे हा जिवाणू इतरांच्या शरिरात प्रवेश करतो आणि रोगाचा प्रसार सुरू होतो.

पण कॉलरा याच जिवाणूमुळे पसरतो ही माहिती १८१७ च्या सुमारास नव्हती. त्यामुळे बरेच बळी या रोगामुळे झाले. १८८४ मध्ये रॉबर्ट कॉख या वैज्ञानिकांनी व्हीब्रीओ कॉलर या जिवाणूचा शोध लावला. साथीचा रोग पसरल्यानंतर कारण शोधण्यासाठी सुमारे ७५ वर्षांचा कालखंड केला.

पण या सर्व घडामोडीत आपणाला एका व्यक्तींच नाव माहित असणं गरजेचं आहे. कारण ते नसते तर कॉलराची कारणे आणि निदान लागणं अशक्य झालं असतं.

शंभूनाथ डे यांच नाव आपण कधीच ऐकलं, वाचलं नसणार. प. बंगालमधले हे वैज्ञानिक अनेकांच्या विस्मृतीत गेले पण याच व्यक्तीमुळे कॉलराच निदान लागू शकलं आणि लाखों लोकांचे प्राण वाचू शकले.

१ फेब्रुवारी १९१५ हा ही शंभूनाथ डे यांच्या जन्माची तारीख. म्हणजेच कॉलराची साथ आल्यानंतर सुमार ९८ वर्षानंतर तर व्हिब्रोओ कॉलर या जिवाणूचा शोध लावल्यानंतर सुमारे ३१ वर्षानंतर त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म प.बंगालमधल्या हुगली जिल्ह्यातला.

अभ्यासात हुशार असणाऱ्या शंभूनाथ डे यांना कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून स्कॉलरशीप मिळाली. १९३९ मध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यास सुरवात केली होती. पण आपण रिसर्चमध्ये काम करावं अशा इच्छेखातर त्यांनी १९४७ मध्ये लंडनच्या यूनिव्हर्सिटी कॉलेजच्या कैमरोन लॅबमध्ये पीएचडी साठी प्रवेश मिळवला.

इथे त्यांना पॅथोलॉजिस्ट सर रॉय कैमरॉन हे त्यांचे मेंटर होते.

कैमरॉन यांच्या हाताखाली काम सुरू झाले. शंभूनाथ डे ह्रदयाच्या संबधातून अभ्यास करत होते. पण त्या काळात भारतात साथीच्या रोगांच थैमान सुरूच होतं. पीएचडी पुर्ण झाल्यानंतर ते कोलकत्याला परत आले आणि कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पॅथोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहू लागले.

याच काळात बंगालमध्ये कॉलराची साथ थैमान घालत होती.

ब्लू प्लेग अर्थात पटकीचा आजार जोरात वाढू लागलेला. नव्यानेच भारताला स्वातंत्र मिळालं होतं. कोलकत्याची हॉस्पीटल्स तेव्हा कॉलराच्या पेशंटमुळे भरून गेली होती. त्यावेळी शंभूनाथ डे यांनी कॉलरावर रिसर्च सुरू केला.

रॉबर्ट कॉख यांनी शोधलेल्या कारणांचा त्यांनी शोध घेतला  तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रॉबर्ट कॉख यांनी जिवाणू तर योग्य शोधला आहे पण तो रक्तातून शरिरात पसरतो असं कारण दिलं आहे.

रॉबर्ट कॉख यांनी व्हिब्रीओ कॉलरी ज्या प्रकारे शरिरात प्रवेश करतो त्याच कारणच चुकिच दिलं होतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी शोध घेतला आणि सांगितलं की व्हिब्रोओ कॉलरी रक्तातून नाही तर पाण्यातून शरिरात प्रवेश करतो. हाच शोध इंग्लडमध्ये डॉ. जॉन स्नो यांनीही लावल्याचं सांगण्यात येत.

तो लहान आतड्यात जावून टोक्सिन सोडतो व त्यामुळे रक्त घट्ट होवू लागतं. त्यामुळे शरिरात पाण्याची कमतरता जाणवू लागते.  शरिरात डिहाड्रेशन होतं याचे कारणे सांगण्यात आली.

१९५३ साली त्यांचा हा शोध प्रकाशित करण्यात आला. त्या आधारावर ORS अर्थात ओरल डिहाड्रेशन सॉल्यूशन बनवण्यात आलं. त्यानंतरच्या काळात रोगी व्यक्तींना आवश्यक प्रमाणात पाणी देवून जीव वाचवण्यास सुरवात करण्यात आली.

१९५९ मध्ये त्यांनी या जिवाणूंमुळे उत्पन्न होणारे टॉक्सिन हे एक्सोटोक्सिन असल्याचा शोध लावला. शंभूनाथ डे यांनी या टोक्सिनवर काम करण्यास सुरवात केली मात्र पुरेशा साधनांअभावी त्याचा शोध इथेच थांबला.

त्यानंतरच्या काळात लोक त्यांना विसरून गेले. १९७३ साली ते रिटायर झाले. १९७८ साली नोबेल फाऊंडेशन मार्फत त्यांना गेस्ट स्पिकर म्हणून बोलवण्यात आलं. एकाहून अधिक वेळा नोबेल पुरस्कारांसाठी त्यांच नाव सुचवण्यात आलं होतं. जगभरातले अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले.

मात्र भारतात आजही हे नाव अनेकांना माहित नाही. तरिही आपण अभिमानाने सांगू शकतो जगभरातल्या १८० लोकांचा बळी घेणाऱ्या रोगाचं निदान भारताने शोधलं होतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.