कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यातली पुढची परिस्थिती काय असेल?

जवळपास गेल्या २ वर्षांपासून कोरोनानं अख्ख्या जगभरात थैमान घातलंय. करोडो लोकांना संक्रमित केलेल्या या विषाणूनं आतापर्यंत लाखो लोकांचे जीवही घेतलेत. या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन असे अनेक निर्बंध लादण्यात आले. पण जेव्हा कधी वाटत कि, आता परिस्थिती आटोक्यात आलीये, सगळं काही पुन्हा सुरळीत सुरु होईल, अश्यात या कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर उभा असतो.

आता सुद्धा कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरियंटनं जगभरात खळबळ माजवलीये. संक्रमितांच्या आकड्यात  दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळतेय.  महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाची ही तिसरी लाट वेगाने पसरतेय. म्हणजे आपण गेल्या आठवड्याभराचा जर आकडा पहिला तर तो ५ पटींनी वाढलाय. 

जर आपण आकडेवारीवरून पाहिलं तर  गेल्या २४ तासात कोरोनाचे १८ हजार ४६६ रुग्णांची नोंद झालीये. त्यामुळे राज्यातला आतापर्यंतचा संक्रमितांचा आकडा ६७ लाख ३० हजर ४९४ वर जाऊन पोहोचलाय.  वाढत्या संक्रमणाचा हा एकदा पाहता राज्य सरकारने राज्यात पुन्हा एकदा निर्बध लावलेत.

राज्यात संसर्गाचा धोका जास्त वाढू नये म्ह्णून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार सगळ्या राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लादण्यात आलेत. तसं पाहिलं तर याआधीच महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. सगळ्या राज्यात  रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी असेल, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर  बंदी असेल. 

तसेच लग्न समारंभरात लग्न जर हॉल मध्ये असेल तर एकावेळी १०० च्या वर परवानगी नसेल आणि ख्य जागी ही संख्या संख्या २५० च्या वर नसेल. अशीच काहीशी आकडेवारी इतर धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी सुद्धा असेल. आणि एखाद्या स्पर्धेच्या ठिकाणी तिथे जेवढी बैठकीची व्यवस्था असेल त्याच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना परवानगी असेल. हॉटेल, स्पा, जिम, थियेटर नाट्यगृह या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच उपस्थिती राहील. 

या सोबतच राज्य सरकारने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला गरज वाटेल तिथे निर्बंध लादण्याची परवानगी दिली होती. पण त्याआधी जनतेला कल्पना देणे गरजेचे असल्याचं म्हंटल होत.

त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीचं आपल्या भागातल्या निलबंधाची यादी जाहीर केली होती. मुंबईत रुग्णांच्या संख्येत १३ टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ नोंदवली गेल्यामुळे महानगरपालिकेने  येत्या ३१ जानेवारी पर्यंत मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहतील असं  स्पष्ट केलं होत. तसेच मास्क अनिवार्य करत रात्री १४४ लागू केला होता. 

मुंबई महानगरपालिकेनंतर काल मंगळवारी पुणे महागनगर पालिकेने सुद्धा १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करणार असल्याचे म्हंटले. तसेच ‘नो व्हॅक्सिनेशन, नो एन्ट्री’ ही पॉलिसी लागू करत लस शिवाय अनेक ठिकाणी एन्ट्री बंद केली. म्हणजे तुमचा एकही डोस झाला नसेल किंवा नुसता एकचं डोस झाला असेल तरीही तुम्हाला एन्ट्री नाही.   तसेच पुण्यात फिरताना जर मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आणि सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थुंकलं तर १००० रुपयांना भुर्दंड पडणार होता. 

आता या दोन शहरांमध्येच संक्रमण वाढतेय असं नाही, इतरही भागात नवीन रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे आज सकाळी १० वाजता राज्यातल्या कोरोना निर्बंधाबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीतही अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये बंद राहणार आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत म्हणाले  कि, या सगळ्या महाविद्यालयाचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील. हे निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.  तसेच सगळ्या विद्यापीठांची ऑनलाईन पद्धतीनेचं परीक्षा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर महाविद्यालयातील हॉस्टेल सुद्धा ठराविक कालावधीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. 

या निर्बंधात आणखीही वाढ  होणार असल्याचं समजतंय, ज्याची डिटेल माहिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरचं जाहीर करणार आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.