रंग लागलेल्या नोटा बॅंका बदलून देणार की देणार नाहीत, काय खरं असतय..?

काय विषय लिहलाय. ते पण होळीच्या रातच्याला. म्हणजे आत्ता सगळ्या नोटा भिजून पाक लालेलाल, हिरव्या, गुलाबी, निळ्या झाल्यावर हे सांगतायत की नोटा बदलून देतात की नाहीत देत. आत्ता हे बघा भिडू लोकांना तुम्हाला अगोदर शहाणं केलं असतं तर लोकांनी मनावर घेतलं नसतं. सांगितलेल्या सूचना लोक पाळत नसतात. म्हणून म्हणलं नीटपणे होळी खेळून द्यावी आणि नंतर सांगाव कलर लागलेल्या नोटा बॅंका बदलून देत असतात की नसतात ते.

यात भरीस भर म्हणून व्हॉटस्एपच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक सूचना व्हायरल केलीच होती. ती सुचना अशी होती की, कलर लागलेल्या नोटा कितीही टाचा घासल्या तरी बदलून मिळणार नाहीत.

तर नेमकं खरं काय आहे ?

रंगानं भरलेली नोट तुम्हाला कोणी दिली तर तुम्ही घेत नाहीत. किंवा असली नोट तुमच्याकडून दुकानदारही घेत नाही. मात्र रंग लागलेल्या नोटामुळं काही फरक पडत नाही. तुम्ही रंग लागलेली किंवा फाटलेली नोट बँकेत जमा करू शकता. कोणतीही बँक अशा नोटांना विरोध करणार नाही.

नेमक्या कोणत्या नोटा बँक घेत नाही.

आरबीआयनं 2017 मध्ये एक गाईडलाईन काढली होती. त्यामध्ये सांगितलं होतं. की,

एखाद्या नोटेवर एका कोपऱ्यापासून ते नोटाचा दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एखादा राजकीय नारा किंवा संदेश लिहिला असेल तर ती स्विकारली जात नाही. कारण 2009 च्या नियमानुसार ती ग्राह्य धरली जाणार नाही. तसंच ती रद्दी म्हणून जमा होईल.

तसंच जाणूनबुजून फाडलेली नोट बँक घेणार नाही. आरबीआयचं म्हणणं आहे की, जाणूनबुजून फाडलेली नोट ओळखणं अवघड आहे मात्र नीट पाहिलं तर ते समजू शकतं.(आत्ता हे नीट म्हणजे कस बघत असतील ते ह्यांनाच माहिती).

2017 मध्ये आरबीआयनं काढलेली गाईडलाईन मध्ये लिहलेलं आहे की ज्या फाटलेल्या नोटा असतील. ज्या नोटेचा रंग फिका पडला असेल त्याच्यासाठीच हि गाईटलाईन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रंग लागलेली नोट एखादा दुकानदार घेणार नाही, एखादा माणूस घेणार नाही. अगदी सुमडीतकुमडी टाईप अंधारात नोट खपवायचा प्रयत्न केलात तरी चालणार नाही अशा वेळी मात्र बॅंक ती नोट घेणार आणि तुम्हाला ती नोट बदलून देणार.

थोडक्यात, बॅंका नोटा घेणार. आणि नवीन नोटा देणार. आत्ता तसही नव्या नोटा कलरफुल आहेतच त्यामुळे आहे त्या नव्या कलरसहीत आपणच एकमेकांच्या घ्यायला हरकत नाही. असो आत्ता रात्र झाली आहे. नोटांची काळजी करु नका. सकाळी बॅंका सुरू झाल्या की घ्या बदलून. टेन्शन घेवू नका.

हे ही वाचा.

2 Comments
  1. SAGAR PANDIT says

    But every bank not accepted notes like ICICI bank AXIS Bank so can we complaint against this private bank

Leave A Reply

Your email address will not be published.