कोलंबस नारळाच्या शेतीतून नगरचा शेतकरी एकरी दहा लाख रुपये नफा कमावतोय.

शेती करताना नेहमीच्या आणि पारंपरिक पीक पद्धती न अवलंबता वेगळी पिकं लावून भरघोस उत्पन्न मिळवणारे शेतकरी बरेच आहेत. शेतकऱ्यांनी चांगली माहिती आणि नॉलेज घेऊन जर शेती केली तर शेतीला चांगले दिवस आहेत. पारंपरिक शेतीच्या जोडीला आधुनिकतेची जोड दिली तर चांगला नफा मिळू शकतो.

असाच नवीन आणि वेगळा प्रयोग नगरच्या एका शेतकऱ्याने केला आहे. संतोष गर्जे पाटील अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील अठवडी गावच्या या शेतकऱ्याने केलेला प्रयॊग अगदी महाराष्ट्रभर गाजतोय.

ऊस, गहू, बाजरी, कडधान्य यांचं उत्पादन न घेता काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने या शेतकऱ्याने नारळाची शेती करायची ठरवलं. बोल भिडूशी बोलताना त्यांनी दिलेली हि माहिती.

कोलंबस जातीच्या नारळाची शेती त्यांची आहे. या कोलंबस जातीच्या नारळाला जवळपास १०००- १२०० नारळ येतात.इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या नारळांमुळे शेतकऱ्यांचा फायदा हा जास्त होतो. श्रीलंकेत तयार होणारं या कोलंबस झाडाचं कलम या शेतकऱ्याने मागवून घेतलं.

महाराष्ट्रात हे रोप आल्यानंतर त्यावर थोडीफार प्रक्रिया करून ते चांगल्या प्रकारे विकसित केलं जात. चांगल्या प्रकारे विकसित केल्यानंतर ते शेतकऱ्यांना घरोघरी विक्री करून पोहचवलं जातं. पाच वर्षांचा कालावधी या झाडाच्या वाढीसाठी आणि फळधारणेसाठी लागतो मात्र झाडाची वाढ पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना या झाडापासून चांगला नफा मिळतो.

कोलंबस नारळाचा प्रकार आणि आपल्या महाराष्ट्रातला नारळ प्रकार यात काय फरक आहे तर इतर कुठल्याही नारळापेक्षा कोलंबस नारळ हे वाढीसाठी कमी कालावधी घेतं आणि कमी वेळेत जास्त नगा शेतकऱ्यांना मिळवून देतं. पाच वर्षांच्या काळात कोलंबस नारळाला १०००-१२०० नारळ येतात तर तुलनेत इतर नारळाच्या झाडाला १५-२० नारळ येतात.

WhatsApp Image 2021 05 19 at 3.50.34 PM 1

या कोलंबस नारळाची खासियत म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या झाडास पूरक असतं आणि अगदी कमी पाणी जरी असलं किंवा जास्त जरी असलं तरी हे झाड चांगल्या प्रमाणात फळं देतं. हे नारळ माळरानावर सुद्धा लागवड करून त्याची शेती करता येऊ शकते. २० फुटांपेक्षा जास्त हे झाड वाढत नाही. तोडणी करताना आणि बाजारात माल नेताना शेतकऱ्यांना या झाडाच्या कमी उंचीचा फायदा होतो.

कुठल्याही भागातल्या जमिनीत हे रोप योग्य प्रमाणात वाढतं, या नारळाच्या पाण्याची चव चांगली असून ते खाण्यासही चांगलं आहे. या कोलंबस नारळाच्या झाडाच्या खोबऱ्याची क्वालिटी हि जाड असून ते खाण्यास चविष्ठ लागते. लागवडीपासून ते खतांच्या प्रमाणापर्यंत सगळं मार्गदर्शन हे संतोष गर्जे पाटील शेतकऱ्यांना करतात.

WhatsApp Image 2021 05 19 at 3.50.34 PM

४.५ ते ५ फूट उंचीच कोलंबस नारळाचं कलम केलेलं रोप हे दीड वर्षांचं असतं त्याला खाली सात किलोची पिशवी असते. याची किंमत हि ३०० रुपय असते. ५०० रुपयाच्या कलम केलेल्याब रोपाची उंची ८ फूट असते आणि त्याला खाली १० किलोची पिशवी असते आणि त्याच वय २ वर्षे असत.

या कोलंबस नारळाच्या शेतीतून एकरी दहा लाख रुपयांचं उत्पादन शेतकऱ्याला पाच वर्षांनंतर मिळतं. मार्केटिंगची चांगली माहिती घेऊन बाजारपेठत या नारळाला चांगली मागणी आहे. संतोष गर्जे पाटील यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या कोलंबस नारळाच्या झाडाची रोपे उपलब्ध करून दिली आहे. अगदी कमी किमतीत हि रोपे शेतकऱ्यांना घरपोच देण्याची सोयही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांकडून ऑर्डर मिळाल्यानंतर आगाऊ रक्कम मागवून घेऊन पुढच्या दोन दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर रोपे मिळतात. त्यांच्या या नवीन प्रकारच्या शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांचे त्यांना रोपांसाठी मेसेज आणि फोन येत असतात. अगदी बाहेरच्या राज्यातूनही त्यांना या रोपांची मागणी केली जाते आहे. कोलंबस नारळाची रोपं कमी असल्या कारणाने आणि मनुष्यबळ कमी असल्याने ते केवळ महाराष्ट्रभरातच ते या रोपांचं वितरण करत आहेत. 

जे शेतकरी बांधव शंभर पेक्षा जास्त रोपं विकत घेतात त्यांना घरपोच रोपं दिले जातात. इतर शेतकऱ्यांना पाथर्डी तालुक्यात बोलवून रोपं वितरित केले जातात. दरवर्षी संतोष गर्जे पाटील याना १ ते दीड लाख रोपांची ऑर्डर असते. शेतकरी आपल्या पारंपरिक शेतीसोबतच कोलंबस नारळाची शेती करू लागला तर यातून भरघोस उत्पन्न मिळू शकतं.

संतोष गर्जे पाटील यांनी हा शेतीतला नवीन प्रकार हाताळत आणि भरघोस उत्पन्नाचा विश्वास निर्माण करत शेतकऱ्यांना नवीन आदर्श घालून दिला आहे. शेतकरी जगला पाहिजे आणि शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे.

  • संपर्क क्रमांक:  संतोष गर्जे पाटील +91 94034 02771

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. Vitthal Duparre says

    Excellent sucessful coconut farming. Will be visiting as early as possible for first hand experience n tips.

Leave A Reply

Your email address will not be published.