मदर तेरेसा प्रियांकाला ‘सिस्टर हो’ म्हणून मागे लागल्या होत्या.
१९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येची घटना आपल्या इतिहासातील सर्वात वाईट घटना म्हणून आजही आठवली जाते, संपूर्ण देशासाठी राजीव गांधी यांची हत्या हि एक मोठा धक्का होता.
अर्थातच त्यांच्या कुटुंबासाठी देखील हा मोठा धक्का होता. राजीव यांच्या निधनाची बातमी जनपथच्या त्या निवासस्थानी पोहोचली आणि सगळीकडे सोनियांच्या आक्रोशाचा आवाज पसरला. सोनिया खूप जोरात रडत होत्या. बाहेर असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.
सोनिया यांना हा झटका इतका मोठा होता कि, त्यात त्यांना अस्थम्याचा मोठा झटका आला आणि त्या जवळपास बेशुद्धच झाल्या होत्या.
त्यांना आधार देण्यासाठी जवळ होत्या त्या प्रियांका गांधी. प्रियांका या वयाने जरी फार मोठ्या नव्हत्या तरी त्यांनी आपल्या आहे त्या कुटुंबाला सावरलं होतं. पण स्वतः देखील तितक्याच धक्यात होत्या. त्यानंतर एकदा त्यांनी त्यांच्या या मनस्थितीबद्दल खुलेपणाने बोलल्या देखील होत्या.
त्यांनी मदर तेरेसा यांच्याशी निगडीत असणारी आठवण सांगितली होती.
राजीव गांधींच्या हत्येच्या घटनेनंतर मदर तेरेसा यांनी गांधी कुटुंबाची भेट घेऊन, प्रियांका यांना “माझ्याबरोबर या आणि काम करा” म्हणत समाजकार्यात येण्याचं आवाहन केलं होतं.
प्रियांका यांनी सांगितलं कि, “वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर थोड्याच वेळात, मदर तेरेसा गांधी कुटुंबाला भेटायला आल्या होत्या. तिने सांगितले की मला ताप आहे. मदर तेरेसा माझ्या अंथरुणावर बसल्या होत्या, त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाला, ये आणि माझ्याबरोबर काम कर. “
तसेच प्रियंका गांधी वड्रा यांनी हे देखील जाहीररीत्या सांगितले होते कि,
मदर तेरेसा यांच्या कॉलनंतर आपण मिशनरीज ऑफ चॅरिटीसोबत अनेक वर्षे काम केली आहेत. मदर तेरेसा यांनी आपले आयुष्य गरजूंच्या आणि कुष्ठरोग्यांसाठी सेवेसाठी समर्पित केले होते.
कोलकात्यात फिरताना रस्त्यावर भीक मागणारे महारोगी, रिक्षा ओढून पोट भरणारे कृश कमजोर लोकं, क्षयरोगाची लागण झालेले रिक्षाचालक असतील, फूटपाथवर अखेरच्या घटका मोजणारे आजारी म्हातारे असतील अशा सर्वांची अवस्था पाहून मदर तेरेसा यांना कळवळा येत असे.
या असहाय कमजोर लोकांसाठी आपण काही करू शकत नाही हि जाणीव त्यांना झाली आणि त्या अस्वस्थ होऊन कोलकात्यातील झोपडपट्ट्यांमधील लोकांची सेवा करण्यासाठी झटू लागल्या.
ज्यांनी त्यांना निःस्वार्थ सेवा आणि प्रेमाचा मार्ग दाखवला होता, त्यांच्या याच कार्याची प्रेरणा घेत मलाही या कामाचा, कार्याचा आनंद आणि समाधान मिळाले असे म्हणत त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी बहिणींसोबत काम करतानाचे अनेक फोटोही त्या अधून मधून सोशल मिडिया वर शेअर करत असतात. प्रियांका गांधी यांच्यावर तर मदर तेरेसा यांचा प्रभाव आहेच परंतु त्यांचं आणि टेरेसा याचं नातं काय राजीव गांधींच्या हत्येच्या घटनेनंतरच्या भेटीमध्ये नाही सुरु झालं.
त्यांची आजी म्हणजेच इंदिरा गांधी मदर तेरेसा या चांगल्या मैत्रिणी होत्या.
इंदिरा गांधी एकदा म्हणाल्या होत्या, ‘मदर तेरेसा यांना भेटल्यावर मनात अनंत करुणा आणि नम्रता निर्माण होते. कोमलतेची शक्ती आणि प्रेमाची ऊर्जा जाणवते’. इंदिरा गांधींना मदर तेरेसा यांच्याबद्दल प्रचंड आदर होता….
ही हे वाच भिडू :
- मोदी सरकारने मदर तेरेसांच्या निळ्या काठाच्या पांढऱ्या साडीवरचा कॉपीराईट का मान्य केला होता;?
- प्रियंका गांधी तर भेटल्या, मग राहूल गांधी सिद्धूवर नाराज आहेत काय?
- कोलकत्याला ६ नोबेलचा सन्मान आहे तसाच महाराष्ट्रातल्या या गावाला ३ भारतरत्नांचा सन्मान आहे.