मोठी दाढी ठेवल्याच्या कारणावरून कॉमेंटेटर हाशिम अमलाला आतंकवादी म्हणाला होता…..

क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतंच असतात. नवीन हेअरस्टाईल असो किंवा नाचायची वेगवेगळी स्टाईल असो अशा अनेक नवनवीन गोष्टी आपण पाहत असतो. कॉमेंटेटर लोकं या नवनवीन गंमती जमती कॉमेंट्री करताना सांगत असतात. खरंतर कॉमेंटेटर क्रिकेटच्या मॅचमध्ये इंटरेस्ट निर्माण करतात. पण आजचा किस्सा असा आहे कि कॉमेंटेटरच्या एका शब्दाने मोठा गदारोळ झाला होता. काय होता तो किस्सा जाणून घेऊया.

साल होतं २००६ चं. श्रीलंका विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरु होता. हाशिम अमला त्यावेळी आपल्या ऐन भरात होता. त्याच्या बॅटमधून रनांचा पाऊस पडत होता. श्रीलंकेविरुद्धच्या या टेस्ट मॅचमध्ये हाशिम अमलाने कुमार संघकाराचा झेल घेतला. त्यावेळी कॉमेंटेटर होते दिवंगत डीन जोन्स. डीन जोन्स हे कॉमेंट्री क्षेत्रातील मोठं नाव होतं. 

आता हाशिम अमलाने हा कॅच घेतला खरा पण त्यावेळी कॉमेंटेटर डीन जोन्स हाशिम अमलाच्या मोठी दाढी राखण्याच्या कारणावरून टेररिस्ट बोलून गेले होते.

डीन जोन्स यांना वाटलं कि ब्रॉडकास्टींगचा ब्रेक झाल्याने खेळ थांबला आहे आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्या तोंडून वाक्य आलं कि द टेररिस्ट गेट्स अनादर विकेट. आतंकवाद्याने अजून एक विकेट मिळवली.

डीन जोन्स यांना माईक चालू असल्याचं भान नव्हतं, ते तर हे वाक्य बोलून गेले आणि हे वाक्य ऑन एअर गेल्याने मोठा गोंधळ झाला. या टेररिस्ट म्हणण्याच्या कारणावरून डीन जोन्स यांना लोकांच्या खरमरीत टीकेला सामोरं जावा लागलं होतं. डीन जोन्स यांना या प्रकाराबद्दल माफी सुद्धा मागावी लागली होती.

पण हाशिम अमलाने या घटनेला पूर्णपणे टांग दिली. अशा घटनांना महत्व देत बसण्यापेक्षा हाशिम अमलाने आपल्या खेळावर काँसंट्रेट केलं. अमलाने आपलं सगळं लक्ष खेळावर केंद्रित केलं आणि या भानगडीत न पडण्याचं ठरवलं. या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने हाशिम अमलाला फायदा झाला आणि त्याची बॅटिंग चांगलीच डेव्हलप होत गेली. 

जगभरातून अनेक लोकांनी डीन जोन्सला फैलावर घेतलं होतं, मोठी दाढी ठेवली म्हणून टेररिस्ट म्हणणं डीन जोन्सला चांगलंच महागात पडलं होतं. बऱ्याच लोकांचा डीन जोन्स हा आवडता कॉमेंटेटर होता पण त्याच्या अशा विधानाने अनेकांची मने दुखावली होती.

माईक चालू असल्याचं भान न राहिल्याने आपल्या तोंडून हे शब्द चुकीने आपल्या तोंडून गेले, मुस्लिम लोकांच्या श्रद्धेला धक्का लावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता म्हणत डीन जोन्सने माफी मागितली होती.

हा किस्सा चांगलाच गाजला होता मात्र डीन जोन्सच्या लोकप्रियतेत घट होऊन हाशिम आमलाबद्दल लोकांना जवळीक वाटू लागली होती. पुढे डीन जोन्स यांचं निधन झाल्यावर अनेक वृत्तपत्रांनी डीन जोन्सच्या ग्रेट आठवणींपैकी या किस्स्याची आठवण छापली होती.

हाशिम आमला हा आपल्या क्रिकेट काळातला आफ्रिकेचा मोठा बॅट्समन होता आणि तेही तो मूळचा गुजरातचा होता. हि कॉंट्रोव्हर्सी तेव्हा कॉमेंट्री करणाऱ्या लोकांना धडा म्हणून पाहिली गेली. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.