क्रिकेटमधली धार्मिकता आणि जातीयवाद.

कोट्टारी कंकय्या नायडू. मूळ आंध्रमधला. शिकला नागपूरमध्ये. राहिला इंदोरमध्ये. आता कोट्टारी कंकय्या नायडू म्हणजे कोण? तर एकेकाळी चाहत्यांचं दैवत असलेला क्रिकेटपटू सी.के नायडू. पोलादी, ताठ आणि नजाकतदार फलंदाज आणी तेवढाच बुद्धिमान गोलंदाज.

पण त्यावेळच्या टीममधले सहकारी त्याला काय चिडवायचे? ‘काला काला इंदोरवाला, बाहरसे काला, अंदरसे काला’ आणि असं का? तर एवढी गटबाजी होती त्यावेळी संघात. आणि कर्णधार कोण असायचे? तर संस्थानिक. एका इंग्लंडच्या दौऱ्यात कर्णधार पोरबंदरचे राजे तर दुसर्या दौर्यात विझियानगरचे राजे. या राजांच्या संघात सी के नायडू, पी विठ्ठल यांच्यासारखे जोरदार खेळाडू. हे सगळं मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी फार छान लिहून ठेवलंय.

सी के नायडू यांची एक आठवण अशी सांगतात की एका सामन्यात चेंडू चक्क त्यांच्या तोंडावर लागला. दोन दात पडले. पण सी के नायडूंनी रुमालाने रक्त पुसलं आणि दात खिशात ठेवून पुन्हा खेळायला सुरुवात केली.

ck 1509430516 1509430524 2
https://media.indiatimes.in/media/content/2017/Oct/ck_1509430516_1509430524.jpg

आपल्याकडे राजकारण आणि जात या विषयाएवढीच चर्चा क्रिकेटवर होते. एवढा हा खेळ महत्वाचा आहे. मागे रामदास आठवले यांनी क्रिकेट मध्ये आरक्षण असावं अशी मागणी करून धक्का दिला होता. अर्थात हशा आणि टाळ्या मिळवण्यासाठी ते असली विधानं करत असतात असा आता संशय येतो. पण क्रिकेटमध्ये एकेकाळी स्वच्छ आणि स्पष्ट धार्मिकता होती. इंग्रज राज्य करत होते तेंव्हाची गोष्ट. चौरंगी सामने असायचे. ते संघ कोणते? युरोपिअन्स म्हणजे गोर्या लोकांचा संघ. त्यानंतर पारशी लोकांचा संघ. मग हिंदू आणि महोमेडन्स म्हणजे मुस्लिमांचा संघ. या सगळ्यांचे जिमखाने असायचे. म्हणजे गोर्या लोकांचा बॉम्बे जिमखाना. हिंदूंचा हिंदू जिमखाना. म्हणजे बाकी संघ धर्मावर आधारित. फक्त गोर्या लोकांचा संघ युरोपिअन असं नाव घेऊन. पण गोरा वर्ण होताच. सुरुवातीला फक्त गोर्या लोकांचे आणि पारशी लोकांचे सामने व्हायचे.

आता आश्चर्य वाटेल पण पहिल्या दोन इंग्लंड दौर्यावर गेलेला भारतीय संघ हा फक्त पारशी खेळाडूंचा होता. सुरुवातीला प्रेसिडेन्सी सामने म्हणून ओळखले जाणारे दुरंगी सामने फक्त पारशी आणि गोऱ्या लोकांमध्येच व्हायचे. पुढे ते तिरंगी आणि चौरंगी झाले. हिंदू मुस्लीम संघ आल्यावर. पुढे हे सामने पंचरंगी झाले. पंचरंगी व्हायला धर्म कारण नव्हता. वर्ण कारण होता. कारण तोपर्यंत आपल्याकडे धर्मांतर केलेले ख्रिश्चन भरपूर होते. मुख्यतः बिनगोऱ्या ख्रिश्चनांसाठी ‘ द रेस्ट’ या नावाचा संघ बनवला गेला. ही १९४७ च्या आधीची गोष्ट. आफ्रिका तर किती वर्ष हा वर्णवाद जोपासत असल्याने क्रिकेटमधून बहिष्कृत होती. हाशीम आमलाला तर कॉमेंट्री करताना दहशतवादी म्हणून संबोधण्यात आलं.

रूममेटने रिसेप्शनिस्टला डेटसाठी विचारल्याने, जगातल्या सर्वोत्तम लेगस्पिनरची कारकीर्द संपली होती !!!

त्याकाळी मैदानावर लोक काय खायचे? चणे, शेंगदाणे, भेळ, चिक्की. आणि लोक खात नसतील तर ओरडत असायचे. म्हणजे तोंड चालू असणे हे कम्पल्सरी होतं. आज भारत पाकिस्तान सामन्यात ज्याप्रकारे दोन्ही बाजूंची शेरेबाजी, गोंधळ चालू असतो तसा गोंधळ त्याकाळात हिंदू मुस्लीम सामन्यात फार नसायचा. ऐकून धक्का बसेल पण हिंदू आणि पारशी यांच्यात जास्त खुन्नस असायची. पण ही खुन्नस चेष्टेची जास्त. पारशी हिंदुना बघून ओरडायचे, ‘ तात्या बगलास काय?’. तर तात्या म्हणजे त्यांच्यादृष्टीने हिंदू. मग तात्या काय उत्तर द्यायचे? ‘ काकडाखाव’ काकडा म्हणजे कावळा. असं का चिडवायचे काय माहित? तर हे झाले धर्माबद्दल.

या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय !!!

क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली.

त्याकाळी काही सामन्यात कर्णधार असलेला पी विठ्ठल अनेक सामने जिंकून देणारा हिरो होता. पण पी विठ्ठल जेमतेम पाच वर्ष खेळले. नंतर त्यांचं काय झालं कुणी विचारलं नाही. या पी विठ्ठल यांचा भाऊ पी बाळू १९११ साली एका भारीत्य संघाबरोबर इंग्लंडच्या दौर्यावर गेला होता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची करामत करणारा पी बाळू. एका दौर्यात शंभरावर बळी मिळवले होते त्याने. किती कौतुक झालं असेल तिकडे. पण देशात परत आल्यावर त्याने हिंदू जिमखान्याचा सभासद होण्यासाठी अर्ज केला तर हिंदू जिमखान्याने पी बाळू अस्पृश्य म्हणून त्याचा अर्ज स्वीकारला नाही. पारसी जिमखान्याने त्याला सन्मान्य सभासदत्व बहाल केले. नंतर पारशांनी असं केलं म्हणून असेल किंवा बाळूच्या कर्तबगारीची लाज वाटल्याने असेल, हिंदू जिमखान्याने उशिरा का होईना बाळूला सभासद करून घेतले. आता पी बाळू पण विस्मरणात गेले.

 

बायका क्रिकेट पहायला यायच्या याचं लोकांना सुरुवातीला खूप आश्चर्य वाटायचं. या बायकांच्या क्रिकेटविषयीच्या ज्ञानाचे विनोद प्रसिध्द होते. एका बाईने अम्पायर कधी आउट होणार असं विचारलं होतं म्हणे. तर आणखी एका बाईने सांगितलं की कर्णधार ओळखू यायला त्याला वेगळा ड्रेस दिला पाहिजे. अर्थात हे विनोद पुरुषांनी बनवले असण्याची शक्यता जास्त आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.