राज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी तर दिल्लीतील भेटीगाठी नाहीत ना?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोदींची भेट घेण्यापूर्वी शरद पवार आणि पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवून सरकार स्थापन करण्यासाठी या भेटीगाठी होत नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शरद पवार यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची भेट नाही तर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल यांची सुद्धा भेट घेतली आहे.
पार्श्वभूमी
नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून आक्रमक भूमिका घेत आहे. तसेच पुढील निवडणुकीत स्वबळावर कॉंग्रेसचा मुख्यमंत्री करणार असे सांगत आहे. यावरून त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेवर सुद्धा टीका केली होती. शिवसनेने स्वबळाची भाषा केलेली चालते. मात्र कॉंग्रेसने केली तर त्यावर टीका होते अशी नाराजी बोलावून दाखविली होती.
मागील काही दिवसापासून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकार मधील मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसनेने वर सुद्धा टीका केली होती. तसेच आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने आघाडी करतांना धोका दिला होता. त्यामुळे आम्ही स्वबळाची भाषा करत असल्याचे पटोले यांनी सांगितले होते.
शरद पवार यांनी नाना पटोले हे लहान माणूस असून आपण त्याच्यावर बोलणार नाही असे सांगितले होते. नाना पटोले हे घेत असलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याची चर्चा आहे.
याबाबत बोलतांना राजकीय विश्लेषक धवल कुलकर्णी यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट नवीन सहकार मंत्रालयाच्या अनुषंगाने घेतल्याचे सांगण्यात येते आहे मात्र हे खरे नाही. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागे महाविकास आघाडीतील धुसफूसचं आहे.
महाविकास आघाडीची जी अवस्था यामुळे या दोन नेत्याच्या भेटीकडे संशयाने पाहण्यात येत आहे. इतिहास पहिला तर राजकारण काहीही होऊ शकत. याच शरद पवार यांनी पुलोदच्या सरकार मध्ये जनसंघाला सोबत घेतले होते हे विसरता येणार नाही. पवारांनी प्रत्येक दशकात आपली भूमिका बद्दली आहे. त्यामुळे आताच्या घडीला राज्यात काहीही होऊ शकते.
नाना पाटोळे हे आपले अस्तित्व दाखवून देत आहे. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडेल असे वाटत नसल्याचे धवल कुलकर्णी यांनी सांगितले.
पुणे पॅटर्न “कॉंग्रेसला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्यात आली होती”
सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी ही घोषणा पुण्यात अनेक वर्ष फेमस होती. शरद पवार, अजित पवार याचं होम ग्राउंड असणाऱ्या पुण्यात दोन दशक कॉंग्रेसचे नेते सुरेश कलमाडी हेचं सरकार चालवत होते. कलमाडी यांनी पुण्याच्या स्थानिक राजकारणातून अजित पवार यांना हद्दपार केले होते.
त्यामुळे अजित पवार यांनी सुरेश कलमाडी यांना पुण्याच्या सत्तेबाहेर कशे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती. त्यातच २००७ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक झाली होते. त्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही.
सुरेश कलमाडी यांना स्थानिक राजकारणात बाहेर ठेवण्यासाठी ही संधीच होती. मग राष्ट्रवादीने कॉंग्रेसला बाजूला ठेवत शिवसेना आणि भाजपला सोबत घेत पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती.
याला पुणे पॅटर्न असे नाव देण्यात आले होते. हा प्रयोग अनेक वर्ष गाजला होता. शरद पवार यांच्या मंजुरीने हा प्रयोग राबविला असल्याचे सांगण्यात येते.
राज्यातही अशा प्रकारचा प्रयोग आता राबविला जाऊ शकतो का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटी बद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांनी काय मत व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांची भेटीत लसीकरण मोहीमे बाबत चर्चा झाल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
Breaking News LIVE : लसीकरणाबाबत व्यापक मोहिम राबवण्यावर शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीत चर्चा- मंत्री नवाब मलिक @nawabmalikncp #SharadPawar https://t.co/fHlm0pOGTt pic.twitter.com/WKRg4ounjP
— ABP माझा (@abpmajhatv) July 17, 2021
तर भेटी बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुसरे प्रवक्ते भूषण राऊत यांनी ट्वीट करत ही भेट अटळ असल्याचे म्हटले आहे.
हि भेट अटळ आहे ! pic.twitter.com/Ef5LcvGDL1
— Adv. Bhushan Raut – अॅड. भूषण राऊत (@AdvBhushanRaut) July 17, 2021
या भेटीबद्दल राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,
महाविकास आघाडी मधून कॉंग्रेस बाहेर पडेल अजून तरी अशी शक्यता नाही. नाना पटोले बोलत असेल तर कॉंग्रेस वेगळी भूमिका घेण्यासाच्या तयारीत नाही.
केंद्र आणि राज्यातील तणाव कमी करण्यासाठी हे दोन्ही नेते भेटल्याची शक्यता आहे. चौकाशाच शुक्लकाष्ठ सोडविण्यासाठी ही भेट झाल्याची शक्यता आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या मुळे लगेच राज्यातील समीकरण बदलतील असे होणार नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
यामुळे ही भेट नक्की कुठल्या कारणासाठी घेण्यात घेतली आहे याचे कारण गुलदस्तातचं आहे. मोदी आणि पवार यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली.
हे ही वाच भिडू
- शरद पवार आणि भाजप नेत्यांच्या भेटीचं टायमिंग हा योगायोग असतो की दबावतंत्र?
- मोदींविरोधात चौकशी आयोग नेमायचा होता ; पवारांचा एक फोन आला आणि निर्णय गुंडाळला
- त्यामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य आता मोदी सरकारच्या हातात आहे असचं म्हणावं लागेल