काँग्रेसवाले म्हणतात फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम प्रियांका गांधींना घाबरून बंद केलं होतं !
काल माझा ब्रेकअप झालाय भावांनो….
त्याच झालेलं असं की, काल रातच्याला माझं व्हाट्सअपचं चालायचंच बंद झालं राव. गर्लफ्रेंडला मॅसेजच जाईना. घामाघूम होऊन वर टेरेसवर जाऊन रेंज मिळतीय का बघायला लागलो तर तिथं पण रेंज येईना. जिओच कार्ड असल्यामुळं मी त्या अंबानीला ढीग शिव्या दिल्या.
पण पलीकडच्या गच्च्चीत आमचं रम्या बसल व्हतं. ते म्हणलं दादया लै लोड घेऊ नगं, झुक्या कडनच विषय गंडलाय. मग काय रात तशीच गेली, आणि मिनटा मिनटाला ब्रेकअप करणाऱ्या आमच्या बयेनं कायमचाच ब्रेकअप केला. मग मी झुक्याला ढीग शिव्या घातल्या.
पण आज सकाळी पेपर वाचला तर काय म्हणे, मोदींनी बंद केल व्हतं फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम … प्रियांका गांधींना घाबरून
(असं मी म्हणायला न्हाई बरं का ! काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणायलेत)
आता जरा बातम्यांच्या टोन मध्ये सांगतो भावांनो.
तर झालं असं होतं की, सोमवारी ४ ऑक्टोबर २०२१ रात्री ९ वाजल्यापासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप्स तब्बल ९, १० तास बंद होत. फेसबुकच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे खरं तर हे घडलं होत. यामुळे सीईओ मार्क झुकरबर्गला ६०० करोड डॉलर म्हणजेच ४४,७५७ कोटी रुपयांच नुकसान झालयं.
पण, काल रात्री भारतात एक वेगळीच अफवा पसरली. काँग्रेस नेत्यांनी अफवा पसरवली की शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही ऍप्स बंद केले होते.
यावर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते उदित राज म्हणतात,
असं दिसतय की नरेंद्र मोदी सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सऍप्स जाणीवपूर्वक ब्लॉक केले आहेत. प्रियांका गांधी, विरोधी नेते आणि शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी हे करण्यात आलं आहे.
(त्यांचं हे ट्विट त्यांच्या वॉल वर दिसत नाहीये. कदाचित डिलीट केलं असावं)
दुसरीकडे, कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक राधिका खेरा यांनी एक पाऊल पुढे टाकलय. त्या म्हणतायत,
भ्याड मोदी सरकारने संध्याकाळपासून व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम बंद केलयं. बाकी, गोदी मीडिया तसा ही नियंत्रणातच आहे. काहीही चालणार नाही, किंवा लोकांना बातमी मिळणार नाही! लोकशाहीला शांती मिळो!
डरपोक मोदी सरकार ने Whatsapp Facebook Instagram शाम से बंद करवा दिया।
बाक़ी, गोदी मीडिया तो वैसे ही कंट्रोल में है।
ना कुछ चलेगा, ना लोग खबर जानेंगे!
RIP Democracy!
— Radhika Khera (@Radhika_Khera) October 4, 2021
त्याचप्रमाणे, तामिळनाडूतील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जेएमएम हसन मौलाना म्हणतात,
प्रिय नरेंद्र मोदीजी, तुम्ही सोशल मीडियाचा प्रोपोगंडा थांबवू शकत नाही. म्हणूनच तुम्ही हे केले. फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. लोकांना असं वाटतंय की, या सेवा केवळ भारतातच नाही तर तांत्रिक बिघाडामुळे जगभर बंद आहेत.
Dear modi ji
Is it becoz you can't stop the social media propaganda.
U have seized the operations of
WhatsApp, Facebook, Instagram. #WhatsApp, #facebookdown, #instagramdown.— JMH Aassan Maulaana (@Hassan_tnpyc) October 4, 2021
आता या सगळ्यांनाच नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे हे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण मला आता समजेना कि कशानं बंद पडलं असेल हे फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम. कौन मास्टरमाइंड होगा इसके पिच्छू..
असो सुरु झालंय आता ते त्यामुळे आम्ही पुढच्या कमला लागतो, तुम्ही पण लागा आता कामधंद्याला..
हे ही वाच भिडू
- एखादी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्या खरेपणाचा तपास कसा करतात?
- चार्ली आणि हॅरीचा हा व्हायरल व्हिडीओ साडे पाच कोटींना विकला गेलाय
- वो खुर्चीवाले चच्चा अस नेमकं काय झालं की अमेरिकन चच्चा बर्नी सैंडर्स व्हायरल झाले