यूपीतल्या महिलांसाठी चांगलं करायच्या नादात प्रियांका गांधींनी त्यांना आणखीनचं मागे टाकलंय
उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. यासाठी सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्वानी आपला निवडणूक अजेंडा सेट करून वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय.
अश्यातच काँग्रेस पक्षाने वूमन कार्ड खेळल्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेस, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूकीची तयारी करतयं. एकामागून एक रॅली, भाषणं, नवनवीन आश्वासन दिली जात आहेत. अश्यातच महिला नेतृत्वात राज्यात यंदा महिलांना अधिक संधी देण्याचं ठरवलंय.
‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ या नवीन नाऱ्यासोबत काँग्रेस पक्ष यूपी विधानसभा निवडणुक लढवणार आहे. काँग्रेस पक्षाने यावेळी महिला मोर्चाला बळ दिले आहे. गेल्या आठवड्यातचं एका पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी यांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची मोठी घोषणा केली. त्यांना पक्षाच्या ४०% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यास सांगण्यात आले होते. हि घोषणा खूप गाजली आणि तिला टाळ्याही मिळाल्या.
आता काँग्रेसने महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा अर्थात काँग्रेस मॅनिफेस्टो फॉर यूपी इलेक्शन जाहीर केला आहे. यामध्ये महिलांना वर्षभरात तीन मोफत सिलिंडर आणि सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
आज सकाळीच म्हणजेच १ नोव्हेंबरला त्यांनी सकाळी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले,
“उत्तर प्रदेशच्या माझ्या बहिणींनो, तुमचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला असतो. ते समजून काँग्रेस पक्षाने आपल्यासाठी स्वतंत्र महिला जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर वर्षाला भरलेले ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. राज्य सरकारी बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास!”
उप्र की मेरी प्रिय बहनों,
आपका हर दिन संघर्षों से भरा है। कांग्रेस पार्टी ने उसको समझते हुए आपके लिए अलग से एक महिला घोषणा पत्र तैयार किया है।कांग्रेस पार्टी की सरकार बनने पर
सालाना भरे हुए 3 सिलेंडर मुफ्त दिए जायेंगे।
प्रदेश की सरकारी बसों में महिलाओं के लिए यात्रा मुफ्त pic.twitter.com/8P6BJwoAaE
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 1, 2021
एवढंच नाही तर प्रियांका गांधी यांनी पुढे लिहिले की, “आशा आणि माझ्या अंगणवाडी भगिनींना दरमहा १०,००० रुपये मानधन मिळेल. नवीन सरकारी पदांमध्ये आरक्षणाच्या तरतुदीनुसार ४०% पदांवर महिलांची नियुक्ती केली जाईल. १००० प्रति महिना वृद्ध-विधवा पेन्शन मिळेल. काँग्रेस पक्ष ४० टक्के महिलांना तिकीट देईल.
सोबतचं काँग्रेसने शिक्षण आणि शिक्षणाशी निगडीत सुविधा विचारात घेऊनही काही घोषणा केल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या वीरांच्या नावाने राज्यभरात ७५ कौशल्य शाळा उघडल्या जाणार असल्याचे म्हंटले. विद्यार्थिनींना स्मार्ट फोन आणि स्कूटी देण्यात येणार आहे.
काही लोक या जाहीरनाम्याकडे महिला सक्षमीकरणाचा नवा चॅप्टर म्हणून पाहत आहेत. तिकिटांमध्ये, नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची आश्वासने पुरोगामी आहेत. आणि सिलिंडरचे दर गगनाला भिडत असताना तीन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन हा एक चांगला उपक्रम म्हणून पाहता येईल.
पण या आपल्या घोषणेने प्रियांका सोबतच काँग्रेस पक्ष गोत्यात सापडलाय. पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार ‘महिलांना मोफत सिलिंडर’ ही कल्पना थोडी विचित्र असल्याचे म्हंटले गेलेत.
काही लोकांनी या जाहीरनाम्याला प्रतिक्रिया देत म्हटल कि, महिलांची जागा काय फक्त स्वयंपाकघरातचं आहे? महिलांची जागा फक्त चूल आणि मूल इतकी मर्यादित आहे का आणि त्या भूमिकेला प्रियांका गांधी यांचा पाठिंबा आहे का स सवाल देखील विचारला जातोय.
आता महिलांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या प्रियांका गांधी यांच्या महिलांबाबतचा निवडणुकीचा जाहीरनामा वादात सापडत असल्याने काय नवीन राजकारण उभं राहतंय, हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचं भिडू :
- प्रियंका गांधी तर भेटल्या, मग राहूल गांधी सिद्धूवर नाराज आहेत काय?
- यापूर्वीच प्रियांका गांधी राजकारणात येणार होत्या. निवडणूक लढवण्याची सुद्धा तयारी केलेली
- गेल्या काही दिवसात युपी सरकारला धडक देण्याची प्रियांका गांधींची ही ५ वी वेळ आहे…