काँग्रेसच्या या बड्या नेत्याला सुवर्ण मंदिराबाहेर बूट पुसण्याची शिक्षा दिली होती…

१९८४ च्या लोकसभा निवडणूका. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर होणारी पहिलीच निवडणूक. ऑपरेशन ब्लु स्टारमुळे पंजाबचं वातावरण ढवळून निघालं होतं, अशा परिस्थितीमध्ये तिथं निवडणूका घेणं शक्य त्यावेळी शक्य नव्हतं. पण राजीव गांधी मात्र पक्षातील एक बडी व्यक्ती निवडून यावी यासाठी प्रचंड आग्रही होते. त्यासाठी राजीव यांनी त्या नेत्याचा मतदारसंघ देखील बदलला होता.

एवढ्यावरच न थांबता मतदारसंघ बदलून नवीन ठिकाणाहून निवडून आणतं राजीव गांधींनी त्यांना आपल्या सरकारमध्ये आधी कृषी-ग्रामविकास आणि वर्षभरातच गृहमंत्री बनवलं होतं. त्यांच्या या वाढलेल्या वजनानंतर त्याकाळी सरकार आणि पक्षात दोन्हीकडे ही राजीव गांधी यांच्यानंतर याच नेत्याचा शब्द अंतिम मानला जायचा.

देशातील दोन नंबरच्या स्थानावर पोहोचलेल्या नेत्याचं नाव म्हणजे,

बुटा सिंग.

१९६७ पासून सलगपणे पंजाबच्या रोपडमधून निवडणूक लढणाऱ्या बुटा यांना राजस्थानच्या जलौर मध्ये शिफ्ट केलं होतं. मारवाडी प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात बुटासिंग अगदी सहजपणे निवडून आले.

६० च्या दशकात अकाली दलापासून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे बुटासिंग १९६२ साली पहिल्यांदा खासदार झाले होते. आणि लगेचच काँग्रेसमध्ये डेरे दाखल झाले. त्यानंतर एक-एक पायरी चढत काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते बनले होते.

त्यावेळी १९६९ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जावून स्वतःचा उमेदवार देण्यासारख्या इंदिरा गांधींच्या निर्णया मागे देखील बुटासिंग ठाम उभे होते. त्यामुळे पंतप्रधानांचे अधिक विश्वासू म्हणून ओळख त्यांनी पक्षात आणि पक्षाबाहेर देखील मिळवली होती.

१९७४ ला त्यांना इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात पहिल्यांदा मंत्री देखील बनवले. यानंतर बुटा यांनी मागं वळून बघितलंच नाही. पुढे आणीबाणी सारख्या संवेदनशील विषयात देखील त्यांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयाला जाहिर पाठिंबा दिला. आणि पक्षाची धोरण सबंध देशात आग्रहानं राबवली.

त्यामुळे विरोधकांनी त्यांना उपरोधिक पणे गांधी घराण्याचा ‘येस मॅन’ अशी उपमा दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपलं काम सुरुचं ठेवलं होतं. 

पुढे १९७७ ला आणीबाणी नंतर यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे अनेक विश्वासू नेते पक्षाची साथ सोडून जात असताना बुटा यांनी मात्र इंदिरा गांधींची साथ सोडली नव्हती. त्यामुळे त्यावेळी सरकार आलं नाही पण काँग्रेसचे महासचिव हे पक्षातील अत्यंत्य प्रतिष्ठेचं पद त्यांना देऊ केलं होत. १९८० मध्ये सरकार परतल्यावर त्यांना कॅबीनेट मंत्री म्हणून प्रमोशन मिळालं.

त्यांचं राजकीय करिअर सर्वोच्च शिखरावर पोहोचलं ते राजीव गांधी यांच्या काळात. इंदिरा गांधी यांच्या नंतर राजकारणाच्या सारीपाटत नवीन असलेल्या राजीव यांनी त्यावेळी काँग्रेसमधील बड्या आणि जुन्या जाणत्या नेत्यांना हाताशी धरत आपला राज्यकारभार सुरु केला होता.

यात प्रामुख्याने नाव होती शंकरराव चव्हाण, बुटासिंग, पी.व्ही नरसिंहराव यांची.

आधी कृषी-ग्रामविकास मंत्री आणि नंतर वर्षभरातच गृहमंत्री अशा चढत्या आलेखात बुटासिंग यांची राजकीय कारकीर्द चालू होती.

आणि अचानक ते प्रकरण घडलं.

आपल्या गांधी घराण्याप्रती असलेली प्रचंड निष्ठा दाखवण्याच्या नादात एकदा त्यांनी शीख समुदायाचं मत काँग्रेस विरोधी असून देखील ऑपरेशन ब्लु स्टारच अगदी जाहीरपणे समर्थन केलं. झालं, त्याच दिवसापासून त्यांचे ग्रह फिरल्यासारखं झाले.

शीख समुदायातून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागल्या. पंजाब मध्ये न येण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या. अकाल तख्तने देखील या प्रकारणाची गंभीर दखल घेतली. आणि बुटासिंग यांना ‘जात बाहेर’ केलं.

यानंतर बुटासिंग यांनी याबद्दल माफीनामा सादर केला. मात्र अकाल तख्तने केवळ माफीनाम्याने काम भागणार नसल्याचं ठणकावलं.

आणि ज्या प्रवित्र जागेवर झालेल्या नरसंहाराचं आपण जाहिरं समर्थन जाहीर केलं त्याच पवित्र जागेवर बूट पुसणे, लंगरमध्ये जेवण झाल्यावर पडणाऱ्या थाळी धुणे, फारशी साफ करणे अशी शिक्षा सुनावली.

बुटासिंग देखील ही शिक्षा स्वीकारत सुवर्ण मंदिराच्या बाहेर बूट पुसायला बसले होते. ९० च्या दशकात त्यांचे त्यावेळचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.

१९८४ मध्ये ते ज्या सगळ्यात सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते त्याच जालोरमधून १९८९ ला पराभूत झाले होते. या पराभवाच्या कारणांपैकी ऑपरेशन ब्लु स्टारच्या समर्थनाचा वाद हे देखील एक तत्कालीन कारण सांगितलं गेलं.

जाता जाता त्यांच्या बडेपणाचा अजून एक किस्सा.

एकदा पंतप्रधानांच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा चालू होत्या. शेजारी तत्कालीन गृहमंत्री असलेले बुटा सिंग पण उभे होते. दोघे मोठ्या पदांवर असले तरी अनौपचारिक गप्पा असल्यामुळे अगदीच हास्य-विनोदात चर्चा चालू होत्या. त्याच दरम्यान गृहमंत्र्यांनी आपली कृपाण काढून समोर टेबलवर ठेवली.

गप्पा संपल्यानंतर उठून जाताना पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना हसतचं सांगितलं,

बूटा सिंह जी, अब अपनी कृपाण अंदर रखिए.

हे ऐकून पत्रकार गडगडटी हसायचे. कारण देखील तसचं असायचं. राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये बुटासिंग यांची ओळख म्हणजे राजकीय चाणक्य. एखाद्या राज्यातील मुख्यमंत्री बदलायचा असेल किंवा सरकार घालवायचं असले तर ती जबाबदारी बुटा सिंग यांच्यावर सोपवून राजीव गांधी निर्धास्त व्हायचे. बुटा सिंग त्यांच्या कृपाणाने समोरच्याचे पंख छाटतात असं म्हंटलं जायचं

म्हणूनच त्या कृपाणला पाहून राजकीय पंडित म्हणायचे,

एक और कटा बूटा की कृपाण से.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.