मुंडेंच्या अपघाताबद्दल अजून संशय का आहे ? 

काल लंडनहून स्काईपद्वारे एक पत्रकार परिषद झाली. गेल्या चार साडेचार वर्षात पत्रकार परिषद होतात हे देश पुर्णपणे विसरुन गेलेला. पण कालची पत्रकार परिषद गेल्या तीन चार वर्षातली सुपरहिट ठरली. कारण होतं या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप. EVM घोटाळ्याबद्दल एका हॅंकरने स्काईपद्वारे माहिती दिली. या पत्रकार परिषदेमध्ये खुद्द कपिल सिब्बल सामिल झाल्याने त्याला महत्व देखील आलं. पण हा मुद्दा इथेच थांबला नाही तर हॅंकरने थेट दावा केला की, EVM घोटाळ्याची हि माहिती गोपीनाथ मुंडे यांना माहित झाली म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या अकास्मित निधनाची माहिती मिळाल्याच्या दिवसापासून राज्यभरातल्या लोकांमध्ये संशयाच वातावरण राहिलं आहे. अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातील नेते उपस्थित राहिल्यानंतर लोक आक्रमक झाले. राज्यभरातल्या डझनभर नेत्यांना आपला जीव वाचवून धूम ठोकावी लागली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आरआर पाटील, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी प्रकाश शेंडगे अशा प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याने CBI चौकशीची मागणी केली. 

CBI कडे चौकशीची सुत्रे देण्यात आली. ऑक्टोंबर २०१४ मध्ये CBI ची चौकशी पुर्ण झाली व त्यामध्ये मुंडे यांचा मृत्यू हा अपघातामुळेच झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणारा ड्रायव्हर गुरविंदसिंह याला त्याच दिवशी अटक करुन चार्जशिट दाखल करुन जामीन देण्यात आला होता. CBI चौकशीत चूक ड्रायव्हरची असून त्याच्यावर IPC 279 म्हणजेच रॅश ड्रायव्हिंग आणि कलम 304 (A) अंतर्गत एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल अस बेजबाबदारीच कृत्य अशी कलमे टाकण्यात आली. 

CBI मार्फत दाखल करण्यात आलेल्या या चार्जशीटमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या अशा की, 

०३/०६/२०१४ रोजी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ड्रायव्हर वीरेंद्र कुमार हे सकाळी 6.15 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना शासकिय निवास्थानावरुन IGI एअरपोर्टच्या दिशेने घेवून जात होते. सुमारे 6.20 मिनिटांनी गाडी अरबिंदो क्रॉस इथे आली. तेव्हा सिग्नल ग्रीन होता. अरबिंदो क्रासिंगच्या मध्यावर गेल्यानंतर सफदरजंग रोडच्या दिशेन जात असताना गाडी क्रमांक DL7CE4549 हि सिल्वर कलरची इंडिका धडक दिली. 

त्यानंतर गाडीचा ड्रायव्हर वीरेंद्र कुमार आणि PA  यांनी गोपीनाथ मुंडे यांना ट्रामा सेंटर येथे घेवून गेले. त्यापुर्वी गोपीनाथ मुंडे यांनी पिण्यासाठी पाणी मागितल्याच ड्रायव्हरने सांगितलं पण ट्रामा सेंटर येथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

अधिक सविस्तरपणे CBI द्वारे दाखल करण्यात आलेले चार्जशीट आपण इथे क्लिक वाचू शकता, 

त्यानंतर गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूची बातमी नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिली. पंकजा मुंडे आणि कुटूंबिय संबधीत व्यक्ती दिल्लीसाठी रवाना झाले. 

त्यानंतर सोशल मिडीयावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. घटनाक्रम आणि लोकांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहता गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल संशय का घेतला जातो ते स्पष्ट होते. 

  •  गोपीनाथ मुंडे यांचा शवविच्छेदनाचा अहवाल त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आला? या अहवालास उशीर का लागला? 
  • ज्या रस्त्यावर गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला तो वर्दळीचा रस्ता होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास दिल्लीसारख्या रस्त्यांवर एकही साक्षीदार नसणं हि गोष्ट न पटण्यासारखी आहे. 
  • दिल्लीच्या प्रमुख रस्त्यावर एकही CCTV उपलब्ध नाही, ते कोणत्या कारणामुळे हे कोणाकडूनच स्पष्ट झालेले नाही. 
  • अपघात डाव्या बाजूने झाला असेल तर गोपीनाथ मुंडे यांच्या उजव्या बाजूला मार कसा लागला. यकृत आणि लिव्हर निकामी कसे झाले? 
  • चार्जशीटमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीचा वेग ताशी ३० किमी असल्याचं सांगण्यात आलं आहे तर धडक देणाऱ्या इंडिकाचा वेग ५० किमी इतका आहे. इतक्या कमी वेगात झालेली धडक जीवघेणी कशी ठरू शकते. 
  • केंद्रिय मंत्री असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत फक्त तीनच व्यक्ती कशा काय होत्या ? पोलीस, प्रशासन एका केंद्रिय मंत्र्यांच्या सोबत कोणत्या कारणामुळे नव्हती. 
  • अपघातापुर्वी ते फोनवर कोणासोबत बोलले, त्यांचे फोन रेकॉर्डिंग आजतागायत का पाहण्यात आलेले नाही. 
  • रक्ताच्या नात्यातील जवळची व्यक्ती उपस्थित असल्याशिवाय शवविच्छेदन करता येत नसताना देखील पंकजा मुंडे पोहचण्याच्या अगोदरच मृत घोषीत करुन शवविच्छेदन का करण्यात आले. 

असे कित्येक आरोप, संशय सोशलमिडीवर आजही करण्यात येतात. त्यांची उत्तरे CBI च्या चार्जशीटमध्ये देखील थेटपणे मिळत नाहीत. साहजिक संशयाचं हे धुकं प्रश्नांच्या ठोस उत्तरांशिवाय मिळू शकत नाही. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.