अवजड वस्तू निस्वार्थी पणे उचलणाऱ्या ‘ब्रा’ वर काही मंडळी चिडून का आहेत

पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन सुद्धा विशी तिशीतल्या स्त्रियांना लाजवणारी अप्सरा कोण म्हंटल तर मलायका अरोरा असंच नावं घ्यायला पाहिजे! मेनका, रंभा, उर्वशी यांना कधी पाहिलं नाही पण याच जन्मी याच देही याची डोळा मलायकाला पाहून या तिघींची अनुभुती यावी.

यथातथाच सौंदर्य पण आपल्या चालीनं आणि अदांनी घायाळ करणारी ही मलायका चर्चेत असते तिच्या स्टाईलमुळे तर कधी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे तर कधी स्वतःच्या उन्मादक अदांच्या फोटोंमुळे. पण चर्चेत कसं रहायचं हे मलायकाला चांगलंच माहीताय. खरं तर मलायका जास्त ट्रोलच होते असं म्हणायला काही हरकत नाही.

आता मात्र मलायका तिच्या बुब्जमुळे ट्रोल झालीय.

तर मलायका नेहमीप्रमाणे सकाळी तिच्या पाळीव कुत्र्याला कॅस्परला घेऊन फिरायला गेली. त्यावेळी तिच्या मागावर असलेल्या फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून युझर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

यावेळी मलायकाने ग्रे कलरची ट्रॅक पँट आणि त्याच रंगाचं स्वेटशर्ट घातलं होतं. आणि कोव्हिडं नियमांच पालन करत तिने सुरक्षेसाठी दोन मास्कही घातले होते. पण या ड्रेसमध्ये मलायकाने अंतर्वस्त्र अर्थातच ब्रा घातली नव्हती. त्यामुळे स्तनाग्रे अर्थातच निप्पल्स उठून दिसले. ब्रा न घालताही मलायका कम्फर्टेबल दिसत होती. त्यावरून युझर्सनी तिला ट्रोल केलं.

युझर्सने तिच्यावर अतिशय खालच्या भाषेत जाऊन टीका केली. क्रमाक्रमाने बघू

१. काय गं तुला ब्रा घालायला आवडत नाही का?’
२. ही किती निर्लज्ज बाई आहे
३. डबल मास्क विदाऊट ब्रा

मलायकाच्या काही चाहत्यांनी तिची पाठराखणदेखील केली.

१. ब्रा घालायची की नाही ही अतिशय व्यक्तिगत बाब आहे. यामध्ये आत्मविश्वास आणि कम्फर्ट अतिशय महत्त्वाचं आहे.
२. तिने काहीही चुकीचं केलेलं नाही. ब्रा घालणं अनेकजणींना अवघडल्यासारखं असतं.

मग भिडूच्या डोक्यात आलं की अवजड वस्तू निस्वार्थी पणे उचलणाऱ्या ब्रा वर काही मंडळी चिडून का असतात ? ब्रा चे उपयोग तर आहेतच पण मग उपयोग तिथं तोटा या उद्देशाप्रमाणे तोटे सुद्धा आहेत. काय काय उपयोग आहेत ते आधी सांगतो.

तर स्त्रियांचे स्तन हा मांसल पेशींनी बनलेला अवयव आहे. त्यात आधार देणाऱ्या काही लिगमेंट्स असतात. पण त्या खूप ताकदवान नसतात. विशेष करून एकदा स्तनाचा आकार वाढला की बाहेरून वेगळा आधार गरजेचा असतो. गरोदरपणात किंवा स्तनपान चालू असताना हा आधार न मिळाल्यास स्तन ओघळू शकतात. आणि एकदा ओघळले की त्यानंतर प्लास्टिक सर्जरी शिवाय दुसरा उपाय करता येत नाही.

स्तनांना नीट आधार न मिळाल्यास स्तनदुखी सुरू होते. ही स्त्रियांमध्ये नेहेमीच आढळणारी समस्या आहे. यामध्ये योग्य मापाची ब्रा वापरणे आवश्यक आहे. खेळाडू स्त्रियांनी स्पोर्ट्स ब्रा वापरणे हितकारक आहे. ब्राच्या वापरामुळे स्त्रीचे पोस्चर म्हणजे उभे राहणे आणि बसणे याची पद्धत सुधारते. पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते आणि त्यामुळे पाठीची आणि मानेची दुखणी कमी होऊ शकतात.

ब्राच मुख्य काम ब्रेस्टना योग्य तो आधार देणं हे असतं. काही जणी हेच विसरतात आणि खूप सैल ब्रा घालतात. लठ्ठपणामुळे बोजड झालेल्या स्तनांना ब्रा चा आधार अत्यंत गरजेचा असतो.

आता तोटे म्हणजे,

सतत ब्रा घातल्याने वेदना होणं साहजिक आहे. जसे खूप तास टाइट कपडे घातल्यावर शरीराला अस्वस्थता वाटते तसेच स्तनांना पण वाटते. यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. घट्ट ब्रा रक्त प्रवाहाला प्रभावित करतं आणि रक्त पूर्णपणे स्तनांपर्यंत पोहचत नाही ज्याने समस्या वाढतात. तसेच वायर मटेरियल किंवा टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्यान स्तनाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते. नाजुक त्वचेवर लाल डाग येणे किंवा त्या भागात खाज येणे, जळजळ होणे, हे सर्व २४ तास ब्रा घालण्याचे परिणाम असू शकतात. मुख्यतः: रात्री ब्रा घालून झोपणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.

आता रात्री ब्रा काढावी हे फायद्यात पण सांगितलंय आणि तोट्यात पण सांगितलंय.

तसंच मलायकाने पण रात्री ब्रा काढली असेल आणि सकाळी सकाळी उठल्यावर वर मॉर्निंग वॉक साठी ती कुत्र्याला घेऊन आली असेल, आणि तेवढ्यात तिच्या वासावर असणाऱ्या फोटोग्राफरने तिचे फोटो काढले असतील, ज्यात तिचे स्तनाग्रे दिसली असतील.

आता बघूनच्या बघून लोकांनी उच्छाद किती मांडलाय राव…!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.