कोरोनाने या ७ जणांना अब्जाधीश बनवलयं….

कोरोनाच्या मागच्या ८ ते ९ महिन्यांच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योगधंद्यांना जागेवर बसवल. कर्जबाजारी बनवलं, पण त्याच दरम्यान मार्चमध्ये कोरोना येण्यापूर्वी ज्यांची नाव कधी चर्चेत देखील नव्हती अशा आरोग्य क्षेत्रातील ७ जणांना नवअब्जाधीश बनवलयं. याकाळात त्यांनी आधीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

जर या सात जणांच्या वाढलेल्या संपत्तीमध्ये इयर-ओव्हर-इयर अशी वाढ बघितली अगदी ९३.८ टक्क्यांपासून ५०.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे आम्ही सांगत नाही तर फोर्ब्सच्या मासिकाने सांगितलं आहे. त्यात या ७ जणांना पहिल्यांदाच स्थान मिळालं आहे.

हे ७ नव अब्जाधीश कोण आणि त्यांच्या संपत्तीमध्ये कशी वाढ झाली याचा हा ७-१२

१) प्रेमचंद गोधा :

भारतीय औषध निर्यात कंपनी इप्का लॅब्सचे चेअरमन प्रेमचंद गोधा. यांची नेट वर्थ जवळपास १२ हजार ८०५ कोटी रुपये आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यांच्या संपत्तीमध्ये सर्वात जास्त म्हणजे ९३.८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

यांची हि संपत्ती एवढं वाढण्याचं कारण आहे ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ हे औषध. त्याच्यावरून अमेरिकेने हे औषध मिळावे म्हणून भारताला धमकी पण दिली होती.

मागच्या एका वर्षात गोधा यांच्या शेअर्समध्ये १०० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

२) डॉ. अरविंद लाल

मार्च- एप्रिलमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी पहिल्या टप्प्यात काही खाजगी लॅबना परवानगी देण्यात आली होती. यात एक नाव होत ते म्हणजे ‘डॉ. लाल पॅथलॅब्स’ च. याच लाल पॅथ लॅब्सचे सर्वेसर्वा डॉ. अरविंद लाल यांचा या नव अब्जाधीशांच्या यादीत दुसरा नंबर लागतो.

डॉ. अरविंद लाल यांची सध्याची नेट वर्थ १० हजार ६२१ इतकी आहे. गतवर्षी पेक्षा त्यांच्या संपत्तीमध्ये ५०.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशभरामध्ये २०० पेक्षा जास्त लॅब्स असणाऱ्या लाल पॅथलॅब्सने दिल्ली, कोलकाता, इंदोर या ठिकाणी जून महिन्याच्या आसपासच प्रत्येक दिवसाला १ हजार पेक्षा जास्त टेस्टिंगला सुरुवात केली होती.

३) प्रताप सी. रेड्डी

देशातील ‘अपोलो  हॉस्पिटल’ चे ८८ वर्षीय चेअरमन प्रताप सी. रेड्डी हे देखील नवअब्जाधीश म्हणून पुढे आले आहेत. चेन्नईमध्ये या हॉस्पिटलच मुख्यालय आहे.

त्यांची सध्याची नेट वर्थ १० हजार ३३९ इतकी आहे. २०२० या एका वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये ६७.४ टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली. २०१८ साली हॉस्पिटलचा कारभार २ बिलियन डॉलरमध्ये होता.

त्यांचं संपूर्ण कुटुंबीय या हॉस्पिटल्सचे प्रमुख आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्या ३ मुली हॉस्पिटलच्या व्हॉईस चेअरमन आहेत तर चौथी मुलगी कार्यकारी संचालक आहे.

४) माननलाल बी. अग्रवाल.

अजंता फार्मचे प्रमुख असलेले माननलाल अग्रवाल यांचं देखील नाव या यादीत जोडलं गेलं आहे. मागच्या वर्षी पेक्षा त्यांची संपत्ती ६६.२ टक्क्यांनी वाढली आहे.

त्यांच साध्याच नेट वर्थ हे ९ हजार ९६९ इतकं आहे.

५) व्ही. सी. नन्नपनेनी 

हैद्राबादस्थित नॅक्टो फार्माचे प्रमुख व्ही. सी. नन्नपनेनी यांची संपत्ती देखील ६२.३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे ते देखील फोर्ब्सच्या यादीत अब्जाधीशांच्या यादीत आले आहेत.

मागच्याच महिन्यातच त्यांनी आपल्या Eli Lilly’s या कोरोनासंबंधित गोळ्यांच्या उत्पादन आणि विक्रीसाठीचे हक्क विकत घेण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. देशात प्रत्येकवर्षी १० नवीन औषध लाँच करणारी कंपनी अशी त्यांनी आपली ओळख असल्याचे सांगितले आहे.

त्यांच साध्याच नेट वर्थ हे ८ हजार ५७१ इतकं आहे.

६) सुनील एस. लालभाई

सुनील एस लालभाई हे देशातील ७८ वे नंबरचे श्रीमंत आणि आरोग्य क्षेत्रातील सहावे नवअब्जाधीश ठरले आहेत. ‘अतुल’ या आरोग्य क्षेत्राशी निगडित कंपनीचे ते प्रमुख आहेत.

फोर्ब्सच्या यादीनुसार गतवर्षी पेक्षा यावर्षी त्यांच्या संपत्तीमध्ये ५८.७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

त्यांची सध्याची नेटवर्थ ८ हजार ५७१ इतकी आहे.

७) चिरायू आर. अमीन 

अलेम्बिक फार्माचे प्रमुख चिरायू आर. अमीन यांना देखील फोर्ब्सच्या यादीत नव्याने स्थान मिळाले आहे. त्यांच्या तर संपत्तीमध्ये तब्बल ८० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

गत वर्षीपेक्षा नेट वर्थ वाढून त्यांचं साध्याच नेट वर्थ ८ हजार ४३७ कोटी इतकी आहे.

एकूणच काय तर कोरोनाने सगळ्यांचा उद्योग बसवला, नोकऱ्या घालवल्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर या उद्योजकांच्या नावांमुळे तुमचा गैरसमज काहीसा नक्कीच दूर झाला असेल, यात शंकाच नाही.  

हे हि वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.