कोरोनामुळे इटलीत पॉर्न साईटने आणली आहे खास स्किम !

गेला महिनाभर झालं कोरोनाची चर्चा सुरु होती. रोज ढीगभर मिम येत होते. कोण कोरोनाला वर टिकटॉक बनवत होत तर कोण त्याला “गो करुणा गो” चा काव्यमय लडिवाळ आग्रह करत होतं. युट्युबवर लेहेंगा में घुसा कोरोना व्हायरस अशी गाणी व्हायरल होत होती. कोणी भजन कीर्तन करत होतं तर कोणी आणखी काय.

हा हा म्हणता म्हणता कोरोनो आपल्या महाराष्ट्राच्या दाराशी आला.

पुणे नागपूर मध्ये रुग्ण आढळले. आता मात्र लोकांची टरकली. गेल्या दोन तीन दिवसांपासून हळूहळू लोकांच्यात सिरीयसनेस येऊ लागलाय. लोक आपआपली काळजी घेत आहेत. सॅनीटायझर वापरत आहेत. रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. जे आहेत ते मास्क घालून फिरत आहेत.

जगभरात अशीच स्थिती आहे. चीनमध्ये कोरोनाने उच्छाद मांडलाय. पण चीन खालोखाल युरोपच्या इटलीमध्ये भयानक परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच एकदम शंभर लोकांचा इटली मध्ये मृत्यु झाला. आता पर्यंत मृतांचा आकडा हजारच्या वर पोहचलाय. २० हजारच्या वर रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह आढळलेत.

लाखोजणांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. रोमचे मेयर म्हणतात त्या प्रमाणे,

“इटलीसाठी हे एक महायुद्ध आहे.”

खरं सांगायचं तर दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इटलीमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या सरकारने संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. सर्व कंपन्या, शाळा कॉलेजेस, विद्यापीठे यांना सुट्टी देण्यात आली आहे. कोणालाही घरातून बाहेर न पडण्याच आवाहन करण्यात येत आहे.

अफवा पसरवू नका व एकमेकांना मदत करायची सूचना देण्यात आली आहे.

अशातच एक वेबसाईट समाजसेवेसाठी लोकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तीच नाव पॉर्नहब. 

हा हा तीच पॉर्नहब जिथे आपले अश्लील उद्योग चालतात. आता जे कोणी अतिशय सात्विक व्यक्ती असतील त्यांच्यासाठी स्पष्ट सांगायचं झाल तर त्यावर बीपी पाहायला मिळते. वयात येणारे भिडू, वय उलटून गेलेले भिडू प्रत्येकाने कधी ना कधी येथे संचार केलेलाच असेल. काही जन मान्य करतात काही जन नाही.

लाजू नका फक्त आपणच नाही तर जगभरात सगळ्यात जास्त पहिल्या जाणाऱ्यापैकी ही एक वेबसाईट आहे. 

२००७ साली कॅनडा येथे सुरु झालेल्या या वेबसाईटने पॉर्नच्या क्षेत्रात क्रांतीच आणली. अनेक रेकोर्ड ब्रेक केले. त्यांच्यावर टीका देखील झाली. आपल्या मोदी सरकारने देखील बन केलेल्या वेबसाईट मध्ये पोर्नहबचा समावेश आहे. (तरी काही जण जूगाड करून पाहातात. कस ते विचारू नका)

पण इतर अश्लील वेबसाईटवर नसलेल एक वैशिष्ट्य पॉर्नहब कडे आहे. ते म्हणजे त्यांनी जपलेलं सामाजिक भान.

२०१२ साली त्यांनी स्तनाच्या कॅन्सरच्या अवेअरनेससाठी कॅम्पेन चालवलं. त्यातून मिळालेले पैसे त्यांनी एका एनजीओला दान करून टाकले. तर २०१४मध्ये त्यांनी पर्यावरण जागृतीची मोहीम हाती घेतली.

आता कोरोना व्हायरसच्या महायुद्धातही पॉर्नहब मागे राहिलेलं नाही. त्यांनी खास लॉकडाऊन झालेल्या इटलीसाठी एक खास योजना आखली आहे. कान देऊन ऐका,

“पॉर्नहबने इटलीकरासाठी प्रीमियम मेम्बरशिप फुकट उपलब्ध करून दिली आहे.”

जाणकारांना प्रीमियम मेंबरशिप काय हे सांगायला नको. यावर असणारे व्हिडीओ हे चांगल्या दर्जाचे असतात. आपल्या खिशाबाहेरची ही गोष्ट असल्यामुळे कधी आपण त्या नादाला लागलेलो नसतो. मिळेल त्यावर खूष राहतो, पण इटली कराना हा खजिना खुला झाला आहे.

आता तुम्ही म्हणाल कोरोना चा आणि पॉर्नहबने प्रीमियर मेंबरशिप खुली करण्याचा काय संबंध?

पॉर्नहबने याच एक्सप्लेनेशन दिलय. ते म्हणतात की इटली करांना कोरोना मुळे घरातून बाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. घरात बसून बसून लोक कंटाळत आहेत. त्यांनी घरातच थांबावं, यासाठी त्यांच्या हाताशी मनोरंजन मिळाव म्हणून आम्ही हे पाऊल उचलेलं आहे.

या प्रीमियर मेंबरशिप साठी कोणतेही लॉगीन करावे लागणार नाही ना क्रेडीट कार्डचे डिटेल सांगावे लागणार आहेत. सगळे व्हिडीओ ओपन असणार आहेत.

पुढचा अख्खा एक महिना इटलीकरांना या सुखाचा फ्रीमध्ये आस्वाद घेता येणार आहे.

एवढच नाही या काळात त्यांचे जाहिरातीतून जे उत्पन्न येणार आहे ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी देण्याचा त्यांचा विचार आहे. आजच्या न्यूयॉर्क टाईम्स पासून ते द सन या वर्तमानपत्रात या बद्दलची माहिती छापून आलेली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.