कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी तिनं स्कुटीनं मध्यप्रदेशवरून गाठलं महाराष्ट्र …
गेल्या वर्षभरापासून कोरोनानं थैमान घातलंय. आतापर्यंत लाखो लोकांना या विषाणूनं आपल्या कचाट्यात अडकवलय. या पार्श्वभूमीवर राज्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.
त्यात अनेक राज्यांनी आपल्या सीमा प्रवाशांसाठी बंद केल्या आहेत. महाराष्ट्रात वाढत्या प्रकरणामुळे मध्य प्रदेश आणि इतर राज्यांनी पब्लिक कनव्हेन्स बंद केला आहे. अश्या परिस्थितीत एका कोरोना योद्धाने आपले कर्तव्य बजावण्यासाठी दुचाकीवरून तब्बल १८० किलोमीटर अंतर पार केलय.
मध्य प्रदेशातून तिन दुचाकीवरून गाठलं महाराष्ट्र
कोरोना काळात आपल्या कर्तव्यनिष्ठेच एक उत्तम उदाहरण मध्य प्रदेशमधील बालाघाटच्या एका मुलीने मांडलं आहे. प्रज्ञा घरडे नावाची ही मुलगी पेशेने डॉक्टर असून ती नागपुरातील खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटरमध्ये काम करते.
डॉ प्रज्ञा सुट्टीवर बालाघाटला तिच्या घरी आली होती. मात्र, अचानक संसर्ग वाढल्याने प्रज्ञाला रुग्णालयात रिपोर्ट करण्याचे ऑर्डर मिळाले. ज्यामुळे तिला सुट्टीमध्येच रुग्णालयात सेवा देण्यासाठी नागपुरात जाणं भाग होत. त्यात लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस आणि गाड्या बंद आहेत. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. प्रज्ञाने वेळ न घालवता स्कुटीवरून जाण्याचा निर्णय घेतला.
बालाघाट ते नागपूर हा प्रवास काही छोटा नाही. डॉ. प्रज्ञाच्या कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला. पण मुलीची इच्छाशक्ती पाहून कुटुंबातील सदस्यांनी देखील परवानगी दिली. आणि १९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता प्रज्ञा नागपूरला निघाली.
७ तासांत गाठलं नागपूर
बालाघाट ते नागपूर हे अंतर जवळपास १८० किमी आहे, जे डॉ. प्रज्ञाने ७ तासांत पूर्ण केले. कडाक्याच्या उन्हात आपला बोजा बिस्तरा सांभाळत तिने दुचाकीवरून हा प्रवास केला. त्यात लॉकडाऊन असल्यामुळे वाटेत काही खायला- प्यायला सुद्धा नव्हत. पण या कोणत्याचं गोष्टीची पर्वा न करता पुन्हा कामावर परत आल्याने ती समाधानी आहे.
डॉ. प्रज्ञाने सांगितले की, ती नागपुरातील कोविड हॉस्पिटलमध्ये रोज ६ तास काम करते. जिथे ती आरएमओ पदावर कार्यरत आहे. यासह, ती संध्याकाळच्या शिफ्टमध्ये दुसर्या रुग्णालयात देखील सेवा देते. यामुळे, तिला दररोज सुमारे १२ तास पीपीई किट घालून काम करावे लागते. तिने सांगितले कि, अचानक रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तिला कामावर परत जाणे भाग होते. मात्र, गाड्या बंद असल्याने तिला दुचाकीवरूनच नागपूर गाठावे लागले.
कोरोना काळात देवदूत बनून समोर आले आरोग्य कर्मचारी
गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरुद्धच्या या लढाईत डॉक्टर, नर्स , वोर्ड बॉय पासून ते रुग्णवाहिका चालाकांपर्यंत सर्वानीच महत्वाची भूमिका बजावली. कोरोनाच्या आगमनापासून १६- १७ तास काम करून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. ज्यामुळे त्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. अश्यात डॉ. प्रज्ञाची ही कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.
हे ही वाच भिडू.
- सत्तेत नसलेल्या मनसेने दुसऱ्या कोरोना लाटेत काय केलं?
- सरकारची वाट न बघता घराघरात जाऊन लोकांना वाचवणारा ऑक्सिजन मॅन
- कोरोनाच्या लढाईत सर्वात महत्वाचा ठरलेला मेडिकल ऑक्सिजन नेमका कसा तयार करतात?