भ्रष्टाचार मुक्त भाजपची मोहीम हाती घेतलेले तथागत रॉय आहेत तरी कोण?

राजकारण हा जवळपास सगळ्यांचाच आवडीचा विषय, फक्त एवढंच कि, कोणी त्यावर चर्चा कारणंच योग्य समजत तर कोणी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेत. आता प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा म्हंटल कि, आपल्याला पार तळागाळातून सुरुवात करायला लागते. तर कोणी बड्या पक्षाच्या मदतीने राजकारणात उतरतो. 

आता राजकारणात उतरण तर सोप्प आहे भिडू पण पक्षात टिकून राहून आपली ओळख निर्माण करायला बरीच वर्ष घासायला लागते. पक्षासोबत काम करणं, प्रत्येक छोटी- मोठी जबाबदारी सांभाळणं, मोर्चे- कार्यक्रमात सहभागी होणं या सगळ्याच गोष्टी. पण एवढं करूनही आपल्याला जर पक्ष डावलत असेल तर….

असचं काहीस दुखणं  मांडलयं तथागत रॉय यांनी. आता आधी रॉय यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ.

तर तथागत रॉय स्वतःला भाजपशी संबंधित असल्याचे सांगतात. त्यांच्या मते, पक्षातील त्यांची ओळख देखील प्रभावी आहे. त्यांनी २००२ ते २००६ या चार वर्षात भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे नेतृत्व केले. सोबतच २००२ ते २०१६ या २३ वर्षाच्या काळात ते त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. 

एवढचं नाही तर २०१५ ते २०१८ मध्ये त्रिपुरा आणि २०१८ ते २०२० या वर्षात त्यांनी मेघालयाचे राज्यपाल म्ह्णून काम पाहिलंय. आपण त्यांच्या कोलकाता मधल्या ऑफिसात गेलो तर अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांसारख्या भाजपच्या दिग्गजांसोबत त्यांचे फोटो भिंतीवर लटकलेले पाहायला मिळतील आणि त्यांच्या बुकशेल्फमध्ये त्यांनी स्वतः जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यावर लिहिलेले पुस्तक देखील आहे.

आता एवढचं सगळं असूनही रॉय म्हणतात की, गेल्या एक वर्षापासून म्हणजे एप्रिल २०२० मध्ये त्यांचे राज्यपालपद संपल्यापासून ते भाजपचे “सक्रिय सदस्यत्व” मिळविण्यासाठी धडपडत आहेत.

आता तुम्ही म्हणाल कि, हे कस काय शक्य आहे. पक्षाची संबंधित एवढी जबाबदारी संभाळून सुद्धा त्यांना सदस्यत्व कस मिळालं नाही. तर आधी क्लियर करूयात कि तथागत रॉय यांच्याकडे भाजपचे सदस्यत्व होते. पण २०१५ मध्ये त्रिपुराचे राज्यपाल झाल्यानंतर त्यांनी आपले सदस्यत्व सोडल्याचे समजते.

आता एखाद्या पक्षात एन्ट्री करायची म्हंटल कि, ज्या त्या पक्षाचे काही नियम असतात पण  प्रोसेस फार सोपी असते. आणि सक्रिय सदस्यत्व म्हणजे भाजपचे सामान्य सदस्यत्व. ज्यासाठी पक्षाच्या विशिष्ट क्रमांकावर फक्त एक मिस कॉल द्यायला लागतो. भाजपच्या नियमित कार्यक्रमांमध्ये सामान्य सदस्य सहभागी होत नाहीत. सक्रिय सदस्यत्वासाठी एक अर्ज करावा लागतो किंवा एक फॉर्म भरावा लागतो आणि त्यासोबत २०० रुपये शुल्क जमा करावे लागते. सक्रिय सदस्य पक्षाचा एक भाग बनू शकतात, पक्ष कार्यालयात जाऊन पक्षाच्या कामात सहभागी होऊ शकतात.

आता तथागत रॉय यांनी पक्षाच्या वेगवगेळ्या कामात सहभाग घेतलाय.महत्वाची जबाबदारी पाहिलंय. पण रॉय यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वारंवार विनंती केली, अर्ज पाठवले आणि पक्षाचे सरचिटणीस बी.एल. संतोष आणि कैलाश यांनी विजयवर्गीय यांना भेटण्याची मागणी केली, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याऐवजी, सुंदर महिला, ज्यांपैकी बहुतेक नवोदित फिल्म स्टार होत्या आणि त्यांचा राजकारणाशी कधीच संबंध नव्हता, त्यांना लगेचच पक्षाचे सदस्यत्व आणि एक निश्चित सीटही देण्यात येते.

रॉय पुढे म्हणाले कि, 

“पक्षाच्या नेत्यांच्या एका गटाने तृणमूलच्या गुंडांची निवड केली आणि माझ्यासारख्या पक्षाच्या निष्ठावंतांना डावलले हे खरोखरच दुर्दैवी आहे. मी सक्रिय सदस्यता घेण्यास पात्र नाही का? मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून पक्षाची सेवा केली असून अनेक उच्च पदांवर काम केले आहे. हे नेते माझा असा अपमान कसा करू शकतात? एक निष्ठावान कार्यकर्ता असल्याने मी मिस कॉल दिला आणि पक्षाचा सामान्य सदस्य बनलो.

आता भाजप असं का करतंय, तर  तथागत रॉय हे वादग्रस्त कार्यकर्ता आहे. जातीय टिप्पणी करण्याचा त्यांचा इतिहास आहे.  ते आता स्वतःला ‘व्हिसलब्लोअर’ म्हणून घेतात एका वृत्तसंस्थेला सिलरल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं कि, ते भाजपमधील भ्रष्टांचा पर्दाफाश करण्याच्या मोहिमेवर आहे. त्यांचं ट्विटर अकाउंट पाहिलं तर आपल्याला त्यांचं मिशन समजलेच. 

रॉय यांनी सांगितले की,

“राज्यपालपदाचा माझा कार्यकाळ संपुष्टात आला, तेव्हा मी पक्षात पुन्हा प्रवेश करण्याची आणि बंगालच्या राजकारणात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.  मी स्वत:साठी कधीही पद किंवा तिकीट मागितले नाही. विजयवर्गीय आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतली. मी त्यांना पक्षात पुन्हा सामील करण्याची विनंती केली आणि घोष यांच्या नेतृत्वाखाली काम करेन असेही सांगितले. पण काही अज्ञात कारणास्तव त्यांनी माझ्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. मला अनेक रहस्ये माहित आहेत आणि मी ते उघड करीन.

ते पुढे असंही म्हंटले कि, ‘मला समजतंय कि, त्यांना मला का घ्यायचा नाहीये.अनेक गोष्टी अतिशय चुकीच्या होत्या. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत १८ जागा जिंकणारा पक्ष त्याच वर्षीच्या तीनही पोटनिवडणुकीत हरला, ज्याचे कधीही विश्लेषण केले गेले नाही. विजयवर्गीय आणि त्यांचे मोहरे दिलीप घोष यांनी पक्षासाठी अजिबात काम केले नाही. जुन्या सदस्यांना एका विशिष्ट कारणावरून बाजूला करण्यात आले आहे. केंद्रीय नेत्यांनी पैसा आणि महिलांच्या बाबतीत स्वत:ला गुंतवून ठेवायला सुरुवात केली. 

रॉय यांचं ट्विटर अकाउंट पाहिलं तर ते पक्षाच्या नेत्यांच्या, विशेषतः विजयवर्गीय आणि घोष यांच्याविरोधात ट्विट करताना पाहायला मिळू शकतात. त्यांनी दावा केला आहे की, पक्षाच्या कोणत्याही सर्वोच्च नेत्याने किंवा कोणत्याही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने त्यांच्या ट्विटवर याबद्दल कधीही विचारले नाही.

रॉय म्हणतात,

‘सोशल मीडिया हे एकमेव ठिकाण आहे, जिथे मी माझे विचार मांडू शकतो आणि लोकांना हे माहित असणे आवश्यक आहे. सोशल मीडिया नसता तर माझा आवाजच हरवला असता. मला कधीही पक्षाची मान खाली घालायची नाहीये आणि म्हणून मी माझी चिंता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण माझे ऐकून घेतले नाही.

आता यावरून एक चित्र तर स्पष्ट होतंय कि, भाजपला कदाचित अंदाज असेल कि जर तथागत रॉय यांना पक्षात सामील केलं तर भाजपच्या नेत्यांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भाजप त्यांना आपली सक्रिय सदस्यत्व देत नाहीये.  

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.