९० मुलींवर अत्याचार, १२० न्यूड व्हिडीओज… या जलेबी बाबाने जणू पॉर्न इंडस्ट्री उभारली होती!

जलेबी बाबा हे नाव खरंतर एखाद्या हिंदी सिनेमातल्या विनोदी पात्रासारखं वाटतं ना? तसं हा जलेबी बाबा एक विचित्र पात्रच आहे. पण, विनोदी नक्कीच नाही. अतिशय क्रूर आणि विक्षिप्त अश्या मनोवृत्तीचा असा हा जलेबी बाबा आहे.

याच्या क्रूरतेबद्दल सरळ सरळ सांगायचं झालं तर, ९० हून अधिक मुलींसोबत गैरप्रकार आणि १२० पेक्षा जास्त अश्लील क्लिप्स तेही स्त्रीच्या संमतीशिवाय छुप्या पद्धतीने बनवलेली ही व्यक्ती आहे.

याच जलेबी बाबाला आता १४ वर्षांची कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार केल्याप्रकरणी १४ वर्ष, महिलांवरील बलात्कार प्रकरणात कलम ३७६ नुसार ७ आणि ७ वर्ष कोठडी सुनावली आहे. याशिवाय, आयटी कायद्यांतर्गत ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

आता या प्रकरणात त्याची एकूण शिक्षा पाहिली तर, ३३ वर्षांची होत असली तरी, त्याला या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत.

९ जानेवारीला पुरावे आणि कागदपत्र पाहिल्यानंतर न्यायालयाने निकाल मंगळवार म्हणजेच १० जानेवारीसाठी राखून ठेवला होता. हा निकाल लागताच जलेबी बाबा याने रडण्याचं ढोंग केलं. न्यायालयात शिक्षेपासून वाचण्यासाठी तो रडता रडता म्हणत होता,

“आता माझं वय झालंय. मला मोतीबिंदू झालाय. आता मला नीटसं दिसतही नाही… मला शिक्षा करू नका”

ही झाली या जलेबी बाबा कृत्य आणि त्याला झालेली शिक्षा, पण इतकं सगळं करण्यासाठी लागते ती कुटील बुद्धी.

या बाबाने हे सगळं कसं केलं, कसं लपवलं आणि मग त्याची ही सगळी प्रकरणं कशाप्रकारे बाहेर आली ते बघुया.

बाबा गूढ संमोहनात निष्णात होता.

जलेबी बाबा स्वतःला तंत्र-मंत्राचा महागुरु म्हणवत असत. महिलांना अडकवण्यासाठी तो भुताटकीचे नाटक करायचा. त्यानंतर त्यांना दारू पाजून बेशुद्ध करायचा. त्यानंतर नशेच्या धुंदीत तो अत्याचार करायचा. यादरम्यान हा बाबा छुप्या पद्धतीने महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवत असे. जी मुलगी एकदा बाबांच्या तावडीत सापडली की मग तिला पुन्हा पुन्हा बाबा वापरून घ्यायचा आणि तिला तावडीतून जाऊ द्यायचा नाही.

नव्वदहून अधिक महिलांवर बलात्कार करणे तसेच शंभरहून अधिक अश्लील क्लिप्स बनवणे हा काही किरकोळ गुन्हा नाही. हा आकडा इतका मोठा आहे की ऐकूनही विश्वास बसणे कठीण आहे. बाबा म्हणजे काय हे ऐकून जणू पॉर्न फिल्म्सची चालती बोलती इंडस्ट्रीच होती.

पण वर्षानुवर्षे इतकी पापे लपवून ठेवण्यासाठी बाबा सारखा मेंदू हवा. तसा हा जलेबी बाबा सामान्य माणसाच्या दोन पावले पुढे होता. त्यामुळेच तो हरियाणातील टोहाना येथील बाबा बालकनाथ यांच्या आश्रमाच्या आडून वर्षानुवर्षे आपल्या काळ्या कृत्यांवर पांघरूण घालण्यातच यशस्वी झाला आणि नवख्या मुलींनाही आपला बळी बनवत राहिला.

जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा ९० मुलींचे १२० हून अधिक अश्लील क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले होते, पण बाबाच्या अतिरेकी आणि अश्लील चित्रपटांची नेमकी गणना काय आणि ती कुठे संपते याची कल्पना खुद्द पोलिसांनाही नव्हती. बाबाच्या या कृत्याने पोलीसही हैराण झाले होते.

या कृत्यांचा खुलासा झाल्यानंतर अर्थातच हा अत्यंत बदनाम आणि कुप्रसिद्ध बाबा अमरपुरी उर्फ ​​जलेबी बाबा पोलिसांच्या तावडीत आला. पण बाबाचे कृत्य ऐकून खुद्द हरियाणा पोलीसही चकित झाले.

बाबांच्या आश्रमातून अशा गोष्टी वसूल गेल्या की जणू काही निष्पाप आणि गरीब मुलींना चिरडणे हेच बाबानी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनवले होते.

असं आलं बाबाचं सत्य समोर…

बाबांच्या अश्‍लील क्लिप्सनी भरलेली सीडी त्यांच्या एका खबऱ्याने पोलिसांना दिली, तेव्हा ती तपासल्यानंतर गणवेशधारी मंडळीही हादरली. प्रत्येक चित्रपटात बाबांच्या आश्रमात बांधलेली अंधारकोठडी, तळघरात ठेवलेल्या वस्तू, आजूबाजूचे वातावरण, बाबांच्या कृती या सर्व गोष्टी सारख्याच होत्या, फक्त प्रत्येक वेळी बाबांसोबत चित्रपटात एक नवीन मुलगी असायची.

बाबा त्या नवख्या मुलीला संमोहन आणि नशेच्या जाळ्यात अडकवून केवळ नियंत्रणात आणत नसे, तर अत्याचारानंतर तिला फोन करून सतत शपथ घ्यायला सांगत असे की ती हे सर्व स्वेच्छेने आणि आनंदाने करते. किंबहुना ही एक अशी मानसिक नौटंकी होती, ज्यानंतर बाहेर गेल्यावर काही काळ हे सगळं खरंच तिच्या इच्छेने होतं की तिच्या इच्छेविरुद्ध हे ठरवणं त्या मुलीला स्वतःहून अवघड जात होतं.

पोलिसांनी बाबाला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेऊन चौकशी सुरू केली. म्हणजे रिमांड होममध्ये बाबाला सडकून काढलं. हिंमत करून एका मुलीने एकदा समोर येऊन बाबांविरोधात तक्रार दाखल केली. पण बाबाच्या बळी ठरलेल्या, बाबाने ज्यांच्यावर अत्याचार केले आणि ज्यांच्यावर अश्लील चित्रपट प्रसारित केले, अशा असंख्य मुलींसमोर येऊन पोलिसांनी बाबाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तिने आवाहन केले आणि बाबा सध्या जेलमध्ये चक्की पिसतोय.

आता न्यायलयाने या बाबाला १४ वर्षांची कैद सुनावली आहे. या बाबाने आतापर्यंत नक्की किती मुलींचं आणि स्त्रियांचं शोषण केलंय याचा अंदाज पोलिसांना किंवा न्यायालयाला तर सोडाच पण खुद्द बाबाला तरी असेल की नाही हे सांगणं कठीणच आहे. केवळ, पुरावे ९० मुलींबाबतचे आहेत म्हणून कारवाई ९० मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी झाली.

याव्यतिरिक्त ज्यांचे व्हिडीओज बनवले नाहीत अशाही काही स्त्रिया आणि मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.