राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का..?

राज्यातल्या तूफान राड्यात आज कॅबिनेट बैठक पार पाडली.  मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेमकं काय झालं याची विचारणा माध्यमांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले,

कोविडची स्थिती आणि नियमित विषयांवर चर्चा झाली. 

सोबत माध्यमांनी राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं देखील सांगण्यात आलं.

थोडक्यात काय तर कोरोनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला, आत्ता पुन्हा लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न देखील विचारण्यात येत आहे. कारण कोरोना सोबत राजकीय परिस्थिती देखील बिघडत आहे.

करोनाची साथ काही आपला पिच्छा सोडायला तयार नाही. एक व्हर्जन मागे पडला तोच दुसरा व्हर्जन तयार होतो आणि करून परत पसरायला लागतो. तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्ण घटत आली तरी, ओमोक्रॉनचा नवीन म्युटंट मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने चिंता वाढली आहे.   

महाराष्ट्रातली स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललीय

राज्यात गेल्या चोवीस तासात ३६५९ जणांना कोरोनाची लागण झाली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. सोबतच देशात गेल्या चोवीस तासात १२ हजाराहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून यात करोनाने १३ लोकांचा मृत्यू झालाय. परंतु सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रातले असल्याने राज्यात काळजीचे वातावरण आहे. 

एक जूनपासून करोनाची लागण झाल्याची रुग्णसंख्या वाढू लागलीय. १ जूनला १०८१ जणांना करोनाची लागण  झाली. यात वाढ होत १६ जूनला करोनाची लागण झालेल्यांची संख्या ४२५५ होती. मात्र १७ जूनपासून करोना रुग्णांची संख्या घटत आहे. सोबतच राज्यात मागील तीन दिवसांपासून करोनाच्या चाचण्या कमी केल्या आहेत.  

राज्यात सध्या करोनाची रुग्णसंख्या २४,७१५ असुन हा आकडा चिंताजनक आहे. 

कोरोनाची देशात स्थिती कशी आहे

देशभरात गेल्या चोवीस तासात रुग्णांचा आकडा १२ हजाराहून अधिक आहे. तर देशातील ॲक्टीव रुग्णांची संख्या ८१६८७ झालीय. देशात चोवीस तासात १३ जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ५२४९०३ जणांचा करोनाने मृत्यू झालाय.

देशात महाराष्ट्रापाठोपाठ केरळ राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. केरळमध्ये २३४६० लोक करोनाने बाधित आहेत.

नॅशनल व्हायरालॉजी इन्स्टिटयूटच्या रिसर्चने नवीन म्युटंट असल्याची माहिती दिलीय 

ओमायक्रोनचा नवीन म्युटंट आलाय. त्याचं नाव आहे बीए.२.३८. राज्यात वाढलेले सगळ्यात जास्त रुग्ण याच नवीन म्युटंटचे आहेत. नॅशनल व्हायरालॉजी इन्स्टिटयूट आणि सायन्स, एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटने ११७ नमुन्यांचा अभ्यास केला आणि ओमायक्रॉनचा हा नवीन म्युटंट आला असल्याची माहिती दिली. 

डब्लूएचओ ने बीए.२ ला ओमायक्रोनचा नवीन म्युटंट घोषित केलय तर भारतातील  संशोधनांतर त्याचा आणखी नवीन व्हेरियंट तयार झाल्याचं नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलंय. 

यासोबतच राज्यात करोनाच्या बी.४ आणि बी.५ चे रुग्ण रुग्ण सुद्धा वाढत आहेत. परंतु त्यांची संख्या अजूनतरी कमी असल्याची माहिती जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्र समन्वयक राजेश कार्यकर्ते यांनी दिलीय. 

राज्यात वाढणारे करोनाचे केस ओमायक्रॉनचे आहेत. यात कोणताही नवीन व्हेरियंट आलेला नाही. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी १५ जूनला दिली होती. परंतु त्यानंतर यावर कोणतीच माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलेली नाही.

याबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी करोनाची साथ अजून संपलेली नाही यामुळे प्रत्येकाने करोना नियमाचे पालन करायला हवे. असं १३ जूनला सांगितले होतं. परंतु त्यांनी यावर कोणतीही माहिती दिली नाही.

राज्यात १ जुनपासून करोनाची रूग्णसंख्या वाढत होती परंतु तिच्यात घाट होत आहे. तरीही चौथी लाट येऊन पुन्हा लॉकडाऊन लागेल ही चिंता लोकांच्या मनात वाढत आहे. तज्ज्ञांनी जून महिन्याच्या शेवटी चौथी लाट येण्याची शक्यता मी महिन्यात वर्तवली होती. परंतु अद्यापतरी तशी परिस्थिती येणार नसल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसते.

महाराष्ट्र सरकारने हटवलेल्या मास्क बंदीवर टास्क फोर्सचे राहुल पंडित यांनी चिंता व्यक्त केली होती. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.