भारताचं कोवीन बनलंय ग्लोबल प्लॅटफॉर्म, ७६ देशांना आपल्या लसीकरणासाठी वापर करायचाय

जगभरात सुरु असलेल्या कोरोना साथीच्या विरुद्ध अनेक देशांनी यशस्वीपणे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. भारतातही यावर्षी म्हणजे १६ जानेवारी २०२१ पासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने दिल्या जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेत देशातील ३४ कोटी लोकांनी लस घेतलीये.

दरम्यान, या लसीकरणात  सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती ‘कोवीनने(CoWIN). कोविन म्हणजे कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स वर्क. देशात कोविड- १९ विरूद्ध लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारनं याला उतरवलं होत. लसीकरण प्रक्रिया संबंधित ही एक वेबसाईट आहे. ज्यावर आपण ऑनलाईन पद्धतीने  लसीचे स्लॉट बुक करू  शकतो.  कोवीन वेबसाईट बरोबरच आपण त्याच्या मोबाईल अप्लिकेशनवर जाऊनही लसीचे स्लॉट बुक करू शकतो. 

कोवीन अश्या पद्धतीन करत काम…

युजर्स लसीसाठी  आपल्या फोन नंबरसह वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यांनतर आपल्याला एक ओटीपी आणि  युजर्सला आपले सर्व डिटेल्स भरावे लागतील. या प्रक्रियेनंतर आपण लसीकरण स्लॉट बुक करण्यासाठी पुढे जाऊ शकतो. यात आपण एकाच आपल्या कुटुंबातील ४ जणांचं रजिस्ट्रेशन करू शकतो. लसीकरणानंतर आपण पोर्टलवरूनच सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो.

दरम्यान सध्या मोदी सरकार योजना आखतयं की, भारताच्या लसीकरण मोहिमेचा तांत्रिक कणा असणाऱ्या ‘कोविन’ ला ‘भारत सरकारकडून परवानाधारक उत्पादन म्हणून सामायिक केले जाईल, जे देश त्यात आपला इंटरेस्ट दाखवतील त्यांना ते मोफत उपलब्ध केले जाईल.

कोविड -१९  लसीवरील नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी या अधिकार समितीचे  प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  कोविन भारतात एक डिजिटल जनहित आहे आणि त्याच अपेक्षेने ते इतर देशांशीही शेअर केले जाईल.  यासाठी एकमेव अट अशी असेल की, सॉफ्टवेअरच्या व्यावसायिक वापरासाठी किंवा विक्रीसाठी पुन्हा त्याच्या पॅकेजची परवानगी दिली जाऊ नये. 

आर. एस. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत ७६ देशांनी  केंद्राकडे कोवीनसाठी इंटरेस्ट दाखवलाय. ज्यात कॅनडा, मेक्सिको, नायजेरिया, पनामा आणि युगांडा यांसारख्या देशांचा समावेश असेल.  याच पार्श्वभूमीवर या सॉफ्टवेअरची क्षमता दाखवण्यासाठी सरकार ५ जुलैला जगभरातील आरोग्य आणि तांत्रिक तज्ञांची एक आभासी जागतिक बैठक आयोजित करणार आहे.

कोव्हिनवरील या  जागतिक बैठकीला परदेशातील १९६ अधिकारी आणि ४१ देशांतील ११६ खासगी व्यक्तींनी नोंदणी केली आहे. अर्थातच या बैठकीच्या माध्यमातून अशा देशांनीही माहिती मिळेल, जे आपल्या इथे लसीकरणाच्या या  प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात इंटरेस्टेड असतील.

कोविन हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे टेक प्लॅटफॉर्म आहे. जे १६ जानेवारीला लॉन्च करण्यात आलं होती. लॉन्चिंगच्या ४ महिन्यात कोवीनने २० कोटी रजिस्ट्रेशनचा आकडा गाठलाय. त्यांनी पुढं म्हंटल कि, १ जुलै पर्यंत ३५.४ कोटी लोकांनी प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन केलयं. 

पासपोर्टला व्हॅक्सिन सर्टिफिकेटशी जोडा

सरकार सध्या कोवीन अप्लिकेशनला अपडेट करण्यासाठी त्यात काही बदल करणार आहे. त्याअंतर्गत पासपोर्ट नंबरला व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटशी जोडले जाईल. महत्वाचं म्हणजे हे केवळ आंतरराष्ट्रीय यात्रेसाठीच केले जाईल.

दुसरा बदल म्हणजे एक टॅबही दिला जाईल ज्यात वैयक्तिक डेटा एडिट केला जाईल आणि व्हॅक्सिन सर्टिफिकेटमधल्या चुका दुरुस्त केल्या जातील.

शर्मा यांनी सांगितलं कि, ‘सरकारला आढळलं कि, बऱ्याच  प्रकरणांमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करताना अनेकांना आपलं नाव, पत्ता, जन्म तारीख किंवा जेंडरबद्दल चुकीची माहिती भरतात. त्यामुळे सरकार आता लोकांना या चुका सुधारण्याची परवानगी देतो, जेणेकरून त्यांच्या व्हॅक्सिन सर्टिफिकेटमध्येही सुधारणा करण्यात येईल.  

अपडेट केलेल्या अप्लिकेशनमध्ये एकाच व्यक्तीसाठी पहिल्या डोससाठी दोन सर्टिफिकेट दिले जातील.

शर्मा यांच्या म्हणण्यानुसार सरकारनं  एक प्रक्रिया तयार केलीये, ज्यात ज्या नागरिकांनी चुकून लसीच्या दोन डोससाठी दोन वेगवेगळ्या अकाउंटचा वापर केलाय. असे नागरिक आपली दोन्ही सर्टिफिकेट एकत्र जोडू शकतील. यासाठी सरकार सगळ्यांकडून फीडबॅक घेतंय, स्वतःच्याअनुभावांतून शिकतयं आणि प्लँटफॉर्म विकसित करतंय. जेणेकरून ते सर्वांसाठी जास्तीत जास्त सोपं आणि सर्वसमावेशक होईल.

कोवीनला इतर कन्ज्युमर अॅप्ससोबत जोडलं

शर्मा यांनी संगितलं कि,  हे सॉफ्टवेअर दररोज नवीन बेंचमार्क आणि रेकॉर्ड सेट करतंय. त्याच्या अधिकाधिक व्यापकतेसाठी, पेटीएम, रिलायन्स ग्रुप, ज्युबिलंट फूडवर्क्स, आयबीबो, १ एमजी, मॅक्स हॉस्पिटल्स, एका डॉट केअर आणि अपोलो हॉस्पिटल्स यासारख्या ग्राहकांशी अटॅच असलेले अ‍ॅप्स एकत्र आले आहेत.  एकूणच यामागचा हेतू म्हणजे भारतातील लसीकरण  मोहिमेसाठी एक व्यापक आउटरीच देणं आहे.

शर्मा यांनी सांगितलं कि, “कोविनशी जोडून राहण्यसाठी सरकारला खासगी आणि सार्वजनिक संस्थांकडून २०४  हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी १४८ स्वीकारले गेले आहेत, जे एकीकरण प्रक्रियेत आहेत. यामुळे या कंपनीचे  युजर्स आता व्हॅक्सिन्ससाठी उपलब्ध स्लॉट्स पाहू शकतील. 

या निर्णयामुळे संबंधित आयडी किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे युजर्स कोवीनवर आपल्या व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटपर्यंत पोहोचू शकतात. याद्वारे हे अॅप्स वापरकर्त्यांना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा पर्याय देऊ शकेल. या प्रकरणात कोविन नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपीची पडताळणी केल्यानंतरच कोवीन  सर्टिफिकेट देईल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.