म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये ७५ वर्षांनंतर तिरंगा फडकणार आहे…

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील कार्यालयांमध्ये यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच पक्षाच्या झेंड्याऐवजी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. ‘माकप’चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी नुकतीच १५ ऑगस्ट रोजी पक्ष कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवण्याची घोषणा केली आहे. सोबतच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही माकपकडून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पण या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर आता त्यामागची कारण देखील विचारली जातं आहेत. सोबतच दुसऱ्या बाजूला भाजपसह तृणमूल काँग्रेसने माकपवर टिका देखील केली आहे.

आता या निर्णयामागची नेमकी कारण काय आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्याआधी माकप तिरंगा का फडकवत नव्हता हे देखील बघणं गरजेचं आहे.

तर १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १९४८ मध्ये भाकप अर्थात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एक घोषणा दिली. हि घोषणा होती,

‘ये आज़ादी झूठी है’

याच कारण कम्युनिस्ट नेत्यांच मत होतं कि, ‘खरं स्वातंत्र्य’ हे अहिंसक संघर्षाच्या मार्गाने मिळूच शकत नाही. त्यामुळे या स्वातंत्र्याला आम्ही स्विकारत नाही. यामागे तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख भालचंद्र त्र्यंबक रणदिवे अर्थात बी.टी. रणदिवे यांची कल्पना होती. त्यांनी कथित रित्या भारतात एक सशस्त्र क्रांतीच्या बाजूने आपले विचार मांडले होते.

तेव्हा पासून कम्युनिस्ट पक्षांकडून १५ ऑगस्टच्या कोणत्याही औपचारिक कार्यक्रमात सहभाग घेतला जात नव्हता. भारताच्या स्वातंत्र्यदिनी डावे पक्ष त्यांच्या कार्यालयांमधील कार्यक्रमात केवळ पक्षाचा लाल रंगाच्या झेंडा फडकवतात

पुढे १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वेगळा झाला. त्या नंतरच्या काळात पश्‍चिम बंगालमध्ये ‘माकप’च्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी देखील स्वातंत्र्यदिनी कोणत्याही शासकीय किंवा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय ध्वजावंदन करण्याचे टाळले होते.

मात्र पुढे बसूंच्या या वागण्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर सुप्रसिद्ध रॉयटर्स बिल्डिंगसमोर होणाऱ्या सरकारी ध्वजावंदनाच्या कार्यक्रमात १९८२ पासून तिरंगा फडकावण्यास सुरुवात केली.

मग आता का स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे?

पक्षाच्या केंद्रीय समितीकडून सदस्यांच्या नावे याबाबत नुकतंच एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यात सांगितल्यानुसार स्वतंत्र भारताच्या इतिहासाला पुनरुज्जीवित करण्यासाठी, आणि या महासंग्रामात कम्युनिस्ट पक्षांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी अभियान सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच हे अभियान वर्षभर चालवण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

या निवेदनात पुढे यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगण्यात आला आहे. यात म्हंटले आहे कि,

आधुनिक भारताची निर्मिती आणि भारताचे विचार (आयडिया ऑफ इंडिया) या मजबूत करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य चळवळीतून गायब असणे किंवा कधी कधी इंग्रजांची साथ देणे, आणि आजच्या काळात भारताच्या संवैधानिक धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याची अवहेलना अशा मुद्द्यांवर प्रकाश टाकत स्वातंत्र्य दिनाचं ७५ वे वर्ष साजरे केले जाणार आहे.

माकपच्या पॉलिटी ब्युरोचे सदस्य आणि माजी राज्यसभा खासदार नीलोत्पल बसु म्हणाले,

मागच्या ७५ वर्षांमध्ये आम्हाला पहिल्यांदाच जाणवत आहे कि, ‘आइडिया ऑफ इंडिया’ धोक्यात आहे. त्यामुळेच आम्ही यंदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभियान देखील सुरु केलं जाणार आहे.

माकपच्या पॉलिटी ब्युरोचे आणखी एक सदस्य आणि माजी खासदार मोहम्मद सलीम यांच्या मते स्वातंत्र्याच्या लढाईत कम्युनिस्टांचा इतिहास आणि त्यांचं योगदान आणि यांची आठवण पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी वर्षभर हे अभियान चालवणं गरजेचं होतं. 

माकपच्या या निर्णयावर इतर पक्षांची टिका

माकपच्या या निर्णयाच आता स्वागत देखील होत आहे आणि त्यांच्यावर टिका देखील होतं आहे. यात मग ‘साम्यवाद का विचार मर चुका है इथपासूनच्या टीकांचा समावेश आहे. तर भाजपकडून या निर्णयावर टीका करताना विधानसभा निवडणुकीत निराशजनक कामगिरीमुळे घेण्यात आल्याचं म्हंटलं आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल घोष यांनी कम्युनिस्टांना या निर्णयाची जाणीव खूप उशिरा झाल्याचं म्हंटलं आहे. पण हि जाणीव तेव्हाच झाली जेव्हा ते बंगालमध्ये शून्यवर आले. एकूणच आता टीका होत असली तरी या निर्णयाचं स्वागत देखील होताना दिसत आहे. मात्र ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच माकपच्या कार्यालयात हे मात्र नक्की.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.