भिंतीवरच्या घोषणांमुळे सेना घराघरात पोहचली पण ती क्रिएटिव्हिटी गेली कुठे ?
ठाकरे गट आणि शिंदे गट. त्याच सभा तीच आव्हाने. तोच आमचा गुवाहाटीचा प्रयोग म्हणून होणारी भाषणं आणि तेच पाठीत खंजीर खुपसला म्हणून होणारा आरोप. सगळं ओक्के आहे पण एक गोष्ट मीस आहे. ती म्हणजे क्रिएटिव्हिटीची.. ..ही क्रिएटिव्हिटी होती घोषणांची, निवडणूकींच्या स्लोगनची.. मुंबईच्या चाळींच्या भिंती, उडाणपुल, पाण्याच्या टाक्यांवर या घोषणा लिहल्या जायच्या. या घोषणांमुळेच वातावरण एका दणक्यात बदलायचं आणि या सर्वांच्या मागे असायचं ते बाळासाहेब ठाकरेंच डोकं…!
एक काळ होता जेंव्हा मार्मिकमध्ये, वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या शिवसेनेच्या जाहिराती लक्ष वेधून घेणाऱ्या असायच्या. मुंबईच्या खऱ्या खुऱ्या भिंतीवर शिवसेनेनं घोषणा लिहून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा होती. शिवसेनेच्या प्रचारातल्या घोषणा, जाहिरातीतलं कन्टेन्ट हे क्रिएटिव्हिटीचं उत्तम उदाहरण होतं. पण अलीकडच्या काळात शिवसेनेची क्रिएटिव्हिटी संपलीय का ? असा प्रश्न पडतोय..
ही गोष्ट आहे शिवसेनेच्या इतिहासाची आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीची…
जाणून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा..