देशाच्या चलनावर फोटो असणारा हा जगातला एकमेव क्रिकेटर आहे…

भारतीय नोटेवर म. गांधीचा फोटो आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या नोटांवर त्या त्या देशाच्या महान व्यक्तींचा समावेश होतो. पण जगात असाही एक देश आहे जिथल्या नोटेवर एका क्रिकेटरचा समावेश करण्यात आलेला आहे. क्रिकेटच्या योगदानामुळे या देशाने आपल्या देशाच्या चलनावर त्यांचा फोटो छापला आहे.

या महान क्रिकेटपटूचे नाव आहे फ्रँक वॉरेल.

फ्रँक वेस्टइंडीजचे माजी कर्णधार आणि दमदार खेळाडूंपैकी एक होते. ते जगातील एकमेव असे खेळाडू आहेत ज्याचा फोटो बार्बाडोस देशाच्या चलनावर आहे.

१९४१ मध्ये जेव्हा फ्रँकने जेव्हा पहिल्यांदा खेळण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या खेळण्याच्या अंदाजाने चाहत्यांची मने जिकली. सर डॉन ब्रैडमैन, सुनील गावस्कर, विवियन रिचर्ड्स, कपिल देव, सचिन तेंदुलकर आणि ब्रायन लारा यांच्या प्रमाणे लोकप्रिय तर नाही झाले. पण, त्यांना असणाऱ्या सामाजिक जाणीवेमुळे ते आजही ओळखले जातात.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार फ्रँक वॉरेल यांनी आपल्या कार्यकाळात ५१ कसोटी सामने खेळले आहेत. अवघ्या ४२ वयातच फ्रँकला मृत्यूने गाठले.

पण, वेस्ट इंडीज क्रिकेटला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले. 

१९६० च्या आधी वेस्टइंडीजमध्ये गोऱ्या इंग्रजांचे वर्चस्व होते. कृष्णवर्णीय लोकांना कमी दर्जाचे ठरवले जायचे. अशातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वेस्टइंडीजच्या कर्णधारपदी फ्रँक वॉरेल यांची नियुक्ती केली जावी यासाठी तिथल्या वृत्तपत्रांनी मोहीम चालवली. १९६१ मध्ये वॉरेल यांना वेस्टइंडीज संघाच्या कर्णधारपदी विराजमान झाले.या संधीचे सोन्रे करत फ्रँक यांनी जगभरात आपले नाव पोहोचवले.

फ्रँक वॉरेल यांचे आणि भारत भूमीशी जोडणारा एक किस्सा प्रसिद्ध आहे.

त्याच झाल अस की, १९६२ मध्ये भारत वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर असताना चार्ली ग्रिफिथ यांच्या वेगवान बॉलिंगवर भारतीय कर्णधार नरी काँट्रॅक्टर गंभीररित्या जखमी झाले. यावेळी नरी यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी फ्रँक वॉरेल यांनी रक्तदान करून नरी काँट्रॅक्टर यांचे प्राण वाचवले होते.

फ्रँक वॉरेल यांनी नरी काँट्रॅक्टर यांचे प्राण वाचवल्याची आठवण म्हणून आजही कोलकत्ताच्या ईडन गार्डन्स मैदानावर  ‘फ्रँक वॉरेल डे’ साजरा केला जातो. इथे रक्तदान शिबीरही आयोजित केले जाते.

या कर्णधाराच्या स्मृती जाग्या राहाव्यात यासाठी बार्बाडोस देशाने आपल्या ५ डॉलरच्या नोटेवर आणि पोस्ट तिकिटावर फ्रँक वॉरेल यांचा फोटो छापून त्यांचा सन्मान केला आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.