गावस्करांना टोपणनाव देण्याऱ्या मुंबई क्रिकेटच्या द्रोणाचार्यांचं निधन झालंय.

मुंबई क्रिकेटने भारताला आजवर अनेक दर्जेदार आणि तंत्रशुद्ध बॅट्समन दिले आहेत. त्यापैकी म्हणजे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, रोहित शर्मा या लोकांचा खेळ तर आपण पाहतोच पण या खेळाडूंना घडवणाऱ्या क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासू परांजपेंचं ३० ऑगस्ट २०२१ रोजी निधन झालं.

आपल्या कारकिर्दीत अनेक धुरंधर खेळाडू वासू परांजपेंनी घडवले.

मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेवर वासू परांजपेंचं प्रभुत्व होतं. क्रिकेट करियर मध्ये वासू परांजपेंनी १९५६ ते १९७० च्या काळात बडौदा आणि मुंबईसाठी २९ फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्या. फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमध्ये त्यांनी ७८५ धावा केल्या होत्या सोबतच ९ विकेटसुद्धा त्यांनी मिळवल्या होत्या. सुरवातीच्या काळात दादर युनियनकडून ते स्थानिक क्रिकेट खेळत असे. त्यावेळी दादर युनियनची टीम सगळ्यात जबरदस्त मानली जाई. 

२१ नोव्हेंबर १९३८ रोजी वासू परांजपेंचा जन्म गुजरातमध्ये झाला. भारताचे सिलेक्टर राहिलेले जातीं परांजपे हे वासू परांजपेंचे चिरंजीव होते. खेळाडू पदावरून जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांनी खेळाडू घडवण्यास सुरुवात केली. इंटरनॅशनल स्तरावर ज्यांनी मैदान गाजवलं अशा अनेक खेळाडूंना त्यांनी ट्रेनिंग दिली. यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.

वासू परांजपे अनेक ठिकाणी प्रशिक्षक म्हणून होते, नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे ते कोचसुद्धा होते. सचीन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांनी वासू परांजपेंच्या निधनाने क्रिकेटचं खूप मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. सुनील गावस्कर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. 

रोहित शर्मा वासू परांजपेंबद्दलची आठवण सांगताना म्हणतो कि,

तो आजही वासू सरांच्या मेसेजची वाट पाहत असतो. जेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा ते माझी बॅटिंग बघायचे आणि त्यांच्या अनेक सूचना माझ्या खेळात सुधार करण्यास मदत करायच्या. प्रत्येक मॅचनंन्तर त्यांच्या सूचना माझ्यासाठी गरजेच्या असायच्या.

सुनील गावस्करानी लिहिलेल्या सनी डेज या आत्मचरित्रात वासू परांजपेंची आठवण सांगताना गावस्कर लिहितात कि मला सनी हे टोपणनाव वासू सरांमुळे मिळालं. वासू परांजपे क्रिकेटबद्दल आग्रही तर होतेच शिवाय खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही त्यांना काळजी होती. असाच एक किस्सा संदीप पाटलांच्या आयुष्याशी निगडित आहे. 

संदीप पाटील ज्या मुलीवर प्रेम करत होते तिच्यासोबत लग्नही त्यांना करायचं होतं पण त्या मुलीच्या घरचे या गोष्टीला राजी नव्हते. तेव्हा संदीप पाटील वासू परांजपेंना घेऊन गेले कारण त्यांची लोकांमध्ये चांगली ओळख होते.

तेव्हा वासू परांजपेंनी मुलीच्या आईवडिलांना सांगितलं कि, हि जर माझी मुलगी असती तर मी तिचं लग्न आनंदाने संदीपशी केलं असतं. आणि लगेचच सगळी बोलणी झाली आणि दीपा यांचं लग्न संदीप पाटलांशी झालं.

वासू परांजपे यांनी मुंबईतून अनेक खेळाडू घडवले त्यामुळे त्यांना मुंबई क्रिकेटचा द्रोणाचार्य म्हणून ओळखलं जायचं. वासू परांजपेंच्या निधनाने क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. यावर अनेक खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. ते ८२ वर्षाचे होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.