युवराज सिंग अटक प्रकरणात नेमकं काय काय घडलंय ?
भारतात तुम्ही किती ही मोठे व्यक्ती असा, तुम्ही जातीवाचक बोललात ना की सिस्टीम तुम्हाला धरणार याची १०० टक्के गॅरंटी असते. आणि पब्लिक जे ट्रोल करून सोशल मीडियावर तुमची घेते ना, विषय लै हार्ड होतो मग.. आणि युवी पाजींचा असाच विषय हार्ड केलाय पब्लिकनं.
त्याच झालंय असं की, जातीवाचक बोलण्याचं प्रकरण युवराज सिंगच्या अंगलट आलय.
प्रकरण विस्तारानेच बघूया.
भारताला २०११ साली आयसीसी वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या युवराज सिंगने २०२० साली एका लाइव्ह चॅटमध्ये भारताचा स्पिनर युजवेंद्र चहलविरुद्ध जातीवाचक शब्दाचा वापर केला होता.
रोहित शर्मा सोबतच्या इस्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये त्याने हा जातीवाचक शब्द वापरला होता. त्यानंतर दोघांच्या चॅटमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी क्रिकेटच्या बऱ्याच मुद्यांवर लाइव्ह चॅट केल होत. दोघांनी क्रिकेटच्या मैदानावरील आणि बाहेर अनेक गोष्टी एकमेकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर केल्या. यातच भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह यांच्याबद्दल कमेंट केली. या चॅटमध्ये युवराज आणि रोहित चहलच्या टिकटॉक व्हिडिओवर बोलत होते.
रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता.
त्या घटनेनंतर सोशल मीडियावर युवराज सिंगविरुद्ध मोहिम सुरू झाली होती. त्याने माफी मागावी अशी मागणी अनेक जण करत होते. तेव्हा #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग काही दिवस टॉपवर होता. अनेकांचा विरोध असल्याने अखेर युवराजने सोशल मीडियावरून माफी मागितली.
पण आता हे प्रकरण का तापलंय ?
तर या प्रकरणावर दलित अधिकार कार्यकर्ता रजत कलसन यांनी हांसी शहर पोलीस स्टेशन मध्ये एससी-एसटी ऍक्ट व आयपीसी च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला.
मग काय लागलीच हरियाणाच्या हांसी पोलिसांनी युवराजला अटक केली. यावर युवराजने हायकोर्टात लगेचच जामिनासाठी अर्ज केला.
युवराजने आपलं म्हणणं मांडताना म्हंटल की, मला माहित नव्हतं की असे शब्द वापरणं चुकीचं आहे.
आता युवी पाजीला जमीन तर मिळालाय, पण हा जमीन औपचारिक आहे. हा विषय कोर्टाच्या विचाराधीन आहे. जर कोर्टाला यात काय वावगं वाटलं तर पाजीच्या शिट्ट्या पुन्हा वाजणार हे पुन्हा काय सांगायला नको.
हे ही वाच भिडू
- नाही तर धोनीऐवजी युवराज सिंग भारताचा कॅप्टन झाला असता
- सचिनशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण आजही युवराजसिंगला भावूक बनवते
- त्यादिवशी दादाने कप्तानीचा राजीनामा दिला. कारण होता युवराजसिंग !!