इंजिनिअरिंगच्या स्कोपचा नाद सोडला आणि हे विद्यार्थी पुढे स्टार क्रिकेटर झाले…..

दहावी बारावीचे पोरं एकदा पेपर देऊन आले कि त्यांना एक प्रश्न  कायम विचारला जातो तो म्हणजे मंग पुढं काय ? काहीजण असतात करिअरविषयक सल्ले देणारे त्यापैकी इंजिनिअरिंग घे म्हणणारे जास्त आढळतात. इंजिनिअरिंग घे भावा लय स्कोपय. पण हे स्कोप समजून इंजिनिअरिंग घेणारे पुढं इंजिनिअर बनण्याऐवजी तिसरच काहीतरी करू लागतात.

काहीजण सिनेमात जातात, काही फोटोग्राफीकडे तर काहीजण क्रिकेटकडे. तर आज आपण असे क्रिकेटर जाणून घेऊया ज्यांनी इंजिनिअरिंग तर केलं पण इंजिनीअरिंगमध्ये मन न रमल्याने त्यांनी क्रिकेटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. इंजिनिअरिंगमधेच करिअर करता येतं या अपेक्षेत न राहता त्यांनी आपली आवड जोपासली आणि स्वतःला सिद्ध केलं.

 इरापल्ली प्रसन्ना 

इरापल्ली प्रसन्ना यांचा तर विषयच वेगळा आहे. त्यांची पहिली टूर होती वेस्ट इंडिजविरुद्ध. त्यांना पहिलीच मॅच इतकी हार्ड गेली कि ते परत दुसरी मॅच खेळायला त्यांना पुढची ५ वर्षे लागली. पण इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करण्यासाठी त्यांनी क्रिकेट अर्ध्यावरच सोडून दिलं होतं. म्हैसूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मधून प्रसन्ना यांनी आपली डिग्री पूर्ण केली होती.

के श्रीकांत 

के श्रीकांत हे भारताचे सगळ्यात स्फोटक बॅट्समन म्हणून ओळखले जातात. वर्ल्डकपच्या विजेत्या संघाचा सदस्य म्हणून त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. इकडं क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या के श्रीकांत यांनीही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. इलेकट्रीकल इंजिनिअरिंग ऍट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गुइंडि मधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली होती.

 अनिल कुंबळे 

पाकिस्तानची बॅटिंग ऑर्डर उध्वस्त करणारा गोलंदाज म्हणून अनिल कुंबळे जगभर फेमस आहे. ज्यावेळी भारतीय संघामध्ये अनिल कुंबळेची निवड झाली तेव्हासुद्धा ते कॉलेजचं पूर्ण करत होते. इंजिनिअरिंगची डिग्री आरव्हीसीई कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये १९९१ साली पूर्ण केली होती. पण जेव्हा कुंबळे शिकत होते त्याच वेळी त्यांना भारतीय संघासाठी बोलावणं आलं, १९९१ साली इंग्लंडविरुद्धच्या टेस्टसाठी त्यांची निवड झाली होती.

जवागल श्रीनाथ 

भारताचा आघाडीचा गोलंदाज म्हणून जवागल श्रीनाथ याचं नाव घेतलं जातं. भल्या भल्या बॅट्समनची भंबेरी जवागलच्या बॉलिंगसमोर उडायची. पण क्रिकेटमध्ये येण्याअगोदर श्रीनाथसुद्धा इंजिनिअरिंग करत होते. बीई डिग्री इन इंस्ट्रुमेंटेशन फ्रॉम श्री जयचमाराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हैसूर मधून श्रीनाथने डिग्री पूर्ण केली.

 सईद अनवर

पाकिस्तानचा सचिन तेंडुलकर अशी ओळख असलेला सईद अनवर हा सुद्धा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. NED युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कराची मधून सईद अनवरने डिग्री पूर्ण केली होती. NED मधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर सईद अनवर मास्टर्ससाठी विदेशात जाणार होता पण पुढे तो संघात सिलेक्ट झाला होता.

आर अश्विन

आपल्या बोटाच्या जादूने बॅट्समनची विकेट घेणारा आर अश्विन एकेकाळी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. इंजिनिअरिंगच्या काळात क्रिकेटमध्येही आर अश्विन टॉपला होता. तो चेन्नईच्या बी.टेक डिग्री इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम एसएसएन मधून डिग्री मिळवलेला विद्यार्थी होता.

इंजिनिअरिंगने जगाला काय दिलं तर ते म्हणजे असे जबरी क्रिकेटर. इंजिनिअरिंगचा स्कोप या खेळाडूंना खेळात दिसला आणि त्यांनी खेळात करिअर केलं. इंजिनिअरिंगची वाढती डिमांड बघून यांनी खेळात जाण्याचा निर्णय घेतला कि काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. पण इंजिनिअर क्रिकेटर म्हणून हे सगळेच खेळाडू लै भारी आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.