या सोळा क्रिकेटर्सनी #IndiaAgainstPropaganda हे ट्विट केलेलं नाहीए

दिल्लीत नवीन कृषी कायद्याविरोधात मोठ आंदोलन सुरुय. शेतकऱ्यांच्या बाजुने आंतराष्ट्रीय सेलिब्रिंटींनी ट्वीट केल. यात ग्रेटासह पॉप गायिका रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्षा हॅरिस यांची भाची लेखिका मीना हॅरिस यांनी ट्विट केल.

या सगळ्यांच्या विरोधात क्रिकेटच मैदान गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरसह अनेकजण उतरले. या सगळ्यांनी ट्विटरवर #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हा ट्रेंड चालवून सरकारचे समर्थन केले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकरने केलेले ट्विट रिट्विट करुन शेतकरी आंदोलनाला परदेशातून जो स्पोर्ट मिळतोय त्याला विरोध दर्शवलाय. अनिल कुंबळे पासून ते विराट कोहलीपर्यंत अनेकजण या हॅशटॅगचा  ट्विट करत  आहेत.एकप्रकारे हा शेतकरी आंदोलनाला विरोध आहे असा विरोधकांचा आग्रह आहे.

सगळीकडे चर्चा सुरु झाली की खेळाडू सरकारच्या दबावाला झुकले. काहीजण तर असेही म्हणत आहेत कि अमित शहांचे चिरंजीव जय शहा बीसीसीआय मध्ये सक्रिय झाल्यापासून खेळाडूंवरचा दबाव वाढलाय.

पण असे अनेक खेळाडू आहेत त्यांनी कोणतच ट्विट केलेल नाही.

१) विरेंद्र सेहवाग –

sehwag 1

मुळचा दिल्लीचा असणारा विरेंद्र सेहवागने एकेकाळी क्रिकेटच मैदान गाजवल. मुल्तान ते सुल्तान अशी विरेंद्रची ओळख. सेहवागने २०११ साली वेस्ट इंडिज विरुध्दच्या सामन्यात द्विशतक मारल. १४९ चेंडूत २१९ धावा केल्या. त्यान क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जसा मैदानावरती खेळला तसाच तो सोशल मीडियावर सुध्दा व्यक्त होतो. पण त्यानं शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल ट्विट केल नाही.

२) महेंद्रसिंह धोनी-

महेंद्रसिंह धोनीने २००७ ला टी20 ट्रॉफी विश्वचषक जिंकुन दिलाय. धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने जिंकले. कुल कॅप्टन अशी त्याची ओळख होती. २०१० आणि २०१६ साली आशिया कप जिंकला. २०११ ला विश्वकप त्याच्या नेतृत्वात जिंकलाय. महेंद्रसिह धोनी मुळचा धारखंडमधील रांचीचा. महेंद्रसिंह धोनीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल ट्विट केलल नाही.

३) राहुल द्रविड-

dravid 4 scaled

राहुल द्रविड म्हटल की आपल्याला कसोटीत उभी असलेली भिंत आठवते. आपल्या संयमी खेळीने त्याने देशाला अनेक विजय मिळवून दिलेत.  राहुल द्रविडने एकूण १६४ सामन्यांमध्ये १३,२८८ रन केलेत. तर ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,८८९ रन केलेत. विरोधी टीमच्या स्लेजिंगला फक्त हसून उत्तर देणारा द्रविड कधीच वादात अडकलेला नाही. आताही तो शेतकरी आंदोलनाच्या कोणत्याही वादात कुठेच व्यक्त झालेला नाही.

४) हरभजन सिंह-

harbhajan scaled

हरभजन सिंग २००७ व २०११ च्या वर्डकप मध्ये सहभागी होता. २०११ चा वर्डकप मध्ये हरभजनची कामगिरी चांगली आहे. तो तेवढाच चिडकाही आहे. मुळचा पंजाबच्या असणाऱ्या हरभजन सिंगने शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणात बाजूने अथवा विरोधात अशी सोशल मीडियावर कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही.

५) रविंद्र रडेजा-

रविद्र जडेजाला संघात ऑलराऊंडर म्हणून ओळखल जातो. सुरवातीच्या काळात त्याच्यावर टीका केली जायची. पण आज तो टीमचा आधारस्तंभ बनलाय. अनेक सामन्यात जडेजाने टीम ला अडचणीतून बाहेर काढलयं. फक्त वनडे-टी २०च नाही तर रविंद्र जडेजा आता कसोटी सामन्यातील मुख्य बॉलर झाला आहे.  मूळच्या गुजरातच्या असलेल्या जडेची पत्नी सध्या भाजपमध्ये सक्रिय झालेली आहे. मात्र तरीही त्याने शेतकरी आंदोलनावर कोणतीच प्रतिक्रिया आजवर दिलेली नाही. 

६) केदार जाधव-

केदार जाधव विचित्र बॉलर म्हणूनच ओळखायचा. वयाच्या ३० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण. केदार जाधव मुळचा सोलापूरचा. तो टीमच्या मधल्या फळीत खेळतो. भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी जुन २०१४ मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी केदार जाधवची नियुक्ती झाली.

७) मोहम्मद कैफ-

मोहम्मद कैफ मुळचा उत्तर प्रदेश मधला त्याची संघात ओळख उत्कृष्ट फलंदाज तसच क्षेत्ररक्षक म्हणूनही होती. २००२ सालची ऐतिहासिक नटवेस्ट सिरीज इंग्लंडच्या भूमीत आपण जिंकलो यात सिंहाचा वाटा कैफचा होता. २००८ नंतर तो क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही.

८) युसुफ पठाण-

irfan yusuf

भारतीय क्रिकेट संघात अनेक स्फोटक खेळाडू होऊन गेलीत त्यातलाच एक युसुफ पठाण. युसुफने पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २००७ ला खेळला. युसूफ फक्त बॅटिंगचं नाही तर आपल्या बॉलिंगसाठी देखील ओळखला जायचा. तो आणि त्याचा सावत्र भाऊ इरफान पठाण यांची जोडी भारतीय क्रिकेटमध्ये गाजली. इरफानने शेतकरी आंदोलनाचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे ट्विट केलंय पण युसूफ यात पडलेला नाही.

९) व्ही व्ही एस लक्ष्मण-

व्ही व्ही एस लक्ष्मण मुळचा हैदराबादचा. लक्ष्मण संघात मधल्या फळीत फलंदाजीसाठी यायचा. २००१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यान वर्चस्व निर्माण केल होत. लक्ष्मणने ऑस्ट्रोलियाविरुध्द खेळताना २९ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४९.६७ च्या सरासरीने २४३४ धावा केल्या आहेत. तो भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुध्द कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो.

१०) झहीर खान –

zaheer

झहीर खान मुळचा महाराष्ट्रातील. झहीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट फास्ट बॉलर. तो कपील देव नंतर संर्वात यशस्वी बॉलर. झहीर इंजिनिअर व्हायच होत पण बनला क्रिकेटर. झहिरने आंरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकीर्दीत ६१० विकेट घेतल्या. टेस्ट मॅचमध्ये ३११ तर वन डे मध्ये २८२ आणि टी20 मध्ये १७ विकेट घेतल्या. झहीर मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक होता.

११) युजवेंद्र चहल-

युजवेंद्र चहल सोशल मीडियावर प्रसिध्द आहे. टीम इंडियाचा स्टार स्पिनर म्हणून त्याची ओळख. युजवेंद्र चहल मुळचा हरियाणाचा. नेहमी सोशल मीडियावर आपल्या कॉमेडी व्हिडीओमुळे चर्चेत असणारा चाहूल याने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल नाही.

१२) कृनाल पांड्या-

संघात बॅटींग आणि बॅलिंग उतृष्ट असणारा कृणाल पांड्याला ऑलराऊंर म्हणूनच ओळखतात. डावखुरा फलंदाज, तसाच गोलंदाजही. नोव्हेंबर २०१८ मध्ये कृणाल पांड्याची निवड आंतरराष्ट्रीय टी20 संघात झाली. त्याचा स्ट्राईक रेट १४५.२२ एवढा आहे. कृणाल पांड्या हार्दीक पांड्याचा भाऊ आहे. हार्दीकने शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट केलंय पण कृणाल पांड्याने केलेल नाही.

१३) रिषभ पंत-

रिषभ पंत संघातील यष्टिरक्षक. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केल. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिल जात आहे. २०१७ मध्ये त्यान इंग्लंडविरुद्धच ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. तो मुळचा उत्तराखंडणदील हरीद्वारचा.

१४) भुवनेश्वर कुमार-

भुवनेश्वर कुमार मुळचा उत्तर प्रदेशचा. उतृष्ट बॉलर म्हणून ओळखला जोतो. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून दिलाय. त्यान २०१२ साली पाकिस्तान विरुध्द सामन्यात पदार्पण केल. भुवनेश्वर कुमारने ११४ सामन्यात १३२ विकेट घेतल्या.

१५) दिनेश कार्तिक-

दिनेश कार्तिक मुळचा तमिळनाडूचा. संघात तो उत्कृष्ट बॅटसमन आणि विकेटकीपरही आहे. त्याने बांग्लादेशच्या विरोधात शेवटच्या बॉलवर मारलेला सिक्स जगप्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये देखील दिनेश कार्तिक चांगली कामगिरी करताना दिसतो.

१६)कुलदिप यादव-

कुलदीप यादव मुळचा उत्तर प्रदेश मधला कानपूरचा. तो भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. त्याची चायनामन बॉलिंग कित्येकांना बुचकळ्यात पाडेल अशीच आहे. कुलदीप यादव मात्र कोणत्याच वादात कधी अडकत नाही. सध्या राजकीय धुळवडीपासून तो दूरच राहिलाय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.