पुतीन यांच्यावर टीका आणि मग संशयास्पद मृत्यू हे समीकरणच बसलंय…

जगभरातील काही नेत्यांबद्दल शंका कुशंका उपस्थित करण्यात येते. त्यात नेहमी आघाडीवर असतात ते रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन. त्यांना अध्यक्षपदावर राहता यावं म्हणून त्यांनी अनेकांची हत्या घडवून आणल्याचे सांगितलं जात. तसेच जो कोणी पुतीन यांना उघड विरोध करतो त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगितलं जात.

पुन्हा हा विषय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ओदिशामधील एका हॉटेलमध्ये दोन रशियन नागरिकांचा मृत्यू. यापैकी पावेल अँटोव्ह पुतिन यांचे उघड टीकाकार होते. २५ डिसेंबर रोजी अँटोव्ह हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडले. त्यांना  रुग्णालयात हलविले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.

अँटोव्ह यांनी युक्रेन युद्धासंदर्भात पुतीन यांच्यावर टिका केली होती. मात्र काही दिवसानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली होती. त्यांच्या मृत्यूनंतर भारतातील रशियाच्या दूतावासाने काही एक म्हणणं मांडलेलं नाही. तर दूतावासातील अधिकाऱ्यांनी माध्यमांना बोलतांना सांगितलं की, आसाम पोलिसांनी या मृत्यूचा तपास केला मात्र त्यांना यात कुठलीही गोष्ट संशयास्पद आढळून आली नाही.

पुतीन वर टिका केल्यानंतर मृत्यू झाला असे पावेल अँटोव्ह हे काही पहिले नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारे मृत्यु झाला आहे.

रविल मॅगानोव्ह

लुकोइल या तेल कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणावर मॅगानोव्ह उघडपणे टीका करायचे. या दोन्ही देशातील युद्ध सुरु झाल्यानंतर होईल तितक्या नंतर वाद संपवण्याचे आवाहन केलं होते. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सीएनबीसीच्या अहवालानुसार, अँटोनोव्ह यांच्याप्रमाणेच मॅगानोव्हचा मॉस्को रुग्णालयाच्या खिडकीतून पडून संशयास्पद मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कंपनीने त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले असल्याचे  निवेदन जारी केले होते. पण नंतर हे निवदेन मागे घेण्यात आले.

डॅन रॅपोपोर्ट 

मूळ रशियन मात्र अमेरिकेत राहणारे डॅन रॅपोपोर्ट यांचा ऑगस्ट २०२२ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. डॅन रॅपोपो उद्योगपती होते. वॉशिंग्टनमधील त्यांच्या अपार्टमेंटसमोर मृतावस्थेत आढळून आले. संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेश आढळून आला होता.

रॅपोपोर्ट यांच्या मृत्यूनंतर वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी एक स्टेटमेंट जाहीर केले होते. त्यात म्हटले होते की, त्यांच्या जवळ एक लायसन्स आणि दोन लाख रुपये सापडले होते.  रविल आणि अँटोव्ह यांच्या प्रमाणे रॅपोपोर्ट यांनी सुद्धा पुतीन यांच्यावर टिका केली होती. रशिया युक्रेन युद्धात रशिया चुकीचा वागतोय अशी टीका करत होते.

डेनिस वोरोनेन्कोव्ह 

डेनिस वोरोनेन्कोव्ह हे २०११ ते २०१६ दरम्यान रशियाच्या संसदेचे सदस्य होते. २०१६ मध्ये च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर डेनिस वोरोनेन्कोव्ह यांनी आपले रशियन नागरिकत्व सोडले.

रशिया सोडल्यानंतर ते पत्नीसह युक्रेनला गेले. युक्रेनला जाताच त्यांनी ब्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणावर प्रचंड टिका करायला सुरुवात केली. २३ मार्च २०१७ ला गोळी मारून त्यांची हत्या कारण्यात आली.  हॉटेल मधून बाहेर पडतांना तीन जणांनी पाठमागून डेनिस वोरोनेन्कोव्ह यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या.

डेनिस यांच्या हत्येत रशियाचा हात असल्याचा आरोप युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केला होता. मात्र रशियाने हा आरोप फेटाळून लावला होता.

मिखाईल लेसिन

नोव्हेंबर २०१५ मध्ये रशियाचे मंत्री मिखाईल लेसिन हे वॉशिंग्टनमधील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले होते. अगोदर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.  कुटुंबीयांनी सुद्धा त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते.

मात्र वर्षभराच्या तपासानंतर वॉशिंग्टनचे मुख्य वैद्यकीय परीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी मिखाईल लेसिन यांचा मृत्यू  हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून डोक्याला मार लागल्याने झाल्याचे सांगितले. तसेच नशीला पदार्थ दिला होता आणि त्यामुळे ते खाली पडल्याचे सांगितले होते.

लेसिन हे अनेकवर्ष राजकाणारात होते. त्यांना मधल्या अनेक गोष्टी माहित होत्या त्यामुळे त्यांची हत्या घडवून आणल्याचे सांगितलं जात.

बोरिस नेमत्सोव्ह 

सोव्हियत संघानंतरच्या रशिया मध्ये  बोरिस नेमत्सोव्ह तरुण नेत्यांमध्ये गणना होऊ लागली. त्यानंतर ते  उपपंतप्रधान सुद्धा झाले. बोरिस नेमत्सोव्हकडे पुढील राष्ट्रपती म्हणून सुद्धा पाहिले गेले. पुढे २००० साली पुतीन यांनी बोरिस येल्तसिन यांची जागा घेतली.

यानंतर बोरिस नेमत्सोव्ह हे पुतीन यांच्यावर टिका करून लागले. त्यांचा विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होत. पुतीन यांच्या धोरणावर टिका सुद्धा ते करत. यामुळे त्यांना अनेकवेळा अटकही करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुतीन यांच्यावर टिका केली होती.

बोरिस बेरेझोव्स्की 

बेरेझोव्स्की एक व्यापारी तर होतेच तयच बरोबर ते नक्के राजकारणी देखील होते. पुतिन यांना अध्यक्ष करण्यात बोरिस यांचा मोठा वाटा होता. पण पुतिन अध्यक्ष झाल्यानंतर बेरेझोव्स्की यांना अपेक्षित ‘लाभ’ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी रशिया सोडला आणि इंग्लंड मध्ये स्थयिक झाले होते.

तसेच पुतीन यांना सत्तेतून काढणार अशी वल्गना त्यांनी अनेकवेळा केली. त्यानंतर २०१३ नंतर राहत्या घरात मृत्यू झाला होता. पुतिन यांच्यावर टीका आणि मग संशयास्पद मृत्यूच्या अनेक घटना रशिया आणि जगभरात झाल्या आहेत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.