क्रूडऑईलच्या किमती तर कमी झाल्या पण पेट्रोल काही कमी होईना

जशी कोरोनाची एन्ट्री भारतात झाली. तशी महागाई सुद्धा भडकायला सुरुवात झाली. सगळं लॉकडाऊन असल्यामुळे नवीन उत्पादन काही होत नव्हतं, त्यात बाहेरून काही मागवता येत नव्हतं, आणि बाहेर काही पाठवता येत नव्हतं. त्यामुळे आहे त्या उप्तदानात काम चालवणं भाग होत.

आता महागाई होते तेव्हा सगळ्यात आधी पेट्रोल – डीझेलपासूनचं सुरुवात होते आणि मग हे बाकीच्या गोष्टी. आता लॉकडाऊन मध्ये सुद्धा अंदाजानुसार पेट्रोल-डीझेल महाग झालं. आणि साधं सुध नाही तर डायरेक्ट शंभरी पार केली. देशात सगळीकडे १०५ लिटर ११० लिटर तर डिझेल सुद्धा कधी नव्हे तर १०० च्या वर गेलेलं.

त्यामागचं कारणंही तसचं होत म्हणा, कारण भारत पेट्रोलियम पदार्थांसाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून असतो. आणि पेट्रोल बनवणाऱ्या देशांनी, कंपन्यांनी आपल क्रूड ऑईलचा किमती मोठ्या प्रमाणावर वाढवलेल्या. त्यामुळं आपल्या सरकारला सुद्धा पेट्रोल वाढवणं भाग होत.

पण आता जेव्हा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलीये, सगळ्याचं देशांची अर्थव्यवस्था पुन्हा सुरु झालीये. तेव्हा क्रूड ऑईलच्या किमती सुद्धा कमी झाल्यात. पण आपल्या भारतात त्याचा काही परिणाम होईना झालाय. म्हणजे आधी क्रूड ऑईलच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमती जास्त केल्यात, असं सरकार म्हणत होतं. पण आता जेव्हा या  क्रूड ऑईलच्या किमती घसरल्यात तेव्हा पेट्रोल- डिझेल कमी करायला पाहिजे पण तरीसुद्धा पैसे तितकेच द्यावे लागतायेत. 

डिटेलमध्ये सांगायचं झालं तर डिसेंबरमध्ये क्रूड ऑईलचा किमती कमी झाल्या. त्यानुसार कंपन्यांनी दरात कपात केली असती तर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले असते. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ५ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले होते. बऱ्याच राज्यांनी व्हॅटही कमी केला. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीशी कपात झाली. 

पण हा.. ह्या कमी किमती फक्त ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांमध्ये कमी झालीत, आणि पण बाकीच्या राज्यांमध्ये परिस्थिती आहेच तशी आहे.

असो तर, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमती खाली येऊ लागल्या. नोव्हेंबरमधील ८०.६४ डॉलरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये क्रूड ७३.३० डॉलर प्रति बॅरल होते. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच ठरतात. अशा स्थितीत किमती कमी करण्याची वेळ आल्यावर जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकारी कंपन्या महसूल गोळा करायच्याच मागे लागल्यात.

याआधीच चित्र पाहिलं तर गेल्या ऑगस्टमध्ये कच्चे तेल ३.७४ डॉलर बॅरलने स्वस्त झाले, तेव्हा कंपन्यांनी पेट्रोल केवळ ६५  पैशांनी स्वस्त केले. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये कच्चे तेल ३.३३ डॉलर बॅरलने महागले, तेव्हा पेट्रोल ३.८५ रुपये लिटरने महागले. पण  नोव्हेंबरमध्ये जेव्हा कच्च्या तेलाचे दर थोडे कमी झाले, तेव्हाहि मात्र पेट्रोलचे दर वाढतच राहिले. 

जर आपण आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तेल कंपन्यांचे सप्टेंबर तिमाही निकाल पहिले तर, त्यांचा करपूर्व नफा कोविड आधीच्या लेव्हलपेक्षा २० पटीने वाढला आहे. IOCL चा नफा सप्टेंबर-२०१९ मध्ये ३९५ कोटी रुपये होता, जो सप्टेंबर २०२१ मध्ये वाढून ८३७० कोटी रुपये झालाय. 

आता आपण यावरून अंदाज बंधू शकतो कि, पेट्रोलयम कंपन्या क्रूड ऑईलचा किमती कमी होऊन सुद्धा पेट्रोल – डिसलेच्या किमती वाढवून कोरोना आणि महागाईच्या नावाखाली स्वतःचे खिशे भरण्याचं काम करतायेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.