अगरबत्तीचा बिझनेस १५०० कोटींचा असू शकतो हे सायकलवाल्यांनी दाखवून दिलं ! 

कन्याकुमारी ते उत्तरेत हिमालयापर्यंत देवाच्या समोर दरवळणारा सुगंध म्हणजे सायकल छाप प्युअर अगरबत्ती. त्यांचा तो टिपिकल पिवळा बॉक्स त्यावर असलेले तीन फ्लेवरची तीन फुले आणि सायकलच चिन्ह ज्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे की १९४८ पासून.

सायकल अगरबत्तीचा टिपिकल वास आपल्याला का कुणास ठाऊक सणासुदीची आठवण करून देतो. गेली सत्तर वर्षे सायकल आणि पूजा हे समीकरण बनलं आहे.

मग ही अगरबत्ती सुरु कोण केली? तिला एवढं मोठं बनवायचं त्यांच्या मनात कस आलं असे अनेक प्रश्न भिडूंना पडत असतील. त्यासाठी अगदी सुरवातीपासून सांगतो.

तामिळनाडू मध्ये एका छोट्याशा खेड्यात एक कन्नड भाषिक ब्राह्मण कुटुंब राहात होत. वडील नारायण आचार्य शिक्षक होते. त्यांचा एकुलता एक लेक म्हणजे रंगा राव. रंगा अगदी लहानपणापासूनच खटपट्या होता. त्याच्या खोड्या निस्तारू पर्यंत नारायण गुरुजींचा दिवस जायचा.

दुर्दैवाने रंगा वयाच्या ६ वर्षाचा असताना त्याच पितृ छत्र हरपलं. त्या एका घटनेने  त्याच बालपण संपून गेलं. वडिलांनी काहीही मालमत्ता मागे सोडली नव्हती. कसबस घर चालवणे हेच त्याच्या आईच ध्येय होता. रंगा ला शिकण्याची खूप इच्छा होती. शिक्षणाचं आपल्याला दारिद्र्यातून बाहेर काढेल यावर त्याचा विश्वास होता.

रंगा ने आपली शाळा चालू राहावी म्हणून प्रचंड खटपट्या केल्या.

गाव सोडून पेरियाकुलम ला आला. तिथे माधुकरी मागून शिकू लागला. एकदा त्याला पैसे कमवायची एक आयडिया सुचली. शाळेमध्ये बाकीच्या पोरांना एका आणा दोन आणा घेऊन गोळ्या बिस्किटे विकू लागला.

या ११ वर्षाच्या मुलाचा साईड बिझनेस एकदम चांगला चालू होता. पण अचानक त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या मुलाने देखील बिस्कीट विकायला सुरवात केली. रंगा चा बिझनेस खाली आला. पण गडी त्याही वयात खूप चाप्टर होता. त्याने बिस्किटाबरोबर गोळी फ्री द्यायची ऑर सुरु केली. म्हणजे जवळपास १०० वर्षांपूर्वी या शाळकरी मुलाने हि मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली होती.

पुढे मदुराई ला कॉलेजसाठी गेला. तिथे ट्युशन घेऊन एक्स्ट्रा इन्कम सुरु केला.

याच काळात मदुराई मध्ये टाइपिंग क्लासेस नव्याने आले होते. रंगा ला हि फ्युचर टेक्नॉलॉजी शिकायची इच्छा होती पण तेवढे पैसे नव्हते. अखेर त्याने शिक्षकांबरोबर डील केला कि

मी तुम्हाला ५ विद्यार्थी आणून देतो तुम्ही मला टाइपिंग फुकट शिकवा .

अशा १०० लडतरी करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. या खमक्या मुलाबरोबर लग्ना साठी मुलगी द्यायला एक जण तयार झाला. सीता बरोबर रंगा चे लग्न झाले. या लग्नांनंतर  त्याच्या सासऱ्याने त्याला आपल्या गावी बोलवून घेतले. तिथे एक ब्रिटिशांची गन फॅक्ट्री होती. तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या सहकारी पतपेढीवर रंगाला नोकरी मिळाली.

१९४२ साली त्यांना एक मुलगा झाला. पण रंगाची खुमखुमी शांत बसवत नव्हती. त्याला स्वतःचा बिझनेस करायचा होता. त्यासाठी एक्स्टर्नल डिप्लोमा देखील पूर्ण केला होता. सासऱ्याच्या  छायेतून बाहेर पडायचं ठरवलं. आपलं कुटुंब कूर्गला हलवलं. तिथे कोफी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करू लागला.

कुर्गमध्ये असताना त्याला तिथून जवळ असणारं मोठं शहर म्हैसूर खुणावत होतं. चंदनाची राजधानी असणाऱ्या या गावात आपल्याला खूप काही संधी मिळतील याचा विचार करून तो म्हैसूर ला आला.

वर्ष होता १९४८. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. नव्या कल्पनांना भरारी लावण्याचे हेच ते दिवस होते.

म्हैसूरमध्ये रांगा रावने एक फर्म सुरु केली , ‘म्हैसूर प्रॉडक्ट अँड जनरल ट्रेडिंग कंपनी’

शिकेकाई, डोक्याला लावण्याचे तेल, सुगन्धी साबण, तोंडाला लावण्याची पावडर, अगरबत्ती अशा वेगवेगळ्या वस्तूंची ट्रेडिंग सुरु केली. त्याच्या बाकीच्या वस्तूंपेक्षा अगरबत्ती ला जोरदार मागणी दिसून आली. रंगाच्या डोक्यात आयडिया आली की आपण अगरबत्तीची फॅक्ट्री सुरु करायची.

तो पर्यंत अगरबत्ती हा अगदी घरगुती बिझनेस होता. फावल्या वेळात अगरबत्ती बनवायची आणि सायकल वरून विकत हिंडायचं  असं संपूर्ण भारतात चालायचं. आजही काही प्रमाणात हे दिसून येईल. पण रंगाची स्वप्ने मोठी होती.

पण त्याला अगरबत्ती कशी तयार करतात माहित नव्हतं .

जे अगरबत्ती बनवतात त्यांची भेट घेऊ लागला. तासनतास त्यांचं निरीक्षण करू लागला. म्हैसूर मधल्या लायब्ररी मध्ये बरीच पुस्तके मिळाली. त्यांचाही त्याला फायदा झाला. रंगाने अगरबत्ती  बनवायला सुरवात केली. कोणताही बिझनेस सुरु करायचा तर त्याचा ब्रँड बनवला पाहिजे हे सामान्य ज्ञान रंगाकडे उपजत होते.

त्याने आपल्या अगरबत्तीला नाव दिलं सायकल !!

तसेही सायकल चा आणि अगरबत्ती धंद्याचा एकमेकांशी नातं होताच. सायकल मधाने साधेपणा स्वस्ताई विश्वासार्हता हे गुण सोबतच येतात. रंगा  राव ने सायकल अगरबत्तीचा धंदा सिरियसली सुरु केला. रोज अगरबत्ती बनवायची आणि हासन चिकमंगळूर मध्ये जाऊन विकून यायची.

त्याची मुले सुद्धा त्याच्या कामात मदत करायची. अगरबत्तीचे पॅकिंग वगैरे हि शाळकरी मुलं करायची. अख्ख्या कुटुंबाची  घेऊन आली. सायकल अगरबत्तीला ब्लकमध्ये ऑर्डर मिळू लागल्या.रंगा  राव आपल्या कल्पक आयडिया वापरून अगरबत्तीची जाहिरात करायचे.

त्यांनीच मेणकागदाच्या पिशवीत अगरबत्ती विकण्यास सुरवात केली यामुळे फक्त १ आण्याला २५ अगरबत्तीच्या कांडी मिळू लागल्या. पुढे त्यांची सातहि मुले या धंद्या त आली. सगळे एकापेक्षा एक बिझनेस माईंडचे. त्यांनी धंदा दिवसेंदिवस धंदा मोठा करून ठेवला.

आज त्यांची तिसरी चौथी पिढी या धंद्यात आहे. हे सगळे  कुटुंबीय आजही एकत्र आहेत.

प्रत्येकाने इंग्लड अमेरिका मधून आपले शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या धंद्याला कसा होईल याचा प्रयत्न ते करत असतात. पण यात आपल्या उदबत्तीची पारंपरिक सुवास मात्र त्यांनी जपला आहे.

म्हणूनच आज जवळपास दि ड हजार कोटींची हि अगरबत्तीची कंपनी आहे. अमिताभ बच्चन त्यांची जाहिरात करतो. देशभरात पसरलेल्या सायकलच्या  जवळपासही कुठली कंपनी नाही. मध्यन्तरी मल्टी नॅशनल कंपन्यांनी त्यांना स्पर्धा देण्याचा प्रयत्न केला मात्र ते जमू शकले नाही. उलट ६५ देशांमध्ये सायकल अगरबत्ती ची निर्यात होते.

आजही कोणीही कितीही नास्तिक असू दे आस्तिक असू दे सायकल अगरबत्तीचा सुवास आला तर लहानपणी च्या निरागस भोळ्या शुद्ध आठवणी आपल्याला उल्हसित करून जातात हे नक्की.

संदर्भ-NR-Group-Case-Study.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.