शेवटी दबावामुळे डाबर कंपनीला ती समलैंगिक जाहिरात मागं घ्यायला लागली..

सध्या सणासुदीचा मोहोल आहे. त्यामुळे कंपन्या सुद्धा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित सणाशी रिलेटेड आणि जरा हटके देण्याचा प्रयत्न करतात. पण सणासुदीच्या निम्मित जाहिरात आणि त्यांच्या संदर्भातला वाद पेटतचं चाललाय. एकानंतर एक जाहिरात आणि जाहिरात कंपन्या टार्गेट होत आहेत. आधी फॅब इंडियाचा वाद पेटला, नंतर सिएट टायरवरून अमीर खान आणि कंपनीला बॉयकॉट करण्याची मागणी केली गेली. आणि आता टार्गेट झालीये डाबर कंपनी.

फॅब आणि सिएट तर धर्मांच्या मुद्द्यावर अडकली पण डाबर लिंगभेदाच्या कचाट्यात सापडलीये. ज्यांनंतर ही जाहिरात बंद करण्याची मागणी देखील झाली.

आधी जाणून ही जाहिरात काय होती

डाबरच्या फेअरनेस प्रोडक्ट फेमशी संबंधित एक जाहिरात लॉन्च झाली. ज्यात दोन मुलींचे समलिंगी जोडपे करवा चौथ साजरी करताना पाहिले जाते.

आता हिंदू परंपरेनुसार करवा चौथ हा सण लग्न झालेल्या जोडप्यांशी  सबंधीत असतो, ज्यादिवशी बायका नवऱ्यांसाठी  अर्थात आपल्या लाईफ पार्टनरसाठी निरंकार उपवास पकडतात.

आता कंपनीने लाईफ पार्टनर घेऊन लिंगभेदाचा विरुद्ध समलिंगी जोडपं दाखवून ही जाहिरात लॉंच केली. लिंगभेदचा विरुद्ध जागरूकता निर्माण करणे हा या मागचा हेतू होता. 

पण या जाहिरातीनंतर काही लोक डाबर कंपनीवर जाणूनबुजून हिंदूंच्या सणांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत होते. सोशल मीडियावर डाबरवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती.

#BoycottFem, #BoycottFem&Dabur हे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागलं.

काही युजर्सने लिहिले की, या जाहिरातीमध्ये पुरोगामीतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु निष्पक्षतेच्या उत्पादनाची जाहिरात करणे म्हणजे वर्णद्वेष आणि वर्णभेदाला प्रोत्साहन देणे होय. या दोन्ही कारणांमुळे डाबर हे सोशल मीडिया युजर्सची टार्गेट बनले.

यात वादात राजकारणाने सुद्धा एंट्री घेतली होती. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी डाबरच्या जाहिरातीवर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांनी डीजीपींना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते. मिश्रा यांनी कंपनीला ही जाहिरात मागे घेण्याची मागणीही केली होती.

आरएसएस-संलग्न मासिक पाचजन्यनेही जाहिरातीसंदर्भात एक पोल घेतला होता. या पोलमध्ये प्रश्न विचारला गेला की, डाबरच्या वादग्रस्त जाहिरातीने करवा चौथचे पारंपरिक स्वरूप विकृत करण्याचे कारण काय? मतदानामध्ये सहभागी होणाऱ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत- १. हिंदू सणाला लक्ष्य करणे २. वादग्रस्त प्रचाराचे डावपेच

दरम्यान,या गोंधळानंतर कंपनीने याप्रकरणी स्पष्टीकरणही दिले होते. निवेदनात कंपनीने म्हटले होते की,

“डाबर आणि प्रसिद्धी एक ब्रँड म्हणून विविधतेवर, सर्वांना बरोबर घेऊन आणि समानतेवर विश्वास ठेवतात. आम्हाला आमच्या संस्थेत आणि समाजात या मूल्यांचे समर्थन करण्यात अभिमान आहे.

आम्ही हे समजू शकतो की प्रत्येकजण आमच्या दृष्टिकोनाशी सहमत असू शकत नाही, परंतु वेगळा दृष्टिकोन ठेवण्याच्या त्यांच्या अधिकाराचा आदर करतो. कोणताही धर्म, परंपरा इत्यादी दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा समूहाला दुखापत झाल्यास आम्ही बिनशर्त माफी मागतो. या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे आम्ही आभारी आहोत.

करवा चौथशी संबंधित जाहिरातीवरचा हा गोंधळ इतका वाढला कि, डाबरला ती जाहिरात मागे घ्यायला लागली.

कंपनीने एक निवेदन जारी करून जाहिरात मागे घेण्याची माहिती दिली आहे.  सोबतच लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल डाबरने लोकांची माफी देखील मागितली आहे.

कंपनीने म्हटले की,

आम्ही प्रत्येक सोशल मीडिया हँडलवरून प्रसिद्धीची करवा चौथ मोहीम मागे घेतली आहे. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो.

https://twitter.com/DaburIndia/status/1452564874811244550s=20

 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.