अडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या हुकूमशहांना दिलेला इशारा आहे ?

भारतीय जनता पक्षाचे दोन मेन आर्किटेक्ट आहेत. एक म्हणजे अडवाणी तर दुसरे होते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा अडवाणी यांचे कौतुक करतांना म्हणतात की आणीबाणीच्या परिस्थितीचा निर्भयपणे विरोध करणाऱ्या महान लोकांपैकी ते एक आहेत.

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी त्यांच्या विरोधकांना अंधारकोठडीत बंद केले होते. लोकशाही समर्थकांचा छळ करण्यात आला. पत्रकारांवर बंधनं टाकण्यात आली होती, माध्यमांना सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला. लोकांचे स्वातंत्र्य काढून घेण्यात आले. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, वाजपेयी, चंद्रशेखर आणि अडवाणी या सर्वांना तुरुंगात टाकण्यात आले.

याच आणीबाणीच्या काळात अडवाणी जेंव्हा तुरुंगात होते तेंव्हा त्यांनी ए प्रिजनर्स स्क्रैप-बुक’ नावाचे पुस्तक लिहिले होते.

हे पुस्तक म्हणजे हुकूमशाहीची केलेली एक भावनिक आणि अभ्यासू समीक्षा आहे.

कारण या डायरीतील काही संदर्भ हे आजच्या परिस्थितीला देखील लागू होते.  सद्या जगभरात अनेक सरकारे लोकशाही आणि माध्यमांचे स्वातंत्र्य दडपण्यासाठी सतत प्रयत्न करत असते त्यामुळे ह्या डायरीत सांगितलेल्या गोष्टी सरकारला अडचणीच्या ठरू शकतात.

या काळात अडवाणी १९ महिने तुरूंगात होते, तेंव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिले होते. आणि या पुस्तकाची भूमिका तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी लिहिली होती. हे पुस्तक आर्नोल्ड असोसिएट्स ने १९७८ मध्ये प्रकाशित केले होते.

WhatsApp Image 2021 07 28 at 6.09.11 PM

बहुतेक भारतीय लोक विसरले असले तरी, हे पुस्तक म्हणजे तुरूंगातील साहित्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

जगभरात लोकशाही आणि हुकूमशाही यावर जे-जे काही लिहिले गेले आहे, या पुस्तकात त्याचे  संदर्भ आहेत. यावरूनच दिसून येते कि, अडवाणींनी बंगळूर तुरूंगातील ग्रंथालयाचा पुरेपूर फायदा  घेतला आहे.

UAPA अंतर्गत हजारो लोकांना तुरुंगात टाकणे, सरकारवर टीका करणाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावून खटला चालवणे, ८४ वर्षीय आदिवासी कार्यकर्ते स्टेन स्वामी यांची तब्येत खालावली होती तरी त्यांचा जामीन ,मंजूर न करने इत्यादी बाबी सध्याच्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचे उदाहरणं आहेत असं बोललं जातं.

अडवाणी यांनी तत्कालीन पत्रकारांच्या परिस्थितीवर बोलतांना लिहिले कि,

“सेन्सॉरशिपमुळे भारतातील वर्तमानपत्रे कंटाळवाणे आणि बोथट झाली आहेत. वाचताना ते सरकारी हँडआउट्स सारखे कंटाळवाणे आणि निरस वाटतात. सेन्सॉरशिप लागू झाल्यानंतर नाझी जर्मनीमध्येही असेच घडले होते. गेब्ल्सने एकदा संपादकांना जाहीरपणे म्हणाले होते कि, इतके भेकड होऊ नका कि त्यामुळे रोजची वर्तमानपत्र नीरस बनून जातील.

अडवाणी यांनी आपल्या पुस्तकात अमेरिकेचे चौथे अध्यक्ष जेम्स मॅडिसन यांच्या विचारांचा देखील हवाला दिला आहे ज्यांनी आपल्या १७८९ मध्ये बिल ऑफ राइट्स हा मसुदा तयार करण्यासाठी मदत केली होती.

अडवाणींनी डायरीमध्ये स्नूपगेट घोटाळ्याशी सबंधित लिहिले होते जे आत्ताच्या पेगासगेट बद्दल ही लागू होते.

तसेच १० एप्रिल १९७६ रोजीच्या पानावर अडवाणी यांनी प्रसिद्ध पत्रकार निखिल चक्रवर्ती यांच्या डाव्या विचारधारेच्या साप्ताहिकातील एका लेखाचे कौतुक केले आहे. तो लेख आणीबाणीवर टीका करणारा होता, हा लेख सीएलआर शास्त्री यांनी लिहिला होता. ते पूर्वीचे ज्येष्ठ पत्रकार होते.

अडवाणींनी त्यांच्या डायरीमध्ये दिलेला नेहरूंचा संदर्भ सध्याच्या भाजप कार्यकर्त्यांना आवडणार नाही.

जवाहरलाल नेहरूंच्या लोकशाहीच्या विचारांचे अडवाणी हे नेहेमीच प्रशंसक राहिले आहेत, हे भाजपमधील बहुतेकांनाच ठाऊक असेल. त्या डायरीमध्ये १४ नोव्हेंबर १९७५ रोजी त्यांनी नेहरूंच्या जयंतीच्या निमित्ताने, १९३६ मध्ये त्यांनी लखनौ कॉंग्रेस येथे नेहरूंचे अध्यक्षीय भाषण वाचले होते जे त्यांना पूर्णपणे पटले असे नमूद केले आहे.

अशाप्रकारे अडवाणी यांनी त्याकाळात लिहिलेले संदर्भ आजच्या वास्तवाला धरून आहेत कदाचित याचमुळे सध्याच्या राज्यकर्त्यांना त्यांनी मांडलेले विचार पडत नसतील.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.