सरपंच पदाची निवडणूक हारला म्हणून दोन बिहारी तरुणांना थुंकी चाटायला लावली

लाखाच्या घरात असणाऱ्या सरपंचपदाच्या निवूडणुकीचा खर्च आता काही ठिकाणी करोडोंच्या घरात  गेलाय. मात्र पैसे वाटले म्हणजे मत आपलंच याची काय गॅरंटी नसते. गुलाल शिवायला लावून शपथा देणारेपण लाखो रुपये वाटून पडत्यात.

दमदाटी करून मतं घ्यायचा पण आता काळ नाही राहिलाय. कारण लोकशाहीत शेवटी मतदारच राजा. 

तू हजार दे नाहीतर लाख, मतदार राजा आपल्या मनानंच बटण दाबणार. गुप्त मतदान पद्धती म्हणजेच तुमी मतदान केंद्रावर जाऊन काय काशी केलीय हे कुणाच्या बापालापण कळत नाही. यामुळंच आपल्याकडं लोकशाही आहेत तेव्हढी टिकून आहे असं म्हटलं जातं. मात्र सगळीकडंच असा नाहीए . 

विशेषतः उत्तरेतल्या काऊ बेल्ट मध्ये लोकशाहीचे धिंडवडे निघत असल्याची टीका नेहमीच होत असते.

बिहारमध्ये असाच एक प्रकार घडलाय. बिहारमध्ये नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवूडणूक पार पडल्या होत्या. तिथल्या औरंगाबाद जिल्ह्यातील टोले भुईयाँ या गावातही सरपंचपदासाठी जोरदार निवूडणूक झाली. याच गावात राहणाऱ्या अनिल कुमार आणि मंजीत कुमार यांनीही निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावला. लोकशाहीवादी भारतात मतदान केलं म्हणून त्याचं उलट कौतुकच केलं  पाहिजे मात्र घडलं उलटंच.

सरपंचपदासाठी टोलार भुईया गावातून बलवंत सिंह पण उभा होता. आपण आरामात निवडून यायचं या  नादात बलवंत सिंह निवूडणुकीत उभा होता. ठाकूर असल्यानं आपल्या बापजाद्याची जहागीर असल्याच्या तोऱ्यात त्याचं काम चालू होतं. पण लोकांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली. निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये बलवंत सिंह पडला होता. जागीरदारीची ऐट मिरवणाऱ्या बलवंत सिंहला लोकांनी एक एक मत जमा करून पाडलं होता.

आता एवढ्याने ज्याचा माज उतरेल तो बलवंत सिंह कसला.

पराभवच सूड घेण्याची बहुतेक तो वाटच पाहत होता. त्याला अनिल कुमार आणि मंजित कुमार यांनी त्याला मतदान केलं नसल्याचं कळलं. त्यातही निघाले अनुसूचित जातीचे. आता त्याने त्यांना मारहाण केली असेल असा तुम्ही विचार करत असाल. मात्र तुमचे विचार अजून तेवढ्या खालच्या पातळीला नाही गेलेत जेवढे बलवंत सिंह गेला आहे.

त्यानं अनिल कुमार आणि मंजित कुमार यांना गाठलं. त्यांना उठा बश्या काढायला लावल्या. मात्र त्या नंतर जे घडलं ते कुठल्याही सभ्य समाजाला शरमेनं मान खाली घालायला लावणारं होतं. या नराधमांनी त्या दोन दलित तरुणांना जामिनावर थुंकण्यास सांगितलं आणि तेच चाटायला सांगितलं. नुसतं वाचला तरी घिन येइल अशी ही घटना.

मात्र एवढा सगळं करत असताना आरोपींच्या तोंडावर कुठेच कायद्याची भीती दिसत नव्हती. रोजचं  असल्यासारखं ते हे सगळं करत होते. आरोपींनि हा सगळं घटनाक्रम मोबाइललामध्ये शूट केला आहे.  आरोपी या दोन तरुणांपैकी एकाला मानेला धरून जेव्हा जमिनीवरची थुंकी चाटायला लावतायत. निगरगट्टपणे हे आरोपी शिवीगाळ ही करत असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झालं आहे. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोपींचं कुकृत्य बाहेर आलंय.

मंडल आयोगांनंतर सामाजिक न्यायची नवीन व्याख्या देणाऱ्या बिहारमध्ये हि घटना घडलेय. व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर आता अरोपींना अटक केलीय. मात्र ऍट्रोसिटीसारखा कायदा बिहारमध्येही  अस्तित्वात असताना जेव्हा अश्या घटना घडतात तेव्हा बिहारमधल्या कायदा आणि सुरक्षेबद्दलही या घटना बरंच काही सांगून जातात.

हे ही वाच भिडू :

 

 

  

Leave A Reply

Your email address will not be published.