क्रूर दंडुपाल्या गॅंगच्या तावडीतून अनेक माणसं फक्त कुत्र्यांवरच्या प्रेमामुळं वाचली होती…

हा भाग एका मोठ्या शहराच्या एका कॉलनीचा. काटकोनी रस्त्यांच्या जाळ्यात प्रत्येकाचे बंगले. प्रत्येकाच्या घरात चार-पाच माणसचं असायची. म्हणायला उच्चभ्रू वस्ती. दूपारच्या वेळेस तर इथे शांतताच असायची. घरात असणाऱ्या बायकां मस्तपैकी दूपारी झोप काढायच्या.

अशाच एका दुपारी एका बांगडेवालीचा आवाज ऐकू येतो. साहजिक घरातील महिला दार उघडते. चौकशी करते. बांगड्या भरायला तिला घरात बोलवते. बांगडीवाली बोलत बोलत सगळ्या घराचा अंदाज घेते. पैसे घेते आणि निघून जाते..

घरातली महिला आपल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरवात करते.

झाली गोष्ट. संपली. थांबा ही गोष्ट अशी संपत नाही.

घरातला माणूस रात्री घरी येतो. एकत्र जेवण होतं. दोघेही झोपून जातात. मध्यरात्रीच्या वेळी अचानक घरात हालचाल दिसून आल्याने दोघे जागे होते. समोर पाहतात तर एक अख्खी दरोडेखोरांची टोळी…

या टोळीत लहान मुलं होती, बायका होत्या, माणसं होती. तस म्हणायला गेलं तर एका छोट्या गावाची ही टोळी होती.

पुढे काय होतं तर दोघांचे खून केले जातात. दरोडा टाकला जातो. पण जाता जाता मृत्यूमुखी पडलेल्या महिलेसोबत बलात्कार देखील होतो. एका प्रेतासोबत केलेला बलात्कार. 

दक्षिण भारतात सर्वात भयानक दरोडेखोरांची टोळी कोणती तर आजही दंडुपाल्या टोळीचं नाव घेतलं जातं. १९९० च्या दशकात या टोळीची दहशत होती. पण आजही दंडुपाल्या नाव ऐकलं की भल्याभल्यांचे डोळे टरकतात. या टोळीने एक दोन नाही तर तब्बल ८० जणांचे खून केले होते. कदाचित त्याहूनही जास्तच. १०० हून अधिक घरांमध्ये दरोडे टाकले होते.

जेव्हा या टोळीला पकडण्यात आलं तेव्हा या टोळीतल्या ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यावरूनच या टोळीच्या दहशतीचा अंदाज तुम्हाला लावता येईल. 

ही टोळी नेमकी कोणती, या टोळीला दंडुपाल्या नाव कसं मिळालं, या टोळीने काय काय केलं होतं आणि सर्वात महत्वाचं या टोळीला कस पकडण्यात आलं या सर्व घडामोडी पहाण्यासाठी आपणाला इतिहासातून सुरवात करावी लागते.

कर्नाटकातलं हस्कोट तालुक्यातलं दंडुपाल्या गाव. दक्षिण कर्नाटकात अगदी तामिळनाडूच्या बॉर्डवरचा हा तालुका. याच तालुक्यातलं हे गाव. गावाची माहिती म्हणजे तीन चार हजार लोकसंख्या. या गावात उत्पनाची साधनं कमी. शेतमजूर म्हणून काम करावं तर तशीची कोणाची शेती नाही. संपूर्ण गावच गरिब.

पण या गावात मात्र एक माणूस भयंकर श्रीमंत होता.

या माणसाचं नाव व्यंकटेश स्वामी. व्यंकटेश स्वामीकडे २०० च्या वरती गाई होत्या. म्हैशी होत्या. एकीकडे संपूर्ण गाव झोपडीत रहायचा तर हा व्यंकटेश स्वामी मस्त ऐशआरामी जिवन जगायचा.

त्याच्या या श्रीमंताचा मागमुस मात्र गावकऱ्यांना कधीच लागला नव्हता. तसा व्यकंटेश स्वामी प्रत्येक आडल्या नडलेल्याला मदत करायचा. त्यामुळे लोकांना देखील तो इतके पैसे कुठून आणतो. तो मध्येच गावातून बाहेर का जातो यात काहीच इंटरेस्ट नसायचा. 

असच एकदा व्यकटेश स्वामी गाव सोडून गेला. तो बाहेर गेल्यानंतर काही दिवसातच गावात पोलीस आले. पोलीसांनी व्यकटेश स्वामीच्या घरी छापा टाकला. गावकऱ्यांकडे चौकशी केली. काही दिवसात समजलं की व्यंकटेश स्वामीला पोलीसांनी दरोडा टाकल्याबद्दल अटक केली आहे. आत्ता संपूर्ण गावाच्या लक्षात आलं की हा व्यकंटेश चोरीमारी करून पैसे आणतो. काळ सरला आणि व्यंकटेशचा जामीन मंजूर झाला. व्यंकटेश पुन्हा आपल्या गावात आला.

तो गावात आल्यानंतर गावातली काही कुटूंब त्याच्याकडे गेली. आम्हालापण तुमच्यासारखा पैसा कमवायचा आहे, आम्ही पण सोबत काम करतो म्हणून त्यांनी मागणी केली. व्यंकटेश स्वामीसाठी ही लॉटरीच होती. कारण दगा न देवू शकणारी गावातली माणसच त्याला आयती मिळाली. व्यंकटेश स्वामी लागलीच आपली गॅंग तयार केली.

या गॅंगमध्ये बायका होत्या, लहान मुलं होती, मुली होत्या. खुद्द स्वामीच्याच मुली या गॅंगच्या सदस्य होत्या. प्रत्येकाला आपआपल्या हिशोबाने काम वाटून देण्यात आलं होतं. रेकी कोण करणार, हल्ला कोण करणार, लक्ष कोण ठेवणार, इशारा कोण देणार, चोरीचा माल कोण पोहचवणार, तो बाजारात कोण विकणार प्रत्येक कामासाठी सिस्टीम उभारली.

आत्ता फक्त एकाच गोष्टीची कमतरता होती आणि ती म्हणजे या गॅंगच नाव, गावाच्या नावावरूनच या गॅंगचं नाव ठेवण्यात आलं, 

दंडुपाल्या गॅंग 

कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या तिन राज्यात ही गॅंग सक्रीय झाली. एकामागून एक डाव टाकले जावू लागले. प्रत्येक ठिकाणी सेम पद्धत. घर हेरणं. रात्री आजूबाजूच्या घरांना बाहेरून कुलूप लावणं. एकत्रित घरात शिरून आहे ते सामान घेणं. घरातील सदस्यांचा क्रुर पद्धतीने खून करणं, बायकांना मारून मृत्यूनंतर पाशवी बलात्कार करणं…

एकामागून एक करत १०० हून घरफोड्या करण्यात आल्या. ८० हून अधिक खून झाले…

दूसरीकडे तिन्ही राज्यांचे पोलीस सतर्क झाले होते. पण हे सगळं कोण करतय याचा काहीच मागमूस लागत नव्हता. एकतर अशी टोळी यापूर्वी कधीच रेकॉर्डवर आली नव्हती. त्यात इतक्या पाशवी पद्धतीने होणारे खून पाहून नेमका अंदाज लावणं देखील पोलीसांसमोर आव्हान होवून बसलं होतं.

झालेल्या गुन्ह्यात सर्वाधिक भाग हा बंगलोरच्या आजूबाजूचा होता. त्यामुळे इथेच टोळी सक्रीय होती याची जाणीव तर झालीच होती. बंगलोर, कोलार, मांड्या, म्हैसूर, हौसूर अशा ठिकाणी गुन्हे घडले होते.

कर्नाटक पोलीसांनी या सर्व केसेसचा तपास एकत्र करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची निवड केली. त्यांच्याकडे हा तपास देण्यात आला. त्यांच नाव एन. चलापती.

एन. चलापती हूशार माणूस होता. घडलेल्या घटनांचा अभ्यास करुन गुन्हेगारांची पद्धत समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये चलापतींच्या लक्षात आलं की ही टोळी जिथे कमी प्रतिकार होईल अशी जागा, घर निवडते. यावरून टोळीची प्रतिकार करण्याची क्षमता कमी असेल असा अंदाज त्यांनी बांधला.

पण रेकॉर्डवर नसणारी टोळी शोधायची कशी हा प्रश्न होताच. गुन्हेगारांची पद्धत समजून देखील काहीच फायदा होत नव्हता. पण त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची ठिकाणे पाहून ते हा चोरीचा माल इथेच विकत असतील असा अंदाज बांधण्यात आला.

चलापतींनी आत्ता गुन्हेगारांच्या शोधाचा मार्ग बदलला. त्यांनी चोरीचा माल शोधण्यापासून सुरवात केली. त्यासाठी जिथे जिथे चोऱ्या झाल्या होत्या तिथल्या दागिण्यांचे फोटो, त्यांच वर्णन घेवून सराफांकडे देण्यात आलं. अशा प्रकारचे दागिने मिळाल्यास पोलीसांना संपर्क करण्याचं सांगण्यात आलं. दूसरीकडे चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

याचा फायदा म्हणजे एक दिवस एक सराफी स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने सांगितलं काही महिला, काही पुरुष आणि लहान मुलं ग्रुपमध्ये येवून दागिने विकून गेले आहेत. साधारणं हे ४० एक दागिने होते. 

पहिला दुवा पोलीसांच्या हाती लागला होता. चलापतींनी त्या पुरूष व महिलांना ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली. थर्ड डिग्री वापरण्यात येवू लागली पण ताब्यात घेतेलेल पुरूष आणि महिला हे सोनं आम्हाला रस्त्यावरती सापडलं यावर ठाम होते. काहीही करून ते माहिती देत नव्हते. अशी एक वेळ आली की पोलीसांना देखील पटू लागलं की हे खरच बोलत आहेत. पण चलापतींना त्यांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी खबरींच जाळ विणलं.

त्यातून त्यांना धक्कादायक माहिती मिळू लागली. हे सगळे एका टोळीचा एका गावाचा हिस्सा असल्याची माहिती मिळाली. पण जोपर्यन्त गुन्हेगार माहिती देत नाहीत तोपर्यन्त कारवाई करणं अशक्य वाटतं होतं.

अशा वेळी चलापतींना एक इटरेस्टिंग माहिती मिळाली. त्यांना समजलं की हे लोकं कोणत्याही घरावर दरोडा टाकण्यापूर्वी जी पोर्णिमा असेल त्या पोर्णिमेला कोंबडा मारत असत. त्या कोंबड्याचं रक्त पिल्यानंतर देव त्यांच रक्षण करतो असा त्यांचा समज होता. कोंबडा मरताना पाहून आपल्याला सवय होते व माणूस मारताना त्रास होत नाही असाही त्यांचा समज होता. चलापतींनी हा प्रयोग पोर्णिमेला करायचं ठरवलं.

पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या व्यक्तींना त्यांनी पोर्णिमेला कोंबडा आणून दिला. कोंबडा मिळताच त्यांनी तो मारला आणि रक्त पिलं. आत्ता काहीही झालं तरी आपलं वाईट होवू शकत नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ताब्यात असणाऱ्या लोकांनी आपली तोंड उघडली.

एकामागून एक गुन्हे कबूल करत आपल्या इतर साथीदारांची नावे त्यांनी सांगितली.

दंडूपाल्या टोळीतल्या एकूण १९ लोकांना पकडण्यात आलं. यातील ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर ५ जणांना जन्मठेप झाली. पुढे ही केस सुप्रीम कोर्टात गेली. तिथे ११ जणांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात येवून त्यांना जन्मठेप देण्यात आली. तर काही जणांची पुराव्याअभावी मुक्तता देखील करण्यात आली.

या दरम्यानच्या काळात तपास अधिकारी एन. चलापती यांना जीव मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या होत्या. 

कालांतराने एक एक करुन अनेकजण यातून बाहेर पडले. इकडे चलापतींना नेहमची आपल्या जीवाची भिती राहिली. त्यांचे क्रुर कारनामे त्यांनी पाहीले होते.

यावर उपाय म्हणून आपल्या घरामध्ये त्यांनी एक दोन नव्हे तर ११ कुत्रे पाळले होते. कारण काय तर ज्या घरात कुत्रे असायचे त्या घरावर दंडुपाल्या गॅंग दरोडा टाकत नव्हती.

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. Mahesh G says

    Dandupalya Gang var Crime petrol madhe baghiltale hote bhyanak swarupache khun karat hoti

Leave A Reply

Your email address will not be published.