औरंगजेबच्या ऐवजी दारा शिकोह बादशाह झाला असता तर भारतीय इतिहास वेगळा असता का?

जेव्हा मुगल सम्राट शाहजहां ६७ वर्षांचा होता, तेव्हा त्याला उत्तराधिकारी कोण असणार ही काळजी सतावत होती त्याला चार मुल होती. प्रत्येकास वेगवेगळ्या प्रांतांच्या सैन्याच्या लीडरशिपचा अनुभव होता. त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना नव्हती. प्रत्येकजण एकमेकांना मारण्याचा आणि सम्राट बनण्याचे स्वप्न पाहत होता. त्यापैकी सर्वात मोठा होता शाहजहांच्या प्रिय पत्नी मुमताज पोटी जन्माला आलेला दाराशिकोह .

लहानपणापासूनच शाहजहांच्या चारी मुलांचा मुगल सिंहासन साठी संघर्ष होता मात्र शाहजहानला त्याचा उत्तराधिकारी म्हणून मोठा मुलगा दारा शिकोहच असावा अशी इच्छा होता. त्याचवेळी मात्र त्याचा दुसरा मुलगा औरंगजेब हा स्वतःला योग्य मुघल वारस समजत होता.

शहाजहानला दाराच योग्य वारस का वाटत होता तर त्याला काही कारण होती?

दारा बहादूर तर होताच तसेच अकबराचे गुण व आदर्श यांचा अनुयायी होता. जगातील वेगवेगळ्या तत्त्वज्ञानावर त्याने विश्वास ठेवला. सर्व धर्मातील तथ्यांमधे त्यांनी समन्वय साधला. त्याने गीतेचाही अनुवाद करून घेतला होता. औरंगजेबाच्या तुलनेने तो पुरोगामी होता.

तो वडिलांचा पूर्ण आदर ठेवत असे. शहाजन च्या प्रत्येक फर्मानावर त्याच पूर्ण लक्ष असे सुरुवातीला त्याला पंजाबचा सुबेदार म्हणून नियुक्त करण्यात आले त्यावेळी त्याला साठ हजार जाट सैनिक आणि चाळीस हजार घोडे मिळाले होते तो आपल्या प्रतिनिधींद्वारे आग्रयातून पंजाबवर राज्य करी. कारण बादशाह त्याला स्वतःच्या जवळ ठेवण्यास प्राधान्य देत असे. बादशहाला लागूनच त्याच ही सिंहासन लावल जाई अनेक महत्वाची पदे आणि जबाबदाऱ्या त्याला मिळल्या होत्या.

यामुळे झालं काय तर प्रादेशिक अनुभवात तो त्याच्या इतर भावापेक्षा पेक्षा कमी पडला. त्याच्या शिघ्रकोपीपणामुळे त्याला योग्य सल्ला देण्यास दरबारी विश्वासू घाबरत यामुळं त्याला राज्यातल्या अंतर्गत घडामोडी कळत नसत.सैन्याशी तर संपर्क नव्हताच व सतत संघर्ष करण्याची क्षमताही नव्हती. तुलनेनं औरंगजेब मात्र अधिक कार्यक्षम होत गेला.

औरंगजेबच्या ऐवजी शिकोह पुढे आला असता तर भारतीय इतिहास बदलला असता का?

यावर इतिहासकार म्हणतात की दारा मध्ये मुघल साम्राज्य चालवण्याची क्षमताच नव्हती. चार भावाच्या सत्ता संघर्षात शाहजहान चे समर्थन असून ही औरंगजेबसमोर त्याचा निभाव लागला नाही.

दारा शिकोहच्या लग्नावेळीचा एक गाजलेला किस्सा आहे.

शाहजहानने दोन हत्ती सुधाकर आणि सुरतसुंदर यांच्यात एक मुकाबला ठेवला तो मुघल काळात एक आवडते मनोरंजन साधन होते. अचानक सुधाकर औरंगजेब च्या दिशेने अत्यंत रागाने पळत आला गेला. औरंगजेब ने त्याच्या डोक्यावर भाला मारला क्रोधीत हत्तीने औरंगजेबाचा घोडा पाडला तरी स्वतःला सावरत त्याने लढाई केली हा सगळा प्रकार मुघल दरबार मंडळी आ वासून पाहत होती.

यातून औरंगजेब सगळयांना दाखवून दिल की मीच सम्राट म्हणून जास्त योग्य आहे.

युवराज दारा शिकोह ह्ळूह्ळू स्पर्धेतून मागे पडत गेला. पराक्रमात तो थोडासा औरंगजेबापेक्षा मागे असेल पण विद्वत्तेच्या बाबतीत तो जास्त ओळखला जायचा. त्याच्या पुस्तकप्रेमाच्या चर्चा शाहजहानच्या दरबारातदेखील रंगवून सांगितल्या जायच्या.

दारा पुस्तकांचा खूप आवडता होता. दिल्लीमध्ये त्यांनी एक वाचनालय उघडले होते जे त्यामध्ये तत्कालीन ६ लाख रुपये खर्च करून ग्रंथालय बांधण्यात आल होतेे. वेगवेगळ्या विषयांवरील २४ हजारहून हून अधिक पुस्तके होती. १६५९ मध्ये दाराच्या मृत्यूनंतर, लायब्ररीने आपले अस्तित्व गमावले.

निकोलस मनूची या इटालियन इतिहासकाराने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की दाराच्या मृत्यू दिवशी औरंगजेबाने त्याला विचारले,

“माझा तुला मारण्याचा विचार बदलला तर तू काय करशील?”

यावर उपहासाने दारा त्याला म्हणाला,

“औरंगजेबाच्या शरीराला चार तुकड्यात कापून दिल्ली च्या चार प्रवेश द्वारावर टांगेल”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.