तर हा मुघल राजपुत्र हिंदुत्ववाद्यांचा नवा हिरो ठरू शकतो… 

मोदी सरकार मार्फत एक निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय असा आहे की दारा शुकोहची कबर शोधून काढायची. त्यासाठी पुरातत्व खात्याच्या लोकांची एक टिम देखील बनवण्यात आली आहे.

पुरातत्व विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर सैयद्द जमाल हसल देखील या टिममध्ये आहेत. 

गुड मुस्लीम व बॅड मुस्लीम असा एक प्रवाह आहे. औरंगजेब जर बॅड मुस्लीम म्हणून प्रमोट झाला असेल तर दारा शुकोह गुड मुस्लीम म्हणून प्रमोट होवू शकतो. सध्याच्या काळातलं उदाहरणं सांगायचं झालं तर डॉ. एपीजी अब्दुल कलाम हे गुड मुस्लीम होते.

याच धर्तीवर दारा शुकोह यांचे चरित्र मुस्लीम धर्मीयांसोबत हिंदू धर्माच्या लोकांसमोर येणं आणि एक गुड मुस्लीम विचारधारा काय आहे हे हिंदूत्ववादी चष्म्यातून सांगण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.. 

पण त्यापूर्वी दारा शुकोह हा नेमका कोण होता, व त्याची कबर का शोधण्यात येत आहे हे आपण पहायला हवं… 

दारा शुकोह हा शाहजहांचा सर्वात मोठ्ठा मुलगा होता. थोडक्यात शहाजहां नंतर मुघल घराण्याचा वारस. मुघल बादशहा म्हणून दारा शुकोहचा गादीवर हक्क होता. मात्र इथे शहाजहांचा दूसरा मुलगा औरंगजेब आडवा आला आणि त्याने दारा शुकोहला अटक करून आग्राच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं. 

औरंगजेब बादशहा झाल्यानंतर दारा शुकोह कायमचा जेलमध्ये कैद झाला. 

दारा शिकोह हा महत्वाचा का होता तर तो सर्वधर्माचा पुरस्कार करणारा होता. हिंदू, बुद्ध, जैन आणि मुस्लीम यांच्यासोबत तो धर्माविषयची चर्चा करत असल्याचे उल्लेख आहेत. त्याचसोबत हिंदू धर्माबाबत त्यांचे धोरण सहिष्णू होते त्यानेच बनारसहून पंडितांना बोलावून हिंदू उपनिषदांचे पारसी भाषेत अनुवाद केले होते.

पारसी भाषेतील हा अनुवाद त्यांच्या मुळे पुढे युरोपमध्ये पोहचला व पुढे लॅटिन भाषेत देखील पोहचला.

थोडक्यात काय तर उपनिषदांना आतंराष्ट्रीय पातळीवर घेवून जाण्याचे काम दारा शिकोह यांने केल्याचे दाखले मिळतात. 

दारा शिकोंह हा हिंदू धर्मावर प्रभावित झाला होता व तो हिंदू धर्माचा व परंपरेचा सन्मान करत होता असे दाखले देण्यात येतात. 

थोडक्यात त्याच्या याच सहिष्णू धोरणामुळे तो एक गुड मुस्लीम ठरतो. दारा शिकोह हा हिंदू आणि मुस्लीम यांच्या एकत्रिकरणावर भर देणारा होताच पण त्याहून अधिक तो हिंदू धर्माला सन्मान देणारा होता. 

याविरुद्ध औरंगजेब ठरतो. औरंगजेब एक कट्टर व धर्मांध असल्याचं सांगण्यात येत. सत्तेत असणारं भाजप सरकार देखील मुघल इतिहास म्हणजे भारताचा काळा काळ असल्याचं गृहितक मांडत असते.

या विरोधात दारा शिकोह सारख्या राजपुत्रावर औरंगजेबाने केलेला अन्याय व खरा मुस्लीम कसा असतो हे सांगण्याचा हा प्रयत्न करण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे… 

त्यासाठी २०१७ सालचं उदाहरणं देखील देता येईल, फेब्रुवारी २०१७ साली भारतीय जनता पक्षामार्फत डलहौसी रस्त्याचं नाव बदलून दारा शिकोह मार्ग करण्यात आलं. पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांच्या या प्रस्तावाला दिल्ली महानगरपालिकेने मंजूरी दिली होती.

तेव्हा मिनाक्षी लेखी म्हणाल्या होत्या,

आम्ही खऱ्या अर्थाने शहजाद्यांचा सन्मान केला आहे.

औरंगजेब दारा शिकोहसोबत कसा वागला होता.. 

गादीचा प्रश्न आला तेव्हा आपणच बादशहा असल्याचं सांगून औरंगजेबाने दारा शिकोहला कैद करुन दिल्लीत आणलं होतं. जेव्हा त्याला कैद करुन आणण्यात आलं तेव्हा तो एका रातपुत्राप्रमाणे न दिसता एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे दिसत असल्याचे दाखले आहेत.

कैद्येत असताना त्याला मारण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्याची हत्या करण्यात आली. हत्या करुन दारा शिकोहला हुमायूं मकबऱ्यामध्ये दफन करण्यात आल्याचे पुरावे आहेत. 

मात्र नक्की कुठे दफन करण्यात आलं याचे पुरावे नाहीत. आलमगीर नामा या मोहम्मद मुंशी यांच्या पुस्तकात हुमांयू मकबऱ्यात अकबरच्या दानियाल आणि मुराद या मुलांच्या कबरीनंतर असणाऱ्या तैमुर वंशाच्या शहजादांच्या कबरीनंतर दारा शिकोहची कबर असल्याचं सांगण्यात येत. 

वास्तविक हुमायूं कबरमध्ये एकूण १५० कबर आहेत. पैकी दारा शिकोहची नेमकी कोणती हा प्रश्न असल्यानेच नेमकी कबर शोधण्यासाठी पुरातत्व समिती गठित करण्यात आली आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.