उद्धव ठाकरे Vs एकनाथ शिंदे ; सामना कोणी जिंकला ?

आमचा बाप आणि तुमचा बाप, खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, गद्दार आणि खुद्दार, आणि गेल्या तीन महिन्यांपासून तीच ती रिपीट होणारी स्क्रिप्ट म्हणजे कालचा ठाकरे-शिंदे गटाचा सामना. हिंदूत्व, गद्दार, आमचा बाप तुमचा बाप, निष्ठावंत आणि साहेब या पलीकडे विशेष अस गेल्या तीन महिन्यात काहीही घडलं नाही.

साहजिक तेच ते सांगून आम्ही बोअर झालोय. तेच ते वाचून तुम्ही बोअर झालाय. पण तेच ते सांगून आपले राजकारणी मात्र एकदम उत्साहात आहेत.  आत्ता कालचा सामना दोन्ही गटाकडून तेच ते ऐकवण्यासाठी झाला होता का? आणि तेच ते ऐकवायचं होतं तर इतकी गर्दी करण्याची आवश्यकता नव्हती अस वाटतं. 

असो आपल्याला काय, बोलभिडू असल्याने आपल्याने दोन्ही सामन्यांचं विश्लेषण तर करायलाच पाहीजे. नेमकं कोण जिंकलं कोण हरलं हेच विस्तृतपणे या व्हिडीओतून समजून घेवूया.

Leave A Reply

Your email address will not be published.